ऐन सणासुदीच्या-निवडणुकीच्या काळात मावळ हादरले! पवन मावळातील ३० वर्षीय तरुणाची दगडाने ठेचून हत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2024 17:44 IST2024-11-01T17:43:35+5:302024-11-01T17:44:01+5:30
घटनेची माहिती मिळाल्यानंतर लोणावळा ग्रामीणचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांचे पथक सकाळपासूनच घटनास्थळाची पाहणी करत असून पुढील तपास सुरू आहे.

ऐन सणासुदीच्या-निवडणुकीच्या काळात मावळ हादरले! पवन मावळातील ३० वर्षीय तरुणाची दगडाने ठेचून हत्या
मावळ तालुका भारतीय जनता पार्टी विद्यार्थी आघाडीचे सरचिटणीस निलेश दत्तात्रय कडू (वय.३० रा. सावंतवाडी, ता.मावळ) यांची हत्याराने आणि दगडाने ठेचून निर्घृण हत्या केल्याची घटना घडली आहे. ही घटना दि.३१ ऑक्टोंबरला मावळ तालुक्यातील महागाव ग्रामपंचायत हद्दीतील प्रभाचीवाडी गावाच्या प्रवेशद्वाराशेजारील मोकळ्या जागेवर रात्रीच्या सुमारास घडली. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर लोणावळा ग्रामीणचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांचे पथक सकाळपासूनच घटनास्थळाची पाहणी करत असून पुढील तपास सुरू आहे. तर अवघ्या काही तासात पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यातही घेतले आहे. अजून काही आरोपींचा शोध लोणावळा ग्रामीण पोलीस करत आहे. मृतदेह श्ववच्छदेनेसाठी तळेगांव दाभाडे येथे नेण्यात आला आहे.