खातेवाटप होत नसल्याने पुण्यात महामेट्रोचीही अडचण

By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2019 09:17 PM2019-12-09T21:17:08+5:302019-12-09T21:17:52+5:30

पुण्याला पालकमंत्री नाही व मुख्यमंत्र्यांना लगेचच बोलावता येणार नाही..

Due to lack of minister post, the difficulty in Mahametro work in Pune | खातेवाटप होत नसल्याने पुण्यात महामेट्रोचीही अडचण

खातेवाटप होत नसल्याने पुण्यात महामेट्रोचीही अडचण

Next
ठळक मुद्देकार्यक्रमाविनाच काम सुरू : ठेकेदार कंपनीचाच पुढाकार

पुणे: मंत्रिमंडळात खातेवाटपच होत नसल्याने महामेट्रो कंपनीची पुण्यात चांगलीच अडचण झाली आहे. पुणेमेट्रो प्रकल्पातील सर्वाधिक चचेर्चा विषय असलेल्या भूयार खोदण्याच्या कामाला कोणाला बोलवायचे असा प्रश्न पडल्यामुळे अखेर कोणालाच नको, असे म्हणत ठेकेदार कंपनीने त्यांच्याच वरिष्ठांच्या उपस्थितीत सोमवारी सकाळी कामाला सुरूवातही केली. राजकीय वादात पडायला नको म्हणून असा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती मिळाली.
पुण्याला पालकमंत्री नाही व मुख्यमंत्र्यांना लगेचच बोलावता येणार नाही, स्थानिक नेत्यांना बोलावून राजकारणात कशाला पडायचे अशा विचाराने साध्याच कार्यक्रमाने अखेर या कामाला सुरूवात झाली. टाटा प्रोजेक्टस या ठेकेदार कंपनीनेच त्यासाठी पुढाकार घेतला. कृषी महाविद्यालय मैदानापासून महाप्रचंड टनेल बोअरिंग मशीनच्या(टीबीएम) कामाला हिरवा झेंडा दाखवून काम सुरू करण्यात आले. पहिल्या कास्टिग स्लॅबवर (भूयाराचे सिमेंट काँक्रिटचे आच्छादन) कंपनीच्या वरिष्ठ अधिकाºयांना स्वाक्षºया करून कार्यक्रमाची आठवण संस्मरणीय करून ठेवली. पुण्यातील कोणीही पदाधिकारी अथवा राजकीय व्यक्ती यावेळी उपस्थित नव्हत्या.
कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक विनायक देशपांडे म्हणाले, लखनौ मेट्रो, मुंबई मेट्रो आणि त्यानंतर आता तिसºया पुणे मेट्रोचे भुयारी काम करण्याची संधी मिळाली आहे. यापुर्वीच्या कामाचा अनुभव गाठीशी असल्याने पुण्यातील कामात कोणताही अडचण निर्माण होणार नाही. कंपनीच्या नागरी पायाभूत सुविधा विकास विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शाह म्हणाले, अशा कामांसाठी लागणारे उच्च कौशल्य तसेच मनुष्यबळ, तांत्रिक बळ कंपनीकडे आहे. त्यामुळे खोदकाम मध्यवस्तीत होणार असले तरी त्याचा जमीनीवरील इमारतींना कसलाही त्रास होणार नाही.
टीबीएम यंत्रांची लांबी सुमारे २७९ फूट आहे. त्याच्या कटरचा व्यासच ६.५ मीटरचा आहे. तेवढ्याच व्यासाचे भूयार ते खोदणार आहे. खोदकामात निघणारे राडारोडा (डेब्रीस) यंत्रामधूनच मागे येणार असून तो थेट मालमोटारीत भरला जाईल. त्याचबरोबर कटर खोदकाम करत पुढे जात असतानाच खोदलेल्या भागावर टीबीएम द्वारेच काँक्रिटचे आच्छादन टाकले जाईल. त्यासाठी प्री कास्ट स्लॅब तयार करण्यात आल्या आहेत. जमिनीच्या खाली ६५ ते ७० फूट खोदाई केली जाणार असून हा भूयारी मार्ग शिवाजीनगर ते स्वारगेट असा ५ किलोमीटर अंतराचा आहे. यात भूयारातच ५ मेट्रो स्थानके आहेत. 

Web Title: Due to lack of minister post, the difficulty in Mahametro work in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.