शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajit Pawar Naresh Arora: नरेश अरोरा यांच्या कार्यालयात क्राइम ब्रँचचे अधिकारी; अजित पवार म्हणाले, "तथ्यांच्या आधारेच..."
2
'मदत येत आहे, संस्था ताब्यात घ्या...'; इराणशी चर्चा रद्द करून ट्रम्प यांनी निदर्शनांना भडकावले
3
भाजपा मुख्यालयात BJP नेते आणि चीनच्या CPC शिष्टमंडळाची बैठक; काँग्रेसचा खळबळजनक दावा
4
ZP Election in Maharashtra 2026: ९ लाख ते ६ लाख, झेडपी निवडणुकीत कोणत्या उमेदवाराला किती खर्च करता येणार?
5
कतारमधील अमेरिकन हवाई तळावर हालचाली वाढल्या! डोनाल्ड ट्रम्प इराणविरुद्ध कारवाई करण्याच्या तयारीत?
6
इराणमध्ये अराजकता! २००० हून अधिक लोकांचा मृत्यू, सरकारने पहिल्यांदाच सत्य केले मान्य
7
थंडीची लाट! हृदय आणि फुफ्फुसांवर परिणाम, एम्सच्या डॉक्टरांनी दिला सतर्कतेचा इशारा
8
अजित पवारांच्या राजकीय सल्लागारावर पोलीस कारवाई; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी पुण्यात मोठी घडामोड
9
Maharashtra ZP Election 2026 Date: मोठी बातमी! राज्यातील १२ जिल्हा परिषदा, १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकीची घोषणा, ५ फेब्रुवारीला मतदान
10
पुन्हा निवडणूक! महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यातील किती पंचायत समित्यांसाठी रंगणार 'रणसंग्राम'?
11
महापालिका निवडणुकीत नेत्यांची प्रतिष्ठा लागणार पणाला! भाजप विरुद्ध काँग्रेस, शिंदेसेना, उद्धवसेना, एमआयएम
12
'निवडणूक आयोग BJP च्या AI टूल्सचा वापर करतोय', SIR वर ममता बॅनर्जींचा संताप
13
Viral Video: लेकीच्या मॉइश्चरायझरची किंमत ऐकून वडिलांची उडाली झोप, व्हिडीओ शेवटपर्यंत पाहा!
14
अबब! फक्त ४ जणांच्या टीमला Open AI नं ९०० कोटींना खरेदी केले; आता ChatGPT देणार हेल्थ रिपोर्ट
15
राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचं एकत्रिकरण होणार का? प्रचार संपत असताना अजित पवारांचं मोठं विधान
16
चांदीपासून सावधान...! येणार मोठी घसरण...? रॉबर्ट कियोसाकी यांचा मोठा इशारा
17
केरळ राज्याचे नाव बदलले जाणार? राजीव चंद्रशेखर यांचे पीएम मोदी व सीएम पिनराई विजयन यांना पत्र
18
अबू सालेम मोठा गुन्हेगार, फक्त २ दिवसांचा पॅरोल शक्य; राज्य सरकारची कोर्टात स्पष्ट भूमिका
19
‘...ती एक मनपा वगळता २९ पैकी २८ महानगरपालिका महायुती जिंकणार’, चंद्रकांत पाटील यांचा मोठा दावा 
20
सामान्यांचे घराचे स्वप्न स्वस्त होणार? अर्थसंकल्पात रिअल इस्टेट क्षेत्राचे सरकारकडे साकडे!
Daily Top 2Weekly Top 5

दसऱ्याला घर, वाहन खरेदीला पसंती; सोन्याचे दर चढे; तरीही सोने खरेदीचा उत्साह कायम

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2025 12:52 IST

साडेतीन मुहूर्तावर सोने खरेदी केल्यास सोने वृद्धिंगत होते असे म्हणतात. सध्या सोनं आणि चांदीच्या किमती लाखाच्या घरात असूनही, नागरिकांचा सोने खरेदीचा उत्साह कमी झालेला नाही.

पुणे : 'दसरा' हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे. दसऱ्याचा मुहूर्त कोणत्याही प्रकारच्या नवीन खरेदीसाठी अतिशय शुभ मानला जातो. उद्या ( दि. २) दसऱ्याचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यासाठी नवीन घरासह ऑफिस आणि वाहन खरेदीला नागरिकांनी पसंती दर्शविली आहे. हिंदू धर्मात साडेतीन मुहूर्तांवर सोने व चांदीच्या खरेदीला खूप महत्त्व आहे. यंदा सोन्याचे दर गगनाला भिडले असूनही, सराफी बाजारपेठेत सोने खरेदीसाठी उत्साहाचे वातावरण आहे.

साडेतीन मुहूर्तावर सोने खरेदी केल्यास सोने वृद्धिंगत होते असे म्हणतात. सध्या सोनं आणि चांदीच्या किमती लाखाच्या घरात असूनही, नागरिकांचा सोने खरेदीचा उत्साह कमी झालेला नाही. नाणे आणि बार्समध्ये गुंतवणुकीची मागणी वाढली आहे. हिऱ्यांच्या दागिन्यांमध्येही उत्सवापूर्वी मागणी वाढताना दिसत आहे. तसेच हलक्या वजनातील आणि डिझायनर प्रकारातील दागिन्यांची मागणी वाढली आहे. दसऱ्याच्या आधीच बुकिंग फुल्ल झाले असल्याचे सराफी व्यावसायिकांकडून सांगण्यात आले आहे.

दरम्यान, दसऱ्याच्या पूर्वसंध्येला शहरातील प्रमुख बाजारपेठांमध्ये विविध वस्तूंच्या खरेदीसाठीही गर्दी झाल्याचे चित्र दिसून आले. आपट्याची पाने सोनं म्हणून देण्याची परंपरा आहे. त्यामुळे रस्त्यावरील विक्रेत्यांकडून आपट्याच्या पानांसह, झेंडूच्या फुलांची खरेदी करताना नागरिक दिसत होते. मंदिरांमध्येही सजावट सुरू होती. सायंकाळी घराघरांमध्ये आंब्याच्या पानांची तोरणं लावली जात होती. गोड पदार्थ कोणता करायचा किंवा आणायचा याबाबतही कुटुंबामध्ये चर्चा सुरू होत्या. श्रीखंड, पुरणपोळी, बासुंदी यासारख्या पारंपरिक खाद्यपदार्थांची ऑर्डर मिठाई विक्रेत्यांना दिली जात होती.

दसऱ्याच्या दिवशी सोने किंवा दागिने खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते. यावर्षी हा सण महिन्याच्या सुरुवातीलाच आल्याने, विक्रीत चांगली गती राहील अशी शक्यता आहे. हलक्या वजनाच्या दागिन्यांच्या बुकिंग्सना देखील उत्तम प्रतिसाद आहे, तर जुने सोने बदलून नवीन सोने खरेदी करण्याकडे देखील ग्राहकांचा कल आहे. ज्याचा विक्रीत जवळपास ५० ते ५५ टक्के इतका वाटा आहे. एकूणच, या हंगामाची सुरुवात अत्यंत सकारात्मक वातावरणात होत आहे. - डॉ. सौरभ गाडगीळ, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, पीएनजी ज्वेलर्स

नवरात्रानंतर सोन्या-चांदीच्या भावामध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. गेल्या आठ दिवसांत सोन्याचे भाव तब्बल ८,००० रुपये प्रति दहा ग्रॅमने तर चांदीचे भाव १८ हजार रुपये प्रतिकिलोने वाढले आहेत. दसरा-दिवाळीनंतर आतापर्यंत सोन्या-चांदीच्या दरात जवळपास ५५ टक्क्यांची वाढ झाली आहे. गेल्यावर्षी चांदीचा भाव ९३ हजार रुपये प्रतिकिलो होता, तर सध्या तो १ लाख ४८ हजार रुपये प्रति किलो झाला आहे. त्याचप्रमाणे, सोन्याचा दर गेल्यावर्षी ७६ हजार रुपये प्रति दहा ग्रॅम होता, तर आता तो १ लाख १७ हजार रुपये प्रति दहा ग्रॅम झाला आहे. ग्राहकांकडून या वाढलेल्या दरांनाही उत्तम प्रतिसाद मिळत असून, सोन्या-चांदीची खरेदी मोठ्या प्रमाणावर होत आहे. - अमित मोडक, पी.एन.जी. अँड सन्स“दसरा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त असल्याने सोन्याला विशेष मागणी आहे. सध्या सोन्याचा दर १,२०,००० रुपये (जीएसटीसह) आहे. विशेषतः वेढणी, नाणे (कॉइन्स) आणि इतर दागिन्यांना ग्राहकांची पसंती मिळत आहे. दसऱ्याच्या आधीच बुकिंग फुल्ल झाले आहे. कमी वजनाचे दागिने आणि वेढणी यांना जास्त मागणी आहे. - फत्तेचंद रांका, रांका ज्वेलर्स 

 सध्या सोन्याचे दर जास्त असले तरी ग्राहकांचा उत्साह कमी झालेला नाही. हलक्या वजनातील आणि डिझायनर प्रकारातील दागिन्यांना मागणी वाढली आहे.  - अतुल अष्टेकर, के.आर. अष्टेकर ज्वेलर्स

English
हिंदी सारांश
Web Title : Dussehra Favors Home, Vehicle Buys; Gold Prices High, Enthusiasm Remains

Web Summary : Dussehra sees surge in home, vehicle purchases despite high gold prices. Demand for lightweight, designer jewelry, coins persists. Jewelers report full bookings, strong sales. Tradition thrives with festive decorations and sweets.
टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड