दौंडला रेल्वेत तरुणीची छेडछाड

By Admin | Updated: August 4, 2015 03:51 IST2015-08-04T03:51:13+5:302015-08-04T03:51:13+5:30

दौंड-पुणे प्रवास करीत असताना चेन्नई एक्स्प्रेसमध्ये एका तरुणीचा विनयभंग केल्या प्रकरणी पाच तरुणांविरोधात दौंड रेल्वे पोलिसांनी गुन्हा दाखल केला

The drunken woman raided the railways | दौंडला रेल्वेत तरुणीची छेडछाड

दौंडला रेल्वेत तरुणीची छेडछाड

दौंड : दौंड-पुणे प्रवास करीत असताना चेन्नई एक्स्प्रेसमध्ये एका तरुणीचा विनयभंग केल्या प्रकरणी पाच तरुणांविरोधात दौंड रेल्वे पोलिसांनी गुन्हा दाखल केला. सर्व आरोपी फरार झाले. शनिवारी चेन्नई एक्स्पे्रसमध्ये ही तरुणी बसली होती. या तरुणीला एका युवकाने बळजबरी धक्का मारला, यावर या तरुणीने या युवकाला जाब विचारला, तेव्हा त्याने उलट या तरुणीला लज्जा निर्माण होईल, असे वक्तव्य केले. त्यानंतर या तरुणाबरोबर असलेल्या अन्य चार तरुणांनी या तरुणीला लज्जा निर्माण होईल, असे वक्तव्य केले. त्यानंतर हा प्रकार पाहिल्यावर डब्यातील अन्य प्रवाशांनी या तरुणांना हुसकावून लावले. (वार्ताहर)

Web Title: The drunken woman raided the railways