शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

पुणे विभागात दुष्काळाची तीव्रता वाढली ; २६४ टँकर सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2019 17:16 IST

पुणे, सांगली, सातारा जिल्ह्याच्या तुलनेत सोलापूर जिल्ह्यात सुरूवातीच्या काळात टँकरची संख्या कमी होती. मात्र,

ठळक मुद्देसांगलीत ७७, साताºयात ७२ तर पुण्यात ६४ टँकर      पुणे विभागातील ५ लाख ५२ हजार ५२२ नागरिक आणि २८ हजार ३७६ पशुधन दुष्काळाने बाधित

पुणे : दुष्काळाची तीव्रता वाढली असून पुणे विभागातील ५ लाख ५२ हजार ५२२ नागरिक आणि २८ हजार ३७६ पशुधन दुष्काळाने बाधित झाले आहेत. त्यात सांगली जिल्ह्यात ७७, साताऱ्यात ७२, पुण्यात ६४ आणि सोलापूर जिल्ह्यात ५१ टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. उन्हाचा तडाखा वाढल्याने गेल्या वीस दिवसात पुणे विभागात जिल्हा प्रशासनाला ६४ टँकर सुरू करावे लागले आहेत.राज्यातील अनेक भागात पावसाने पाठ फिरवली. त्यामुळे पुणे विभागात कोल्हापूर जिल्हा वगळता सर्व जिल्ह्यातील नागरिकांना टँकरने पाणी पुरवठा करावा लागत आहे. त्यात सातारा जिल्ह्यातील एकट्या माण तालुक्यात ५५ टँकर सुरू आहेत. तर सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यात ४३ टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. पुणे, सांगली, सातारा जिल्ह्याच्या तुलनेत सोलापूर जिल्ह्यात सुरूवातीच्या काळात टँकरची संख्या कमी होती. मात्र, सोलापूर जिल्ह्यातील टँकरची संख्याही ५१ वर गेली असून सोलापूरात १ लाख ३८ हजार ९३३ नागरिक दुष्काळाने बाधित झाले आहे.पुणे विभागात २ फेब्रुवारी रोजी २०० टँकरने दुष्काळ बाधितांना पाणीपुरवठा केला जात होता. मात्र, दुष्काळाची तीव्रता चांगली वाढली असून २० फेब्रुवारी रोजी विभागात २६४ टँकर सुरू झाले आहेत. त्यामुळे अवघ्या २० दिवसात विभागातील टँकरची संख्या ६४ ने वाढली आहे. त्यातही २४९ गावे आणि १ हजार ७७१ वाड्यातील नागरिकांना दुष्काळाचा सामना करावा लागत असून ४५ शासकीय आणि २१९ खासगी टँकर्सने पाणी पुरवठा सुरू आहे.---जिल्हा व तालुकानिहाय टँकर व बाधितांची आकडेवारी पुढील प्रमाणे : पुणे : आंबेगाव ७, बारामती १९, दौंड ९, हवेली १, इंदापूर १, जुन्नर ३, खेड ४, पुरंदर ३, शिरूर १७सातारा : माण ५४, खटाव ७, कोरेगाव ८, फलटण २,सांगली : जत ४२, कवठेमहांकाळ ६, तासगाव ३, खानापूर ६, आटपाडी १९,सोलापूर : सांगोला ११, मंगळवेढा १४, माढा ४, करमाळा ७, माळशिरस ३, मोहोळ ३, दक्षिण सोलापूर ४, उत्तर सोलापूर २, अक्कलकोट २ आणि बार्शी १.

टॅग्स :PuneपुणेSolapurसोलापूरBaramatiबारामतीSatara areaसातारा परिसरdroughtदुष्काळwater transportजलवाहतूक