शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
2
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
3
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
4
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
5
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
6
"तर महाराष्ट्राला मोठी किंमत चुकवावी लागेल"; विजय वडेट्टीवार यांचा महायुतीला सूचक इशारा
7
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
8
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
9
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
10
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
11
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
12
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
13
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
14
होर्मुझनंतर आता 'मलक्का'वर अमेरिकेची नजर; ट्रम्प यांची नवी खेळी! भारतासाठी ठरणार गेमचेंजर?
15
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
16
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
17
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
18
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
19
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
20
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षण झेडपी शाळेत... डंका शासकीय सेवेत!

By admin | Updated: April 28, 2017 05:50 IST

शालेय शिक्षण जरी जिल्हा परिषदेच्या शाळेत व मातृभाषेतून झालेले असले तरीही पुढे जाऊन अनेक विद्यार्थी शासकीय

बारामती : शालेय शिक्षण जरी जिल्हा परिषदेच्या शाळेत व मातृभाषेतून झालेले असले तरीही पुढे जाऊन अनेक विद्यार्थी शासकीय स्पर्धा परीक्षांत दमदार कामगिरी करीत असल्याचे समोर आले आहे. शासकीय सेवेतही त्यांच्या कामगिरीचा डंका वाजू लागला आहे. गेल्या काही वर्षांत बारामती, इंदापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेत घवघवीत यश मिळवले आहे. जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेतलेल्या प्रिया ढाकणे, अ‍ॅड. स्वाती जाधव, डॉ. सागर जाधव यांच्यासह अन्य विद्यार्थ्यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी, प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर, आयएफएस आदी महत्त्वाच्या पदांवर झेप घेतली आहे. अहमदनगर ग्रामीण पोलीस उपअधीक्षक पदावर कार्यरत असलेल्या आनंद भोईटे यांचे प्राथमिक शिक्षण सणसर (ता. इंदापूर) येथे झाले आहे. ‘लोकमत’शी बोलताना ते म्हणाले, की, आमचा सणसरच्या जिल्हा परिषद शाळेतच शैक्षणिक पाया पक्का झाला. स्पर्धा परीक्षेचा अभ्यासक्रम मराठीतून आहे. इंग्रजी शिक्षण पुढे मिळतच असते. त्याचादेखील टप्प्याने विकास होतो. मातृभाषेतील शिक्षण विद्यार्थ्यांना आत्मसात करणे सोपे जाते. ढेकळवाडी (ता. बारामती) येथील डॉ. तुषार बोरकर सध्या जळगाव जिल्ह्यात तहसीलदार पदावर कार्यरत आहेत. त्यांचे प्राथमिक शिक्षण भवानीनगर (ता. इंदापूर) येथील जिल्हा परिषद शाळेत झाले आहे. डॉ. बोरकर यांनी सांगितले की, माझं प्राथमिक शिक्षण मातृभाषेतून आणि जिल्हा परिषदेच्या शाळेतच झाले आहे. मातृभाषेतून शिक्षण मिळाल्यास अभ्यास समजून घेणे सोपे जाते, हा माझा अनुभव आहे. अनेकदा पालकांच्या हट्टापायी विद्यार्थ्यांना त्यांचा कल न पाहता इंग्रजी शाळेत घातले जाते. इंग्रजी माध्यमदेखील चांगले आहे. ती आंतरराष्ट्रीय भाषा आहे. मात्र, घरातील वातावरण इंग्रजी शिक्षणासाठी अनुकूल असणे तितकेच महत्त्वाचे ठरते.मुळच्या काटेवाडी (ता. बारामती) येथील प्रिया ढाकणे यांची नुकतीच उपविभागीय पोलीस अधिकारी पदावर निवड झाली आहे. त्यांचे प्राथमिक शिक्षण भवानीनगर (ता. इंदापूर) येथील प्राथमिक शाळेत झाले आहे. ढाकणे म्हणाल्या, जिल्हा परिषद शाळेत सर्व थरातील मुले येतात. त्यातून येथे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्त्वविकास होतो. माझा हा व्यक्तिमत्त्वविकासाचा अनुभव मला आजपर्यंतच्या वाटचालीमध्ये उपयुक्त ठरला. हा विकास विद्यार्थ्यांना भवितव्यासाठी उपयुक्त ठरतो. मातृभाषेतून प्राथमिक शिक्षण मिळाल्यास विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास जलदगतीने होतो. ग्रामीण भागात इंग्रजी शिक्षणाकडे कल वाढत आहे.