शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

डीएसके विरोधात आता फ्लॅटधारकही सरसावले, तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात गर्दी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2017 22:35 IST

गुंतवणूकदारांची कोट्यवधींची फसवणूक केल्याप्रकरणी बांधकाम व्यावसायिक डी़ एस़ कुलकर्णी यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल झाल्यानंतर, आता वेळेवर फ्लॅटचा ताबा न मिळाल्याने त्रस्त झालेले फ्लॅटधारकही तक्रार देण्यासाठी पुढे आले आहेत

पुणे : गुंतवणूकदारांची कोट्यवधींची फसवणूक केल्याप्रकरणी बांधकाम व्यावसायिक डी़ एस़ कुलकर्णी यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल झाल्यानंतर, आता वेळेवर फ्लॅटचा ताबा न मिळाल्याने त्रस्त झालेले फ्लॅटधारकही तक्रार देण्यासाठी पुढे आले आहेत. अशा सुमारे २०० ते २५० लोकांनी बुधवारी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गर्दी केली होती़

धायरीतील डीएसके विश्वमध्ये आनंदघन फेज ६ मध्ये २०१३ मध्ये डीएसके यांनी बांधकाम सुरू केले होते़ या योजनेत सुमारे ४५० फ्लॅट असून, २०१३ पासून ही स्किम सुरू करण्यात आली़ या ठिकाणी त्यापैकी अनेकांना डिसेंबर २०१६ मध्ये ताबा मिळणार होता़ एकीकडे फ्लॅटचा ताबा नाही, दुसरीकडे फायनान्स कंपनीचे हप्ते सुरू झाल्याने त्रस्त झालेल्या फ्लॅटधारकांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गर्दी केली होती़ या ठिकाणी फ्लॅट घेतलेल्या धारकांनी सांगितले की, डीएसके यांनी आधी ताबा, नंतर हप्ते, अशी योजना आखली होती़ त्यात ताबा मिळेपर्यंत आम्ही हप्ता भरू, असे डीएसके यांनी सांगितले होते़ त्याप्रमाणे त्यांनी काही हप्ते भरलेही़ परंतु, फेब्रुवारीपासून हप्ते भरणे बंद केले़ त्यामुळे फायनान्स कंपनीने आमच्या खात्यातून हप्त्याची रक्कम कापून घेण्यास सुरुवात केली आहे़ दुसरीकडे आमच्या स्किममधील इमारतीचे काम वर्षभरापासून बंद पडले आहे़ ते कधी पूर्ण होईल याची काहीही शाश्वती नाही़ १५ नोव्हेंबरपासून काम सुरु करतो, असे आश्वासन डीएसके यांनी दिले होते़ त्याप्रमाणे मुंबई, पुणे व अन्य ठिकाणचे सुमारे ४०० फ्लॅटधारक बुधवारी साइटवर जमलो़ पण, तेथे केवळ गवत काढण्याचे काम सुरू होते़ बांधकाम सुरू झाले नव्हते म्हणून आम्ही कंपनीच्या कार्यालयात गेलो. पण, तेथे कोणतेही समाधानकारक उत्तर न मिळाल्याने शेवटी पोलीस ठाण्यात आल्याचे त्यांनी सांगितले़.

एका बाजूला राहायला हक्काची जागा नाही, त्यात फायनान्स कंपनीकडून हप्ते कापून घेण्यास सुरुवात झाल्याने आम्ही आर्थिक अडचणीत येऊ लागलो आहोत़ किमान घरांचा ताबा देईपर्यंत तरी हप्ते कापून घेऊ नका, असे फायनान्स कंपनीला सांगावे, अशी आम्ही विनंती केली़ डीएसके जबाबदारी झटकत नाही़ पण, प्रत्यक्षात काहीच करत नाही, अशी तक्रारही काही जणांनी यावेळी केली़या सर्वांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रभाकर शिंदे यांची भेट घेऊन आपली तक्रार सांगितली़ त्यांना शनिवारी आर्थिक गुन्हे शाखेत बोलविण्यात आले आहे़

याबाबत प्रभाकर शिंदे यांनी सांगितले की, डीएसके प्रकरणाच्या तपासासाठी आर्थिक गुन्हे शाखेत स्वतंत्र पथकाची निर्मिती केली आहे़ तेथील पोलीस निरीक्षक संजय कुरुंदकर हे मुंबईला असल्याने या सर्वांना शनिवारी त्यांची भेट घेऊन तक्रार देण्यास सांगितले आहे़गुंतवणूकदारांना त्यांच्या मुदत ठेवीची मुदत संपल्यानंतरही त्या परत न मिळाल्याने हजारो गुंतवणूकदारांनी आतापर्यंत शहर पोलीस दलातील आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रारी दिल्या असून, शिवाजीनगर पोलीस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे़ सत्र न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली असून, न्यायालयाने त्यांना शुक्रवारपर्यंत दिलासा दिला आहे़

डीएसके यांच्याविरोधात पुण्यातील आर्थिक गुन्हे शाखेकडे आत्तापर्यंत एकूण २६९२ गुंतवणूकदारांनी तक्रारी केल्या असून, त्यातील रक्कम १७० कोटींहून अधिक आहे. याशिवाय मुंबई आणि कोल्हापूर येथेही गुन्हे दाखल झाले आहेत.

टॅग्स :PuneपुणेCrimeगुन्हाPolice Stationपोलीस ठाणे