शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
2
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
3
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
4
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
5
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
6
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
7
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
8
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
9
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
10
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
11
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
12
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
13
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
14
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
15
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
16
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
17
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
18
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
19
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
20
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा

शिक्षण मंत्री हाय हाय...फी वाढीविरोधात पुण्यात पालकांचे आंदोलन व जोरदार घोषणाबाजी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2021 9:01 PM

गेल्या काही महिन्यांपासून पालक व संस्था चालकांमध्ये शालेय शुल्कावरून वाद सुरू

पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद असल्यामुळे केवळ ऑनलाईन शिक्षण सुरू होते. त्यामुळे शाळांच्या शुल्कात कपात करावी,अशी मागणी पालकांनी शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे बालभारती येथे बुधवारी केली. मात्र, त्यांच्याकडून समाधानकारक आश्वासन न मिळाल्याने पालकांनी शिक्षण मंत्री हाय...हाय च्या घोषणा दिल्या. तसेच शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांच्या विरोधातील घोषणा दिल्या.

गेल्या काही महिन्यांपासून पालक व संस्थाचालकांमध्ये शालेय शुल्कावरून वाद सुरू आहे.तसेच राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने प्रसिध्द केलेले परिपत्रक  संदिग्ध असून पालकांना त्यामुळे दिलासा मिळाला नाही.अनेक शाळा पूर्ण शुल्क भरण्यासाठी पालकांकडे तगादा लावत आहेत.त्यामुळे पॅरेंट्स असोसिएशन पुणे’च्या प्रतिनिधींनी वर्षा गायकवाड यांची भेट घेवून निवेदन दिले. तसेच देशातील इतर राज्यांनी केलेल्या शुल्ककपातीचा माहिती दिली. परंतु,शुल्काबाबत शासन व काही शिक्षण संस्थांच्या याचिकेव्र सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. तसेच पालकांच्या तक्रारी या सीबीएसई आणि इंटरनॅशनल बोर्डाच्या शाळांबाबत तक्रारी आहेत. त्यावर राज्य शासन कारवाई करू शकत नाहीत,असे सांगितले. त्याचप्रमाणे शुल्कासंदर्भात इतर बोर्डाच्या अधिका-यांबरोबर बैठक लावण्याची पालकांनी केलेली मागणी अमान्य करण्यात आली.त्यामुळे पालकांनी गायकवाड यांच्या निषेध करत घोषणाबाजी केली.

पॅरेंट्स असोसिएशन पुणेच्या अध्यक्षा जयश्री देशपांडे म्हणाल्या,राज्य शासनाकडून सर्व बोर्डाच्या शाळांना परवानगी दिल्या जात असल्याने या शाळांवर शासनाचे नियंत्रण असले पाहिजे. संस्थाचालक  न्यायालयात पाच पाच वकील लावत असले तर शासनाने सुध्दा जास्त वकील लावून पालकांची बाज मांडली पाहिजे. देशातील सुमारे 15 ते 16 राज्यांनी शुल्क कमी केले आहे. इतर राज्यात शुल्क कमी होत असेल अतर महाराष्ट्रातही कमी झाले पाहिजे.

ऑनलाइन शाळा सुरू असल्याने पालकांनी पूर्ण शुल्क न भरण्याची भूमिका घेतली आहे.मात्र,पूर्ण शुल्क दिले नाही तर पुढच्या वर्षी शाळेत प्रवेश दिला जाणार नाही अशी धमकी काही संस्थांनी दिली आहे.त्यामुळे शुल्क कपात करावी,अशी मागणी पालकांकडून केली जात आहे.----शिक्षणमंत्री मागच्या दाराने बाहेरबालभारतीच्या मुख्य दारात वर्षा गायकवाड यांची वाट पहात पालकांनी निदर्शने केली.त्यामुळे गायकवाड यांनी मागच्या दारातून बाहेर पडून दुसऱ्या गाडीतून निघून गेल्या. त्यावेळी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.त्यांनी पालकाशी संवाद सधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्यात वाद झाला.त्यानंतर  पोलिसांनी हस्तक्षेप करून वाद संपला.----

टॅग्स :PuneपुणेVarsha Gaikwadवर्षा गायकवाडagitationआंदोलनSchoolशाळाEducation Sectorशिक्षण क्षेत्र