शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

वाहन चालकाचा खून करून ईरटीगा कार चोरी; मृतदेह पुणे-नाशिक महामार्वरील आळेखिंडीत फेकला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2025 10:48 IST

चालकाचे हात पाठीमागील बाजुन नायलॉन दोरीने व जीप नायलॉन टाय (लॉक) याने बांधुन गळा दाबुन खून

आळेफाटा : भाड्याने घेतलेली ईरटीगा कारचोरण्याच्या उद्देशाने चालकाचा खून करून पुरावा नष्ट करण्याचे उददेशाने त्याचा मृतदेह पुणे-नाशिक महामार्गावरील संतवाडी शिवारातील आळेखिंडीतील वनविभागच्या जंगलात फेकून देण्याची घटना मंगळवारी (२८ जानेवारी) दुपारी उघडकीस आली आहे. राजेश बाबुराव गायकवाड (वय 56 वर्षे) रा. निधी अर्पाजमेंट जेलरोड नाशिक ता. जि. नाशिक असे खून झालेल्या चालकाचे नाव आहे. चालकाचे हात पाठीमागील बाजुन नायलॉन दोरीने व जीप नायलॉन टाय (लॉक) याने बांधुन गळा दाबुन खून करण्यात आल्याचे स्पष्ट झाल्याने पोलिस निरीक्षक दिनेश तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल पन्हाळकर  त्यांच्या टिमने तपास सुरू केला आहे.आळेफाटा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार २७ जानेवारी रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास पुणे येथून चालक राजेश गायकवाड मारूती सुझुकी कंपनीची ईरटीगा कार एम एच १५ जेडी ५१९३ या गाडीने पुणे ते सिन्नर एमआयडीसी असे भाडे घेवुन येत असताना मौजे संतवाडी शिवारात ता. जुन्नर जि. पुणे येथे कोणीतरी अज्ञात व्यक्तींनी चालक गायकवाड यांचा त्यांचे हात पाठीमागील बाजुन नायलॉन दोरीने व जीप नायलॉन टाय (लॉक) याने बांधुन ते चालवत असेलेली ईरटीगा चोरी करण्याचे उददेषाने, गळा दाबुन खुन केला. व पुरावा नष्ट करण्याचे उददेशाने मृतदेह संतवाडी शिवारात फॉरेस्टचे ओढयात टाकुन दिला अशी फिर्याद मृत चालक गायकवाड यांचा मुलगा अंकुश राजेश गायकवाड याने आळेफाटा पोलीस ठाण्यात मंगळवारी दिली आहे.दरम्यान आळेफाटा पोलिसांनी तपास सुरु केला असून गायकवाड यांची कार नेमकी पुणे येथून कोणी भाड्याने घेतली होती याचा तपास सुरु आहे. पोलीस महामार्गावरील सीसीटीव्ही चेक करत आहे

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीThiefचोरAccidentअपघातcarकार