शहरं
Join us  
Trending Stories
1
आता मनसे काँग्रेसचे चिन्ह पंजा काढून घेणार? निवडणूक आयोगाकडे धाव, प्रकरण काय?
2
शांतीगिरी महाराजांनी शिवसेनेच्या नावाने उमेदवारी अर्ज भरला; भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
3
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
4
"नरेंद्र मोदींच्या जागी राहुल गांधी पंतप्रधान असते तर..."; नेमकं काय म्हणाले आसामचे मुख्यमंत्री?
5
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
6
'त्यांना कशाला घेता, आम्हीच तुमच्यासोबत येतो; उद्धव ठाकरेंचा दिल्लीला फोन'; शिंदेंचा गौप्यस्फोट
7
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
8
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
9
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
10
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज
11
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
12
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
13
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
14
अमेठीमध्ये बसपाने उतरवला उमेदवार? भाजपा की काँग्रेस, कुणाचं गणित बिघडवणार?  
15
PHOTOS: IPS पदाचा राजीनामा देऊन लोकसभेच्या 'रिंगणात', सामाजिक कार्यासाठी मैदानात!
16
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
17
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी लावा नवीन तुळस; होतील अगणित फायदे!
18
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परबची गगनभरारी, अभिनेत्रीने खरेदी केलं हक्काचं घर
19
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
20
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे

आयटीआय फीसाठी पैसे नसल्याने तरुणाने जीवनयात्राच संपवली

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2018 11:51 PM

डिझेल मॅकनिक होण्याचे स्वप्न उराशी बाळगून फीची रक्कम नसल्यामुळे गळफास घेत साईनाथने आपला जीवनप्रवास संपविला. मुळातच मामाच्या ब्लॉक पिस्टन रीबोरिंग गॅरेजमध्ये फिटर मदतनीस म्हणून तो काम करीत होता.

भिगवण : आयटीआय प्रवेश मिळूनही फीसाठी पैसे नसल्याच्या कारणाने १८ वर्षांच्या तरुणाने गळफास घेत जीवन संपविले. ही धक्कादायक घटना इंदापूर तालुक्यातील मदनवाडी येथे शुक्रवारी (दि. २४) सकाळच्या सुमारास घडली. याच आठवड्यात दुसऱ्या तरुणाने आत्महत्येचा मार्ग निवडल्याने परिसरातील पालकांनी हळहळ व्यक्त करीत धास्ती घेतल्याचे दिसून येत आहे.

भिगवण पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार : चिंतामणी नाना सोनावणे (रा. मदनवाडी) यांनी याबाबत खबर दिली आहे. त्यांचा भाचा साईनाथ राजेंद्र पोपळघट (वय १८) असे गळफास लावून आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. दहावी पास झाल्यामुळे भिगवण येथील थोरात हायस्कूल येथे आयटीआयसाठी साईनाथने महिन्याभरापूर्वी प्रवेश घेतला होता. गेल्या आठवड्यापासून साईनाथ आपले मामा आणि आई यांना शाळेची फी भरण्यासाठी पैशाची मागणी करीत होता. मामाच्या घराची आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे आणि आई पुणे येथे धुण्या-भांड्याची कामे करून गुजराण करीत असल्यामुळे आपणाकडे फी देण्याइतके पैसे जमा झाले की लगेच फी भरू, असे सांगत आठवडा लोटल्यानंतरही पैसे न मिळाल्याने अखेर साईनाथ यानेअसे टोकाचे पाऊल उचलले, अशी माहिती समोर येत आहे. याच आठवड्यात गिरीश संजय गरगडे (वय २०) याने मदनवाडी-बारामती रस्त्यावरील ढवळे यांच्या विहिरीत उडी घेत आपले जीवन संपविल्याची घटना घडली आहे.डिझेल मॅकनिक होण्याचे होते स्वप्नडिझेल मॅकनिक होण्याचे स्वप्न उराशी बाळगून फीची रक्कम नसल्यामुळे गळफास घेत साईनाथने आपला जीवनप्रवास संपविला. मुळातच मामाच्या ब्लॉक पिस्टन रीबोरिंग गॅरेजमध्ये फिटर मदतनीस म्हणून तो काम करीत होता. १२ वर्षांपूर्वी साईनाथचे वडील त्याची आई आणि १६ वर्षांच्या बहिणीला सोडून अचानक निघून गेल्याने त्यांचे कुटुंब उघडे पडले. साईनाथच्या आईने मुलांची पोटाची खळगी भरावी यासाठी मिळेल ते काम करून संसार चालवीत आपल्या भावाकडे मुलांना शिक्षणासाठी ठेवले होते.साईनाथने १० वी पास होताच मामाच्या गॅरेजमध्ये काम करत डिझेल मॅकनिक होण्याचे स्वप्न पाहत भिगवण येथील थोरात औद्योगिक शाळेत प्रवेश घेतला होता. फीसाठी पैैसे नसल्याने साईनाथ बारामती येथील मोठ्या दुकानात काम करत पुढील शिक्षण पूर्ण करण्याचा विचार आईशी बोलला होता. आईने त्याच्या काळजीपोटी त्याला परवानगी दिली नाही. त्यामुळे आपले स्वप्न पूर्ण होणार नाही याने तो निराश होता. त्याने दिवसभर भेटणाºया प्रत्येकाला अदबीने आणि हसऱ्या चेहऱ्याने फीबाबत होत असलेल्या अडचणीची माहिती दिली. तर मामाला अनेक वेळा फी मागूनही ती न दिल्यामुळे अखेर साईनाथने या जगाचाच निरोप घेतला.

टॅग्स :Suicideआत्महत्याiti collegeआयटीआय कॉलेज