शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

अतिवृष्टीमुळे महावितरणचे पुणे विभागात सव्वापाचशे कोटींचे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2019 14:36 IST

सातारा, सोलापूर, नाशिक, ठाणे, पालघर, गडचिरोली, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या जिल्ह्यांसह राज्याच्या अनेक भागाला पुराचा मोठा तडाखा बसला.

ठळक मुद्देप्राथामिक अंदाज : चोवीस हजार रोहित्र झाली होती बाधित सांगली, कोल्हापूर, पुणे जिल्ह्यात सुमारे ४० जणांचा मृत्यू

पुणे : कोल्हापूर व सांगलीसह पुणे विभागात झालेल्या अतिवृष्टीमुळे ५२५ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज महावितरणने वर्तविला आहे. पुरामुळे सुमारे चोवीस हजार रोहित्र (ट्रान्सफॉर्मर) बाधित झाली होती. विद्युत मीटर, रोहित्र, विद्युत खांब, विद्युत वाहिन्या आणि उपकरणांच्या नुकसानी बरोबरच विद्युत पुरवठा बंद असल्यामुेळ झालेले महसुली नुकसानही मोठे आहे.कोल्हापूर, सांगली या दोन जिल्ह्यांना पुराचा सर्वाधिक तडाखा बसला होता. पुण्याच्या शहरी भागातील मुठा नदीलगतच्या वस्त्या, सोसायट्या व ग्रामीण भागातही मोठे नुकसान झाले. यासोबतच सातारा, सोलापूर, नाशिक, ठाणे, पालघर, गडचिरोली, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या जिल्ह्यांसह राज्याच्या अनेक भागाला पुराचा मोठा तडाखा बसला. यात लाखो कुटुंबांचे संसार उद्धवस्थ झाले. शेती, छोटे व्यवसाय, उद्योगधंदे बुडाले. हजारो कोटींची वित्तहानी झाली. सांगली, कोल्हापूर, पुणे जिल्ह्यात सुमारे ४० जणांचा मृत्यू झाला. हजारो मुकी जनावरेही वाहून गेली. महावितरणचे देखील सुमारे ५२५ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. यामध्ये प्रामुख्याने कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील महावितरणच्या यंत्रणेला मोठा तडाखा बसला. पश्चिम महाराष्ट्रात सुमारे ४५ उपकेंद्राातील ७५० कृषी व बिगरकृषी वीजवाहिन्यांवरील वीजयंत्रणेला फटका बसला. त्यामुळे सुमारे २३,८९० रोहित्रांमधून होणार विद्युत पुरवठा खंडित झाला. तर, त्यातील काही रोहित्रांचा वीज पुरवठा पूरस्थितीमुळे बंद करावा लागला. शहरी व ग्रामीण भागातील सुमारे ४ लाख ५० हजार बिगरकृषी व ३ लाख ४५ हजार कृषी अशा ७ लाख ९५ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा बंद पडला.सांगली व कोल्हापुरातील विद्युत वितरण सुरळीत करण्यासाठी पुणे, बारामती, सातारा व सोलापूर येथील अभियंता व कर्मचारी तसेच कंत्राटदारांचे कुशल कर्मचारी यांची ४५ पथके या भागात पाठविली होती. तसेच, इतर परिमंडलातून पॉवर ट्रॉन्सफॉर्मर, रोहित्रे, लोखंडी वीजखांब, वीजवाहिन्या, सिंगल फेज व थ्री फेजचे नवीन मीटर देखील पूरग्रस्त भागात उपलब्ध करुन दिले.पूरस्थिती ओसरल्यानंतर अवघ्या ५ ते सहा दिवसांत शहरी व ग्रामीण भागातील सर्वच ४ लाख ५० हजार बिगरकृषी ग्राहकांचा वीजपुरवठा पूर्ववत केला. अनेक पाणीपुरवठा योजना, प्राथमिक आरोग्य केंद्र, रुग्णालये, बसस्थानके, अग्निशामक दल, तात्पुते पुनर्वसन केंद्रांना प्राधान्याने पयार्यी व्यवस्थेतून वीजपुरवठा सुरु करण्यात आला. सुमारे २ लाख कृषिपंपाचाही वीजपुरवठा सुरु झाला आहे.-- 

टॅग्स :PuneपुणेmahavitaranमहावितरणRainपाऊसfloodपूर