शहरं
Join us  
Trending Stories
1
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
2
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
3
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
4
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
5
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
6
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
7
हातोडावाले तात्या रोड रोलर घेऊन पुण्यात फिरणार; वसंत मोरेंचे निवडणूक चिन्ह जाहीर
8
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
9
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
10
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
11
अमित शाह यांच्या फेक व्हिडिओ प्रकरणात एकाला अटक, कोण अडकलं? CM हिमंता यांनी दिली माहिती
12
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
13
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
14
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
15
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
16
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
17
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 
18
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
19
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
20
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!

पीएमआरडीएकडून माण, बावधनमधील सुविधा भूखंडासाठी ई-लिलाव प्रक्रिया 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2018 7:38 PM

पुणे : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून ( पीएमआरडीए ) पायाभूत सोईसुविधा निर्माण करण्याकरीता विविध प्रकल्प हाती घेण्यात आले ...

ठळक मुद्देदीर्घ मुदतीच्या भाडेपट्टयाने खाजगी विकसकांना देणार 

पुणे : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (पीएमआरडीए) पायाभूत सोईसुविधा निर्माण करण्याकरीता विविध प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. या विविध प्रकल्पांच्या अंमलबजावणीकरिता निधी उभारणीचा स्त्रोत म्हणून प्राधिकरणाच्या जमीन संचयातील सुविधा भूखंड ई-लिलाव पद्धतीने दीर्घ मुदतीच्या भाडेपट्टयाने खाजगी विकसकांना देण्यासाठी पीएमआरडीए कार्यालयाकडून भूखंडाचे जाहीर ई-लिलावाची प्रक्रिया केली जात आहे.  या ई-लिलाव प्रक्रियेद्वारे माण, बावधन बुद्रूक अशा २ गावांमधील एकूण ४ सुविधा भूखंडाची लिलाव प्रक्रिया पार पाडण्यात येत आहे. या भूखंडाचा वापर त्याच्या अनुज्ञेय वापरासाठी आरक्षित केलेला आहे. त्यामध्ये ई-लिलाव प्रक्रियेद्वारे या गावांमध्ये शाळा, दवाखाने, क्रीडांगण, व्यायामशाळा, पोस्ट कार्यालय, पार्किंग, कचरा व्यवस्थापन, जलशुद्धीकरण केंद्र व इतर सुविधा निर्माण करण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे, असे याद्वारे आवाहन पीएमआरडीएच्या करण्यात येत आहे. ई-लिलाव पद्धतीत समाविष्ट भूखंडाची किंमत व इतर सर्व सविस्तर माहिती पीएमआरडीएच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहे. या संकेतस्थळावर निविदाधारक यांच्यासाठी १९ नोव्हेंबरपासून नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या निविदा सादर करण्यास २८ नोव्हेंबरपर्यंत कागदपत्रे व शुल्क भरण्यासाठी मुदत दिलेली आहे. निविदेबाबत शंकेचे निरसन करण्यासाठी बैठक २० नोव्हेंबर रोजी दुपारी ४ वाजता पीएमआरडीए, आकुर्डी कार्यालयामध्ये आयोजित करण्यात येणार आहे. सदर निविदेची ई-लिलाव प्रक्रिया ४ डिसेंबर रोजी सकाळी ११ ते सायकाळी ५ वाजेपर्यंत करण्यात येणार आहे. कोटउपरोक्त नमूद सुविधा भूखंड अनुज्ञेय वापरासाठी ई-लिलाव पद्धतीने दीर्घ मुदतीच्या भाडेपट्टयाने दिले जातील. या सुविधा भूखंडाच्या वापरामुळे संबंधित गावांचा जलद विकास होण्यास मदत होईल व पायाभूत सोईसुविधा निर्माण होण्यास मदत होईल. ई-लिलावामध्ये सहभागी होण्यास नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे.- किरण गित्ते, आयुक्त, पीएमआरडीए

टॅग्स :PuneपुणेPMRDAपीएमआरडीएKiran Gitteकिरण गित्ते