शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

मद्यधुंद कंटेनर चालकाचा पराक्रम; २५ ते ३० वाहनांना उडविले, चाकण-शिक्रापूर राज्य महामार्गांवर धक्कादायक घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2025 15:25 IST

भयानक अपघातात तीन ते चार जण ठार झाल्याची तसेच काही जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे

शेलपिंपळगाव : चाकण - शिक्रापूर राज्य महामार्गांवर एका मद्यधुंद माथेफिरू कंटेनर चालकाने रस्त्यावरील वाहतुकीचे नियम तोडून रस्त्यावरील इतर सुमारे २५ ते ३० वाहनांना उडवले आहे. विशेष म्हणजे संबंधित कंटेनरचा पाठलाग करणाऱ्या पोलिसांच्या गाडीलाही धडक देण्यात आली आहे. अक्षरशः चित्रपटात शोभावा असा भयानक थरार प्रत्यक्षदर्शीना अनुभवला. अखेर स्थानिक तरुण व पोलिसांच्या अथक प्रयत्नानंतर संबंधित कंटेनर अडविण्यात यश आले आहे. मद्यधुंद माथेफिरू चालकाला स्थानिक तरुणांनी चांगलाच चोप दिला असून पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले आहे. दरम्यान या अपघातात तीन ते चार जण ठार झाल्याची तसेच काही जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. 

चाकण - शिक्रापूर रस्त्यावर गुरुवारी (दि. १६) दुपारी एकच्या सुमारास ही घटना घडली आहे. माथेफिरू चालक हा चाकणहून शिक्रापूर बाजूकडे अवजड कंटेनर घेऊन जात होता. मात्र त्या कंटेनरचा वेग खूप होता. रस्त्यावर कंटेनर समोर येणाऱ्या प्रत्येक वाहनाला धडक देऊन तो भरधाव वेगाने पुढे निघून जात होता. चाकणपासून पिंपळे - जगताप हद्दीपर्यंत सुमारे २५ ते ३० वाहनांना कंटेनर धडक दिली आहे. चौफुला परिसरात रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या छोटा हत्ती वाहनाला पाठीमागून धडक दिली. तर अन्य एका स्विफ्ट कारला धडक दिली आहे. बहुतांश अपघात सिसिटीव्हीत कैद झाले असून अनेक वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.

या कंटेनरचा शेलपिंपळगाव हद्दीपासून रस्त्यावरील सुमारे ३० ते ४० दुचाकीस्वार तरुणांकडून पाठलाग सुरु होता. मात्र कंटेनरचा चालक सुसाट वेगाने कंटेनर पळवत असल्याने तो अडविण्यात अडथळा येत होता. कंटेनर समोर जाणे धोक्याचे होते. दरम्यान एका पोलिसांच्या गाडीलाही या कंटेनरने धडक दिली. अखेर तासाभरच्या प्रयत्नांनंतर जातेगाव हद्दीत संबंधित कंटेनर पकडण्यात आला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.

टॅग्स :PuneपुणेChakanचाकणDeathमृत्यूAccidentअपघातPoliceपोलिसhighwayमहामार्गhospitalहॉस्पिटल