पुण्यात वारजे पुलावरून बस कोसळली; १७ जण जखमी, एक गंभीर
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2018 13:32 IST2018-07-02T11:47:56+5:302018-07-02T13:32:28+5:30
चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे बस वारजे पूलावरुन खाली कोसळली.

पुण्यात वारजे पुलावरून बस कोसळली; १७ जण जखमी, एक गंभीर
पुणे - कात्रजहून निगडीकडे जाण्याऱ्या पीएमपीएल बसला वारजे पूलावर अपघात झाला आहे. चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे बस वारजे पूलावरुन खाली कोसळली. मिळालेल्या माहितीनुसार एमएच 14 सीडब्ल्यू 3088 ही बस कात्रजहून निगडीकडे भरधाव वेगाने निघाली होती. त्यावेळी चालकाचे नियंत्र सुटल्याने बस वारजे पुलावरून खाली असलेल्या पत्र्याच्या शेडवर कोसळली. या अपघातामध्ये 17 लोक जखमी, एक गंभीर अन्य 16 किरकोळ जखमी झाले आहेत. जखमीवर वारजे येथील माई मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.