शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
2
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
3
अब की बार, देश में जनता की सरकार; महाराष्ट्रात करोडो रुपयांना आमदारांची खरेदी, पक्षांतराचा पायंडा पाडला : प्रियंका गांधी
4
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
5
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
6
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
7
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
8
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
9
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
10
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
11
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
12
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
13
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
14
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
15
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
16
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
17
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
18
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
19
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
20
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक

मोठ्या जलप्रकल्पांचा आर्थिक व सामाजिक स्तर जोखावा : मेधा पाटकर :

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2018 1:09 PM

सरदार सरोवर प्रकल्पाचा महाराष्ट्राला फायदा नाही.सरदार सरोवर प्रकल्पामधून महाराष्ट्राला बारा टीएमसी पाणी मिळणार होते. परंतु, गुजरातला डोळ्यासमोर ठेवून प्रकल्प राबविण्यात येत आहे. त्यामुळे प्रकल्पाचे पाणी गुजरातलाच मिळणार असून महाराष्ट्राच्या वाट्याचा खर्च राज्य शासनच करणार आहे.

ठळक मुद्दे ‘नर्मदेचे धडे-महाकाय जलप्रकल्पांचे भवितव्य’ यावर परिसंवाद 

पुणे : मोठ्या जलप्रकल्पांमधून वीज, पाणी मिळविण्यासाठी जगभरातील विविध देशांमधून भिन्न-भिन्न निष्कर्ष समोर आले आहेत. त्यामुळे प्रकल्पाच्या बाजूने आणि विरोधात अशा दोन्हीने खुली चर्चा व्हावी. मोठे धरण प्रकल्प राबविताना सामाजिक, पर्यावरणीय समस्या निर्माण होऊन विस्थापितांचे प्रचंड नुकसान झाल्याचा निष्कर्ष जागतिक धरण आयोगाने नोंदविले आहेत. याच धर्तीवर मोठ्या जलप्रकल्पांचा आर्थिक, सामाजिक स्तर जोखण्याचा प्रयोग भारतातही व्हावा, अशी मागणी नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी सोमवारी केली.  अफार्म संस्था आणि भवताल मॅगझिन यांच्या वतीने आयोजित ‘नर्मदेचे धडे-महाकाय जलप्रकल्पांचे भवितव्य’ या विषयावरील परिसंवादामध्ये पाटकर बोलत होत्या. जलसंपदा विभागाचे माजी सचिव निवृत्त विद्यानंद रानडे, पाणी आणि सिंचन कायद्यांचे अभ्यासक प्रा. प्रदीप पुरंदरे, मेरीचे माजी महासंचालक दि. मा. मोरे या वेळी उपस्थित होते.रानडे म्हणाले, ‘‘कृषीक्रांती झाल्यानंतर देशातील अन्नधान्य उत्पादनात झपाट्याने वाढ झाली असून सध्या त्यामध्ये एक प्रकारचा साचलेपणा आला आहे. तसेच अन्नधान्याच्याबाबतीत स्वयंपूर्णता हा भारतासमोरील मोठा प्रश्न असून त्याकरिता सिंचन क्षेत्र वाढविणे गरजेचे आहे. महाराष्ट्रासह भारतात आतापर्यंत झालेल्या जलविकासामुळे गुंतागुंत झाली असून, त्यामुळे विसंगती निर्माण झाली आहे. त्यामुळे त्याचे व्यवस्थापन होणे गरजेचे आहे.’’

.....................

सरदार सरोवर प्रकल्पामध्ये मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन सरदार सरोवर प्रकल्पाचे लाभक्षेत्र असणाऱ्या सौराष्ट्रात नुकत्याच पार पडलेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपाची पीछेहाट झाली आहे. सध्या गांधीनगरमध्ये सरदार सरोवर प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील आणि विस्थापित झालेले असे शेतकरी एकत्र जमून आंदोलन करीत आहेत. मूलभूत मुद्द्यांवर आधारित अभ्यास न करता सरदार सरोवर प्रकल्पाचे सादरीकरण जागतिक बँकेसमोर करण्यात आले. मात्र, जागतिक बँकेच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन झाल्यानंतर बँकेकडून निधी रोखण्यात आला. यामधून धडा घेऊन जागतिक बँकेने एक समिती नेमली आहे. त्यामुळे विकास प्रकल्प राबविताना विकेंद्रित पद्धतीने नागरिकांना सहभागी करून घेतले पाहिजे.सरदार सरोवर प्रकल्पाचा महाराष्ट्राला फायदा नाही.सरदार सरोवर प्रकल्पामधून महाराष्ट्राला बारा टीएमसी पाणी मिळणार होते. परंतु, गुजरातला डोळ्यासमोर ठेवून प्रकल्प राबविण्यात येत आहे. त्यामुळे प्रकल्पाचे पाणी गुजरातलाच मिळणार असून महाराष्ट्राच्या वाट्याचा खर्च राज्य शासनच करणार आहे. हे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी मान्यही केले आहे.      मेधा पाटकर 

टॅग्स :PuneपुणेMedha Patkarमेधा पाटकरGujaratगुजरातMaharashtraमहाराष्ट्र