दारूच्या नशेत धरली पोलिसाची कॉलर; नवले ब्रिजजवळील घटना, व्हिडिओ व्हायरल...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2025 10:36 IST2025-04-19T10:35:27+5:302025-04-19T10:36:46+5:30

मद्यप्राशन करून तरुणाकडून वाहतूक पोलिसांसोबत हुल्लडबाजी केल्याचे दिसून आले असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.

Drunk man grabs police collar incident near Navale Bridge video goes viral... | दारूच्या नशेत धरली पोलिसाची कॉलर; नवले ब्रिजजवळील घटना, व्हिडिओ व्हायरल...

दारूच्या नशेत धरली पोलिसाची कॉलर; नवले ब्रिजजवळील घटना, व्हिडिओ व्हायरल...

पुणे : पुण्यात सर्वत्र वाहतूक नियमाचे भंग करणाऱ्यांवर कारवाई सुरु आहे. मध्यवर्ती भागाबरोबरच उपनगरात पोलिसांकडून तपासणी सुरु आहे. अपघातांचे वाढते प्रमाण बघता वाहतूक शाखेकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. अशातच पुण्यातील नवले ब्रिजजवळ चक्क वाहतूक पोलिसांचीच कॉलर धरल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. वाहतूक पोलीसड्रंक अँड ड्राइव्ह ची चेकिंग करत असताना हा प्रकार घडला आहे.  

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे शहरात विविध ठिकाणी वाहतूक पोलिसांकडून नियम भंग करणाऱ्या वाहन चालकांवर करण्यात येत आहे, त्याप्रमाणे नवले ब्रिजजवळ वाहतूक पोलिसांकडून वाहनांची तपासणी करण्यात येत होती. त्यावेळी दारूच्या नशेत एका इसमाकडून चक्क वाहतूक पोलिसांनाच दमदाटी करत असल्याचे समोर आले आहे. कारवाईदरम्यान नवले ब्रिजवर ही घटना घडली आहे. मद्यप्राशन करून तरुणाकडून वाहतूक पोलिसांसोबत हुल्लडबाजी केल्याचे व्हिडिओमधून दिसते आहे. त्याला पुणे पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील कार्यवाही सुरु आहे. 

Web Title: Drunk man grabs police collar incident near Navale Bridge video goes viral...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.