शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
3
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
4
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
5
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
6
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
7
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
8
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
9
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
10
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
11
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
12
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
13
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
14
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
15
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
17
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
18
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
19
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
20
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
Daily Top 2Weekly Top 5

प्रत्येक प्रभागांत ‘ई-लर्निंग’ शाळा

By admin | Updated: August 6, 2015 03:20 IST

केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी योजनेत पुण्याचा समावेश निश्चित आहे. स्मार्ट सिटीसाठी आवश्यक दर्जेदार सुविधा उभारण्याची गरज आहे.

पुणे : केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी योजनेत पुण्याचा समावेश निश्चित आहे. स्मार्ट सिटीसाठी आवश्यक दर्जेदार सुविधा उभारण्याची गरज आहे. महापालिकेने शिवदर्शन येथे राजीव गांधी ई-लर्निंग शाळा सुरू केली आहे. त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळत असल्याने दरवर्षी प्रवेशासाठी गर्दी होते. त्या धर्तीवर शहरातील गोरगरीब व झोपडपट्टीतील मुलांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी प्रत्येक प्रभागात ई-लर्निंग शाळा उभारल्या पाहिजेत. शिक्षणाचे माहेरघर असलेले पुणे अगोदरपासून स्मार्ट शहर आहे. परंतु, केंद्राच्या योजनेनुसार शहरात स्मार्ट सुविधा उभारण्याची संधी आहे. मात्र, केंद्र व राज्य सरकारने स्मार्ट सिटी योजना राबविताना महापालिकेसारख्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अधिकारावर गदा आणू नये. स्थानिक स्वराज्य संस्था आर्थिकदृष्ट्या भक्कम होतील, यासाठी प्रयत्न करावे. पुण्यातील वाहतुकीचा प्रश्न जटिल झाला आहे. त्यामुळे रस्ते रुंदीकरण व उड्डाणपूल उभारणीला प्रोत्साहन दिले पाहिजे. शहरातील वाहतूककोंडी दूर करण्यासाठी अंतर्गत रिंगरोड (एचसीएमटीआर) उभारण्याची गरज आहे. त्यासाठी आवश्यक भूसंपादन प्रक्रिया राबविण्यासाठी शासनाने नवीन धोरण आणावे. रस्ता ही आवश्यक सुविधा असल्याने भूसंपादनाला न्यायालयात स्थगिती देण्यात येऊ नये. केंद्र व राज्य शासनाने स्मार्ट सिटी योजनेसाठी १०० टक्के अनुदान दिले पाहिजे. त्यामुळे महापालिकेला रस्ते, पाणीपुरवठा, वाहतूक प्रकल्प, वीज आदी दर्जेदार सुविधा उभारता येतील. शिवाय स्मार्ट सिटीतील सुविधांचा भार सामान्य नागरिकांवर पडणार नाही. शहरातील पुणे महानगर परिवहन महामंडळाची (पीएमपी) सार्वजनिक वाहतूक सक्षम करणे. मेट्रो, मोनोरेल व एचसीएमटीआरचे प्रकल्प प्राधान्याने पूर्ण करणे गरजेचे आहे. सार्वजनिक वाहतुकीनंतर कचरा व्यवस्थापन प्रकल्पावर भर दिला पाहिजे. शहरात निर्माण होणारा कचरा बाहेर जाण्याऐवजी प्रत्येक प्रभागात कचऱ्यावर १०० टक्के प्रक्रिया झाली पाहिजे. त्यासाठी ओला व सुका कचरा वेगळा करण्यासाठी नागरिकांचा सहभाग घेऊन झिरो गारबेज प्रभाग करावे लागणार आहेत. शहरातील कचऱ्याइतकाच सांडपाण्याचा प्रश्न महत्त्वाचा आहे. सद्यस्थितीत महापालिकेकडून सांडपाण्यावर १०० टक्के प्रक्रिया केली जात नाही. त्यामुळे नदीच्या प्रदूषणात वाढ होत आहे. त्यासाठी नदी सुधारणा प्रकल्प व सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाला प्राधान्याने निधी देण्याची गरज आहे. शहरात दर्जेदार मूलभूत सुविधा उभारण्यासाठी सक्षम अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याची आवश्यकता आहे.