शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

लाॅकडाऊनच्या काळात हॅकर्सचे आहे तुमच्या साेशल मीडया अकाऊंटकडे लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2020 18:10 IST

लिंक पाठवून ओटीपी विचारुन साेशल मीडिया हॅक केले जात असल्याचे प्रकार समाेर आले असून नागरिकांनी सावध राहण्याचे आवाहन पाेलिसांनी केले आहे.

पुणे : लॉकडाऊनच्या काळात सगळेजण घरात बसून आहे. दिवसभरातला बराचसा वेळ मोबाईलवर व्हाट्सअप वर चॅट करण्यात जात आहे, तर फेसबुक किंवा इन्स्टंग्रामवर फोटो अपलोड करण्यात जातो आहे. मात्र यासगळ्यात आपले व्हाट्स अप अकाऊंटचा एक्सेस हा हॅकर्सकडे तर नाही ना ? याची खात्री प्रत्येकाने करने गरजेचे आहे. पुणे सायबर पोलिसांकडे सध्या लॉकडाऊनच्या दरम्यान 5 तक्रारी आल्या आहेत. यामुळे सायबर प्रशासनाने सावधान राहण्याचे आवाहन केले आहे. 

सद्यस्थितीत व्हॉट्सऍप हॅकिंग चे प्रमाण खूप वाढलेले आहे सध्या देशभरात चालू असलेल्या लोक डाऊन मुळे घरातील लोक जास्तीत जास्त ऑनलाईन असून त्यामध्ये सोशल मीडियाचा वापर वाढला आहे नेमक्या याच परिस्थितीचा फायदा घेऊन स्वयंघोषित हॅकर किंवा सायबर चोरटे हे फेसबुक इंस्टाग्राम व्हाट्सअप यावर त्यांचे स्वतःचे लोकीं पिठ तयार करीत आहेत. येथे फेसबुक मेसेंजर किंवा इंस्टाग्राम मेसेंजर किंवा व्हाट्सअप यावर पाठवित आहेत आणि त्याद्वारे व्यक्तीच्या अकाउंट रजिस्ट्रेशन चा ओटीपी नंबर विचारात करून घेता ज्या व्यक्ती आपला ओटीपी नंबर अशा हॅकर्सना शेअर करतात त्यांचा व्हाट्सअप अकाउंट हॅकर्सच्या ताब्यात जातो. अशा प्रकारच्या पाच तक्रारी सायबर पोलीस स्टेशन येथे प्राप्त झाले आहे 

अकाऊंट कशाप्रकारे हॅक केले जाते...व्हाट्सअप अकाउंटचा एक्सेस घेण्यासाठी सायबर चोरटे त्यांच्या मोबाईलवर बिझनेस व्हाट्सअप डाउनलोड करतात. त्यावर ज्या व्यक्तीच्या अकाउंटचा एक्सेस घ्यायचा आहे त्याचा मोबाईल नंबर टाकून एक्टिवेशन ची लिंक तयार केली जाते. आणि ती संबंधित व्यक्तीला पाठवून त्याला ओटीपी नंबर विचारला जातो. ओटीपी नंबर आणि ओटीपी शेअर झाला की त्याचा एक्सेस हॅकर कडे जातो. त्याच्या संपर्कातील सर्व मोबाईल नंबर वर हीच लिंक पुढे पाठवून एकाच वेळी अनेक अकाउंट हॅक केली जातात. आणि त्याद्वारे ज्यांच्या अकाउंट हॅक झाले आहे त्यांच्या नावाने त्यांच्याकडून लिस्टमधील मित्रपरिवार नातेवाईक यांच्याकडे पैसे मागितले जातात. किंवा घाणेरडे मेसेज पाठवून धमकी दिली जाते. 

फेसबुक इंस्टाग्राम व्हाट्सअप यासाठी जनरेट होणारे ओटीपी नंबर कोणालाही शेअर करू नका याबाबतचा आपला सोशल मीडियावर जो मेसेज आलेला असेल त्याकडे दुर्लक्ष करा आणि सोबतच two-step व्हेरिफिकेशन तत्काळ आपल्या सोशल मीडिया अकाउंट साठी करून घ्या. कोणालाही आपला ओटीपी नंबर शेअर करू नका किंवा त्याबाबत आलेली लिंक शेअर करू नका याशिवाय लोक डाऊन चालू असलेल्या परिस्थितीमध्ये वेगवेगळ्या फेक लिंक फिरत असल्याचे समोर आले आहे यामध्ये महापालिकेकडून जनतेच्या आरोग्य विषय सर्वे करत असलेल्या पाठवलेल्या लिंकद्वारे तुमची वैयक्तिक माहिती वय नाव पत्ता व्यवसाय त्यांची माहिती विचारात घेऊन त्याचा फसवणूक व दुरुपयोग केला जाण्याची शक्यता असल्याचे आर्थिक व सायबर गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त संभाजी कदम यांनी सांगितले.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसWhatsAppव्हॉट्सअ‍ॅपfraudधोकेबाजीcyber crimeसायबर क्राइम