Eight vehicles breaken in Dattwadi for terrorism creatation | दत्तवाडीमध्ये दहशत निर्माण करण्याच्या हेतूने आठ गाड्यांची तोडफोड 

दत्तवाडीमध्ये दहशत निर्माण करण्याच्या हेतूने आठ गाड्यांची तोडफोड 

ठळक मुद्देसीसीटीव्ही फुटेजमुळे एका आरोपीला पकडले, एक जण फरार अल्टो , तवेरा , टाटा टेम्पो, रिक्षा , क्रिस्टा अशा आठ गाड्यांची  तोडफोड

पुणे : दत्तवाडीमधील लडकतवाडीमध्ये नुकत्याच जेलमधून बाहेर आलेल्या आरोपीकडून आठ गाड्यांची तोडफोड करण्यात आली. यामध्ये त्यांनी चारचाकी गाड्यांच्या काचा फोडून ५० ते ६० हजार रुपयांचे नुकसान झाले असून याबाबत दत्तवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून यातील अल्पवयीन आरोपीला हत्यारासोबत ताब्यात घेतले आहे .
 दुसरा अल्पवयीन आरोपी अभिषेक येनपुरे उर्फ कोक्या हा अजून फरार आहे. ह्याच्यावर गुन्हे दाखल असून हा नुकताच जेलमधून सुटला असून त्याने दहशत निर्माण करण्यासाठी हे कृत्य केलं असून तेथील स्थानिक नागरिकांनी ह्या ठिकाणी पेट्रोलिंग करावे अशी वारंवार मागणी केली होती. मात्र, पोलिसांनी दुर्लक्ष केल्याने ही घटना घडल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.यामध्ये अल्टो , तवेरा , टाटा टेम्पो, रिक्षा , क्रिस्टा अशा आठ गाड्यांची  तोडफोड करण्यात आली आहे. घटनास्थळी पोलीस उपायुक्त पौर्णिमा गायकवाड,सहायक पोलिस आयुक्त पोमाजी राठोड , वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास घेवारे , पोलीस निरीक्षक राजेंद्र सहाणे यांनी भेट दिली. 

Web Title: Eight vehicles breaken in Dattwadi for terrorism creatation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.