शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

पुस्तकखरेदीच्या बंधनामुळे मनस्ताप

By admin | Updated: June 17, 2015 23:27 IST

इंग्रजी माध्यमाच्या शाळांकडून मनमानी पद्धतीने शुल्क वसूल करून पालकांची लूट केली जाते. त्यात शहरातील काही शाळांनी ठराविक दुकानांमधूनच

पिंपरी : इंग्रजी माध्यमाच्या शाळांकडून मनमानी पद्धतीने शुल्क वसूल करून पालकांची लूट केली जाते. त्यात शहरातील काही शाळांनी ठराविक दुकानांमधूनच विद्यार्थ्यांची पुस्तके खरेदी करावीत, असे बंधन घातले आहे. परंतु, या पुस्तक विक्रीच्या दुकानांमध्ये पुस्तकेच उपलब्ध नसल्यामुळे अनेक विद्यार्थी पुस्तकांपासून वंचित आहेत.पूर्वप्राथमिक शाळांसह शहरातील इंग्रजी माध्यमाच्या शाळा सोमवारी सुरू झाल्या असून, सीबीएसई व आयसीएसई बोर्डाच्या माध्यमिक शाळाही काही दिवासांपासून सुरू झाल्या आहेत. मात्र, या विद्यार्थ्यांनी ठराविक दुकानांतूनच गणवेश घ्यावा तसेच पुस्तकांची खरेदी करावी, असे बंधन घातले जाते. त्यासाठी पालकांना संबंधित दुकानाचे माहिती पत्र दिले जाते. परिणामी दुकानदाराने सांगितलेल्या किमतीत पालकांना गणवेशाची आणि पुस्तकांची खरेदी करावी लागते. तर, काही शाळा या पालकांना शाळेतूनच पुस्तकांची विक्री करतात. आमच्या शाळेची पुस्तके दुसऱ्या ठिकाणी विक्रीसाठी उपलब्ध नाहीत, असे शाळा प्रशासनाकडून पालकांना सांगितले जाते. सीबीएसई व आयसीएसई बोर्डांच्या शाळांची अनेक पुस्तके अद्याप बाजारात उपलब्ध झालेली नाहीत. गणित, इंग्रजी, विज्ञान, हिंदी या ठराविक विषयांची पुस्तकेच बाजारपेठेत उपलब्ध आहेत. सीबीएसई व आयसीएसई बोर्डांच्या शाळा सुरू होऊन एक महिना होत आला; मात्र अद्याप पालकांना बाजारात पुस्तके मिळत नाहीत. तसेच शाळेकडून ठराविक दुकानांमधून पुस्तकांची खरेदी करण्याचे बंधन घातल्यामुळे संबंधित दुकानात गेल्यास पालकांना पुस्तके मिळत नाहीत. (प्रतिनिधी)कोणतीही शाळा पालकांवर ठराविक दुकानांमधून पुस्तके अथवा गणवेश खरेदी करण्याचे बंधन घालत असेल, तर पालकांनी पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडे याबाबत तक्रार करावी. त्यानुसार शिक्षण अधिकाऱ्यामार्फत संबंधित शाळेवर कडक कारवाई केली जाईल.-रामचंद्र जाधव, शिक्षण उपसंचालक, पुणे