शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

पुढच्या वर्षी लवकर या..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2017 00:54 IST

गत बारा दिवस भाविक-भक्तांच्या सानिध्यात असलेल्या  विघ्नहर्ता गणरायाला पुढच्या वर्षी लवकर या.. अशा गजरात  ५ स प्टेंबर रोजी उत्साहात निरोप देण्यात आला. 

ठळक मुद्देडीजेला तिलांजली, ढोल- ताशांचा आवाज निनादलाकडक बंदोबस्तात शिस्तबद्ध मिरवणूक  विसर्जन मिरवणुकीत जनजागृती 

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: गत बारा दिवस भाविक-भक्तांच्या सानिध्यात असलेल्या  विघ्नहर्ता गणरायाला पुढच्या वर्षी लवकर या.. अशा गजरात  ५ स प्टेंबर रोजी उत्साहात निरोप देण्यात आला. बुलडाणा शहरात मुख्य सार्वजनिक गणेश मंडळांची एकत्रित  मिरवणूक काढण्यात आली. सर्वप्रथम संगम चौकातून गणेश  विसर्जनासाठी मिरवणुकीने प्रारंभ झाला. सर्वात जुन्या सुवर्ण गणेश  मंडळाला मानाचा गणपती म्हणून स्थान देण्यात आले. यावेळी हतेडी  येथील महिला भजनी मंडळाने सहभाग घेतला. त्यानंतर रूद्र गणेश  मंडळ, जयस्तंभ चौक सार्वजनिक गणेश मंडळ, वाल्मीकी गणेश  मंडळाची मिरवणूक ढोल- ताशांच्या निनादात काढण्यात आली. तर  दुपारी सरकारी बगिच्या तलाव परिसरात विसर्जनासाठी एकच गर्दी  उसळली होती. यावेळी सामाजिक वनीकरण विभागाने निर्माल्य  संकलन केंद्र उभारले होते. यावेळी वन विभागाचे अधिकारी,  कर्मचारी, नगरपालिकचे कर्मचारी तसेच  सामाजिक कार्यकर्त्यांनी  निर्माल्य गोळा करण्यासाठी सहकार्य केले. यावेळी अनेक भाविक  भक्तांनी आपल्यासोबत आणलेले निर्माल्य संकलन केंद्राजवळ  असलेल्या कार्यकर्त्यांंकडे जमा करीत होते. तर अनेकांनी परिसरातील  विहिरीवर गणपती विसर्जन केले होते. त्यामुळे सर्वत्र गणेश भक्तांची  गर्दी दिसून येत होती. जिल्ह्यातील सर्वात महत्वाचे असलेल्या  खामगाव शहरातील मिरवणुकीकडे अनेकांचे लक्ष लागुन होते.  मानाच्या लाकडी गणेशाचे पूजन   सकाळी ९ वाजता करण्यात आले.  त्यानंतर  खामगाव शहरात गणेश विसर्जन मिरवणुकीला सुरुवात  झाली. गणेश विसर्जन मिरवणुकीत सहभागी झालेल्या मंडळांनी   समाजप्रबोधनात्मक कार्यक्रमाद्धारे जनजागृती केली. मंडळांनी बेटी  बचाओ, वृक्षसंवर्धन आणि जलसाक्षरतेवर भर दिला. 

कडक बंदोबस्तात मिरवणूक  संगम चौकातून गणेश विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाल्यानंतर  पोलिसांनी ठिकठिकाणी चोख बंदोबस्त ठेवला होता. जिल्हा पोलीस  अधीक्षक शशिकुमार मीणा यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय  पोलीस अधिकारी बी.बी. महामुनी व त्यांच्या पथकाने जयस्तंभ  चौकासह जनता चौक परिसरात बंदोबस्तांची पाहणी करून  आवश्यक त्या सूचना दिल्या. तर संगम चौकात ठाणेदार सुनील  जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्त लावण्यात आला. खासगी  वेशात प्रशिक्षणार्थी पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले होते. 

शिस्तबद्ध मिरवणूकबुलडाण्यात चार मुख्य सार्वजनिक गणेश मंडळांनी ठरविलेल्या प्रमाणे  शिस्तबद्ध मिरवणूक काढली. संगम चौकात प्रथम मानाचा सुवर्ण  गणेश, रूद्र गणेश मंडळ, जयस्तंभ चौक सार्वजनिक गणेश मंडळ  तसेच वाल्मीकी गणेश मंडळाची मिरवणूक काढण्यात आली. तर   संध्याकाळी उशिरा शहरातील विविध सार्वजनिक गणेश मंडळाने  शिस्तबद्ध मिरवणूक काढण्यात आल्यामुळे भक्तांमध्ये उत्साह  संचारला होता.

डीजेला तिलांजली, ढोल- ताशांचा आवाज निनादलायावर्षी पार पडलेल्या श्री गणेशाच्या विसर्जन मिरवुणकीत सार्वजनिक  गणेश मंडळांनी डीजेला तिलांजली देत ढोल- ताशांच्या निनादात श्री  गणरायाला निरोप दिला.   

विसर्जन मिरवणुकीत जनजागृती विसर्जन मिरवणुकीतही सार्वजनिक गणेश मंडळांच्यावतीने जनजागृ ती करण्यात आली. यावेळी मुलगी वाचवा मुलगी शिकवा, वृक्ष  संवर्धन, जलसंवर्धन, व्यसनाधीनता याबाबत फलक लावून जनजागृ ती करण्यात आली.