शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

आयटी हबमुळे पुण्यात घर घेण्याकडे वाढतोय कल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:17 IST

ग्राहकांची पसंती असलेल्या शहरातील भागांमध्ये सध्या घरांच्या किमती ४५०० ते ५२०० रुपये प्रति स्क्वेअर फूट इतक्या आहेत. औंध, बाणेर, ...

ग्राहकांची पसंती असलेल्या शहरातील भागांमध्ये सध्या घरांच्या किमती ४५०० ते ५२०० रुपये प्रति स्क्वेअर फूट इतक्या आहेत. औंध, बाणेर, बालेवाडी, हिंजवडी या भागात घरे घेण्याकडे ग्राहकांचा कल जास्त असतो. मात्र, येथील दर ५५०० रुपयांच्या घरात गेल्याने त्याचा खरेदीवर दूरगामी परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, सध्याची परिस्थिती पाहता प्रोजेक्टचा प्रकार, ठिकाण याप्रमाणे किमतीमध्ये तडजोड करण्याची तयारीही बांधकाम व्यावसायिकांकडून दाखवली जात आहे.

पुण्यात घरांच्या किमती कमी होण्याचे प्रमाण इतर शहरांच्या तुलनेत कमी आहे. बंगळुरूनंतर आजही रिअल इस्टेट क्षेत्रातील गुंतवणुकीमध्ये पुणे अग्रस्थानी आहे. पुण्यातील वातावरण, वाहतुकीच्या सुविधा, इतर शहरांशी असलेला ‘कनेक्ट’ यामुळे बाहेरगावाहून आलेले लोकही पुण्यात घर घेण्याला पसंती देतात, असे रिअल इस्टेट तज्ज्ञांचे म्हणणे आहे. इंडस्ट्रिअल हब, आयटी हब यामुळे शिक्षण, नोकरीसाठी पुण्यात येणा-यांचे प्रमाण लक्षणीय आहे. त्यामुळेच घरांच्या मागणीमध्ये सातत्याने वाढ होत आहे.

उपनगरांचा बराचसा भाग महानगरपालिकेमध्ये समाविष्ट झाल्याने तेथील गृह प्रकल्पांमध्येही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. वाघोली, च-होली, शिवणे, उत्तमनगर, कोल्हेवाडी, आंबेगाव, न-हे अशा अनेक ठिकाणी घरांमध्ये गुंतवणूक करण्याचे प्रमाण वाढले आहे. स्वत:च्या मालकीच्या दुचाकी, चारचाकींमध्ये वाढ झाल्याने उपनगरांमधून कामाच्या अथवा शिक्षणाच्या ठिकाणापर्यंत पोहोचणेही शक्य झाले आहे.

कोरोना काळानंतर पुन्हा आर्थिक उलाढाल वाढावी, ग्राहकांना गुंतवणुकीस चालना मिळावी, यासाठी बांधकाम व्यावसायिकांनी नवीन योजना बाजारपेठेत दाखल केल्या आहेत. ग्राहकांनी घर खरेदी करताना एकूण रकमेच्या ३० टक्के रक्कम भरावी आणि उर्वरित रक्कम घराचा ताबा मिळाल्यानंतर भरावी, अशा प्रकारच्या योजना जाहीर केल्या आहेत. ग्राहकही टाऊनशिप प्रोजेक्टना पसंती देत आहेत.