शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी
2
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
3
निकोलस पूरनने दोन खणखणीत सिक्स खेचले, अर्जुन तेंडुलकरने मैदान सोडले; नेमके काय घडले?
4
"ते गरीब-गरीब करत माळच जपायचे, मोदीने 25 कोटी लोकांना गरीबीतून बाहेर काढले"; पंतप्रधानांचा काँग्रेसवर हल्लाबोल 
5
प्रचारादरम्यान कन्हैया कुमार यांच्यावर हल्ला, हार घालण्यासाठी आलेल्या तरुणाने लगावली थप्पड!
6
'हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही', शरद पवारांचा मोदींवर घणाघात
7
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
8
एका व्हिडीओने माझी वाट लावलीय! MI बाबतच्या विधानानंतर Rohit Sharma चा दुसरा Video Viral
9
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
10
एकाधिकारशाही संपवण्यासाठी भाजपाला हद्दपार करण्याची गरज, शरद पवारांचा घणाघात
11
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
12
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
13
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
14
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
15
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
16
रश्मिका मंदानाकडून 'अटल सेतू'चं कौतुक; आदित्य ठाकरेंचा अभिनेत्रीला सल्ला अन् सरकारवर टीकास्त्र
17
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
18
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
19
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
20
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!

विसर्जन मिरवणुकीवर ड्रोन, सीसीटीव्हींचा ' वॉच'  

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2019 4:28 PM

पुण्यातील वैभवशाली विसर्जन मिरवणुकीच्या प्रमुख मार्गावर लावण्यात आलेले सीसीटीव्ही तसेच ड्रोनच्या सहाय्याने वॉच ठेवण्यात येणार आहे़. 

ठळक मुद्देपारंपारिक पद्धतीने होणार सुरुवात : ९ हजार पोलिसांचा बंदोबस्त

पुणे : संपूर्ण जगभरातील भाविकांचे आकर्षण असलेल्या पुण्यातील वैभवशाली विसर्जन मिरवणुकीच्या प्रमुख मार्गावर लावण्यात आलेले सीसीटीव्ही तसेच ड्रोनच्या सहाय्याने वॉच ठेवण्यात येणार आहे़. सुमारे ९ हजाराहून अधिक पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त नेमण्यात आला आहे़. दरवर्षीप्रमाणे पारंपारिक पद्धतीने विसर्जन मिरवणुकीत सुरुवातीला मानाची गणपती मंडळे सहभागी होणार असून त्यात कोणताही बदल करण्यात आला नसल्याचे पोलीस आयुक्त डॉ़. के़. व्यंकटेशम यांनी सांगितले़. काही मंडळांनी लक्ष्मी रोडवरुन आम्हाला सकाळी ७ वाजता मिरवणुक काढण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी केली होती़. त्याला मानाच्या गणपती मंडळांनी विरोध केला़. त्यानंतर पोलिसांनी दरवर्षीप्रमाणे मिरवणुकीला सुरुवात होईल़. त्यांच्या वेळेत कोणताही बदल होणार नसल्याचे सांगितले़. विसर्जन मिरवणुकीत प्रमुख मार्गावर ३९ ठिकाणी एकूण १६९ सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले असून त्याद्वारे मिरवणुकीतील प्रत्येक हालचालीवर नजर ठेवण्यात येणार आहे़. शहरात बसविण्यात आलेल्या २८ हजार सीसीटीव्ही कॅमेरे यांचीही मदत घेण्यात येणार आहे़. पोलिसांच्या वतीने दोन ठिकाणी ड्रोनद्वारे मिरवणुकीवर नजर ठेवली जाणार आहे़. कोणत्याही खासगी ड्रोनला मिरवणुक काळात परवानगी देण्यात येणार नाही़. विसर्जन मिरवणुकीसाठी फरासखाना नियंत्रण कक्ष व मुख्य नियंत्रण कक्ष या ठिकाणी राखीव पोलीस दल ठेवण्यात येणार आहे़. त्यात ५ जलद प्रतिसाद पथके, वज्र, लिमा, वरुण व ५ दंगल नियंत्रण पथके, शिवाजीनगर मुख्यालयात ४ स्ट्रायकिंग फोर्स, मुख्य नियंत्रण कक्षात २ स्ट्रायकिंग फोर्स राखीव ठेवण्यात आले आहेत़.  बेलबाग चौकात फिरते नियंत्रण कक्ष ठेवण्यात आले आहे़. विसर्जन मिरवणुकीच्या सर्व मागार्ची जबाबदारी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सोपविण्यात आली आहे़. गणेशोत्सव व मोहरम सणानिमित्त शांतता समिती, मोहल्ला कमिटी, पोलीस मित्र, गणेश मंडळांचे पदाधिकारी, ढोलताशा पथक, डी जे डॉल्बी चालक व मालक अश विविध घटकांच्या ३७७ बैठका घेण्यात आल्या़.़़़़़़़* नागरिकांनी पोलिसांचे कान, डोळे बनावे, पोलीस आयुक्तांचे आवाहन.* खासगी ड्रोनला परवानगी नाही़. * बॉम्बशोधक व नाशक विभागाची ७ पथके कार्यरत राहणार.* गुन्हेगारांवर नजर ठेवण्यासाठी पाच परिमंडळात स्पॉटर किटचा वापर.* मानाच्या गणपतींना ३ तर इतर मंडळांना २ ढोल पथकांना परवानगी.* ८७ ढोल पथकांच्या वादकांना ओळखपत्रांचे वितरण.* एकाच मंडळापुढे वादन करण्याची ढोल पथकांना परवानगी.* एका पथकात ४० ढोल व एकूण १०० जणांना परवानगी* ढोल पथकांना उलटे फिरता येणार नाही़ मिरवणुक मागार्ने पुढे जावे लागणार* ढोल ताशे पथकांना टेम्पो पेठांमध्ये आणता येणार नाही़ .* गेल्या वर्षी ४४ मंडळांवर ध्वनी प्रदुषणाचे गुन्हे दाखल.

यंदा ७ व्या दिवसापर्यंत १२ मंडळांवर ध्वनी प्रदुषणविषयक कारवाई९ हजार पोलिसांचा तगडा बंदोबस्त.

 विसर्जन मिरवणुकीच्या बंदोबस्तासाठी पुणे शहर पोलीस दलाला बाहेरुनही मदत मिळाली आहे़ शहरातील ९ हजार पोलीस अधिकारी व कर्मचारी बंदोबस्तावर राहणार असून त्यात ४ अपर पोलीस आयुक्त, १२ पोलीस उपायुक्त, २९ सहायक पोलीस आयुक्त, १५० पोलीस निरीक्षक, ४६१ सहायक निरीक्षक, उपनिरीक्षक, ७ हजार४५७ पोलीस कर्मचारी, एस आर पी एफच्या २ कंपन्या, असा बंदोबस्त लावण्यात आला आहे़ तसेच बाहेरुन २ पोलीस उपायुक्त, ८ सहायक पोलीस आयुक्त, १६ पोलीस निरीक्षक, ८० सहायक निरीक्षक, उपनिरीक्षक, २५० कर्मचारी व २९३ होमगार्ड असा तगडा बंदोबस्त आला आहे़ ....................विसर्जन मिरवणुकीच्या काळात शहरातील बंद असणारे रस्तेशिवाजी रोड : सकाळी ७ पासून मिरवणुक संपेपर्यंतलक्ष्मी रोड : संत कबीर चौकी ते अलका टॉकीज चौक, सकाळी ७ ते मिरवणुक संपेपर्यंत़बगाडे रोड : सोन्या मारुती चौक ते फडके हौद चौक, सकाळी ९ ते मिरवणुक संपेपर्यंतबाजीराव रोड : बजाज पुतळा ते फुटका बुरुज चौक, सकाळी १२ ते मिरवणुक संपेपर्यंतकुमठेकर रोड : सकाळी १० ते मिरवणुक संपेपर्यंतकेळकर रोड : दुपारी १२ ते मिरवणुक संपेपर्यंतगणेश रोड : दारुवाला पुल ते जिजामाता चौक, सकाळी १० ते मिरवणुक संपेपर्यंतगुरुनानक रोड, टिळक रोड : सकाळी ९ ते मिरवणुक संपेपर्यंतशास्त्री रोड : सेनादत्त चौकी चौक ते अलका टॉकीज चौक, दुपारी १२ ते मिरवणुक संपेपर्यंतडेक्कन जिमखाना भागातील रस्ते सायंकाळी ४ वाजल्यानंतर मिरवणुक संपेपर्यंत बंद राहणार आहेत़ त्यात जंगली महाराज रोड : झाशी राणी चौक ते खंडोजीबाबा चौक, कर्वे रोड : नळस्टॉप चौक ते खंडोजी बाबा चौक, फर्ग्युसन रोड : खंडोजीबाबा चौक ते फर्ग्युसन कॉलेज मेनगेटभांडारकर रोड : पी वाय सी जिमखाना ते गुडलक चौक ते नटराज चौकप्रभात रोड : डेक्कन पोलीस ठाणे ते शेलारमामा चौकपुणे सातारा रोड : व्होल्गा चौक ते जेधे चौकसोलापूर रोड : सेव्हन लव्हज चौक ते जेधे चौक.................विसर्जन मिरवणुकीच्या काळात शहरात येणाऱ्या व जाणाऱ्या वाहनांसाठी वाहतूक शाखेने रिंग रोडची आखणी केली असून वाहनचालकांनी त्याचा वापर करण्याचे आवाहन केले.* 

टॅग्स :PuneपुणेGanesh Visarjanगणेश विसर्जनPoliceपोलिस