शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

संपूर्ण महाराष्ट्रात तौक्ते चक्रीवादळाची परिणामकारकता आज रात्री १२ पर्यंतच राहणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2021 17:22 IST

हवामानतज्ञ डॉ रामचंद्र साबळे यांचे मत

ठळक मुद्दे सकाळपर्यंत संपूर्ण राज्याचे हवामान सुरळीत

पुणे: पश्चिम महाराष्ट्रातील समुद्र किनारपट्टीवर वादळाचा तडाखा बसला आहे. पाऊस आणि जोरदार वादळी वाऱ्याने मोठ्या प्रमाणावर नुकसानही झाले आहे. काल दिवसभरात अनेक झाडपडी, घरांचे नुकसान, विजेच्या संदर्भातील घटना घडल्या आहेत. 

"तौक्ते चक्रीवादळामुळे किनारपट्टी जवळील शहरांना बराच धोका निर्माण झाला होता. आता हे गुजरातकडे सरकू लागले आहे. त्यामुळे आज रात्री बारा, एक पर्यंतच महाराष्ट्रातचक्रीवादळाचा परिणाम जाणवेल" असे हवामानतज्ञ डॉ रामचंद्र साबळे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले आहे. 

काल सकाळपासूनच कोकण किनारपट्टीबरोबरच उर्वरित महाराष्ट्रात हवामानात बदल झाला होता. काही ठिकाणी वादळी वारे सुटले होते. तर काही भागात पाऊस सुरू झाला होता. पण आता दुपारनंतर उर्वरित राज्यात त्याचा परिणाम कमी जाणवू लागला आहे. सकाळपर्यंत संपूर्ण राज्याचे हवामान सुरळीत झाले असेल. असेही ते म्हणाले आहेत. साबळे म्हणाले, सद्यस्थितीत वादळाची परिणामकारकता पश्चिम महाराष्ट्र म्हणजे मुंबई, ठाणे, पालघर, रायगड याठिकाणी जास्त आहे. चक्रीवादळामुळे किनारपट्टी जवळील भागात २०० ते ३०० मिलीमीटर पावसाचे प्रमाण वाढते. तर उर्वरित ठिकाणी १५ ते २० मिलिमीटर पाऊस पडतो. आता कालपासून आज दुपारपर्यंत सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड अशा बऱ्याच ठिकाणी वादळी वाऱ्यासहित जोरदार पावसाची नोंद झाली. दुपारनंतर ते गुजरातकडे सरकू लागल्याने त्याची परिणामकारकता कमी होऊ लागली आहे. तसेच सांगली, सातारा, कोल्हापूर अशा ठिकाणी १५ ते २० मिलिमीटर पाऊस झाला होता. रात्रीपर्यंत तोही पूर्णपणे बंद होईल. 

पावसाने पिकांचे नुकसान होण्याची शक्यता 

चक्रीवादळामुळे रायगड, रत्नागिरी भागातील आंबा, काजू, सुपारी या पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. तसेच अनेक जिल्ह्यातील ग्रामीण भागातही वादळी वारे अथवा पाऊस यामुळे पिकांचे नुकसान होण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. 

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रGovernmentसरकारRainपाऊसcycloneचक्रीवादळ