उन्हाच्या झळांमुळे राज्यात विजेची मागणी २६ हजार ९४७ मेगावॉटवर; कूलर, पंखे, फ्रीज यांचा वापर वाढला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2026 13:49 IST2026-03-12T13:47:49+5:302026-03-12T13:49:27+5:30

राज्यात विजेची मागणी मागील आठवड्यात २५ हजार ७७१ मेगावॉट होती. त्यानंतर ती २५ हजार ४५८ मेगावॉटवर पोहोचली.

Due to the heatwave, the demand for electricity in the state reached 26,947 MW; the use of coolers, fans, and fridges increased | उन्हाच्या झळांमुळे राज्यात विजेची मागणी २६ हजार ९४७ मेगावॉटवर; कूलर, पंखे, फ्रीज यांचा वापर वाढला

उन्हाच्या झळांमुळे राज्यात विजेची मागणी २६ हजार ९४७ मेगावॉटवर; कूलर, पंखे, फ्रीज यांचा वापर वाढला

पुणे: राज्यात ऐन मार्च महिन्यातच उन्हाचा चटका वाढला आहे. विजेच्या मागणीत वाढ झाली आहे. जानेवारी, फेब्रुवारी महिन्यांत सुमारे २४ ते २५ हजार मेगावॉटच्या आसपास विजेची मागणी होती. ती आता २६ हजार ९४७ मेगावॉटवर पोचली आहे. पुण्यातही मागणी वाढणार असून ती ५ हजार मेगावॉट होण्याचा अंदाज आहे.

राज्यात मार्चच्या पहिल्या आठवड्यापासून उन्हाचा तडाखा चांगलाच वाढला आहे. विशेषत: विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, तसेच कोकणच्या काही भागांत हा तडाखा वाढला आहे. त्यामुळे कमाल तापमानाचा पारा ४० अंशांवर पोचला आहे. त्यामुळे वातानुकूलित यंत्राचा वापर घरासह व्यावसायिक, औद्योगिक ठिकाणी वाढला आहे. त्यामुळे अचानक राज्यात मागील काही दिवसांपासून विजेची मागणी वाढली आहे. वाढत्या विजेच्या मागणीमुळे त्याची पूर्तता करण्यासाठी वीज कंपन्यादेखील सरसावल्या आहेत. त्यामुळे २६ ते २७ हजार मेगावॉट एवढी वीज पुरवठा करणे शक्य होऊ लागले आहे. उन्हाच्या झळा वाढल्यानंतर ही मागणी अजून वाढत जाणार आहे, असे महावितरणच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

जानेवारीत आतापर्यंतची सर्वाधिक मागणी

राज्यात विजेची मागणी मागील आठवड्यात २५ हजार ७७१ मेगावॉट होती. त्यानंतर ती २५ हजार ४५८ मेगावॉटवर पोहोचली. या वर्षातील आतापर्यंतची सर्वाधिक वीज मागणी १४ जानेवारी रोजी २७ हजार १८७ मेगावॉट इतकी होती.

पुण्यातही मागणी वाढणार

पुणे, पिंपरी चिंचवड आणि जिल्ह्यात उन्हाची तीव्रता वाढली असून आखातातही युद्धाचा भडका उडाला आहे. या स्थितीमुळे गॅसटंचाई निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील नागरिकांचा इलेक्ट्रिक शेगड्या खरेदी करण्याकडे कल वाढलेला आहे. त्यामुळे शहरातील विजेची मागणी वाढत जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, पुणे परिमंडलात सध्या ४ हजार ६०० मेगावॉट विजेची मागणी असून त्यात ३०० ते ४०० मेगावॉटपर्यंत वाढण्याची शक्यता आहे, असे मत महावितरणच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केले.

या गॅस शेगड्यांमुळे शहर परिसरात विजेची मागणी वाढण्याची शक्यता जास्त आहे. सध्या पुणे परिमंडलात कमाल ४ हजार ६०० मेगावॉट विजेची मागणी आहे. मात्र, उन्हाळा आणि गॅस टंचाईच्या पार्श्वभूमीवर ही मागणी ५ ते १० टक्के अर्थात ३०० ते ४०० मेगावॉटने वाढण्याची शक्यता आहे. अशी माहिती महावितरणच्या पुणे परिमंडलातील अधिकाऱ्यांनी दिली.

Web Title : गर्मी की लहर से महाराष्ट्र में बिजली की मांग बढ़ी; उपकरणों का उपयोग बढ़ा।

Web Summary : गर्मी की लहर और उपकरणों के बढ़ते उपयोग के कारण महाराष्ट्र में बिजली की मांग 26,947 मेगावाट तक पहुंच गई। गैस की कमी के बीच पुणे की मांग 5,000 मेगावाट तक बढ़ने की उम्मीद है। इलेक्ट्रिक स्टोव के बढ़ते उपयोग से भी वृद्धि हो रही है।

Web Title : Heatwave causes surge in Maharashtra's power demand; usage of appliances rises.

Web Summary : Maharashtra's power demand hits 26,947 MW due to the heatwave and increased appliance use. Pune's demand is expected to rise to 5,000 MW amid gas shortages. Increased electric stove use is also contributing to the surge.