शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

चालकाचे नियंत्रण सुटले; ५३ विद्यार्थ्यांना घेऊन सहलीसाठी निघालेल्या बसचा भीषण अपघात, कल्याण - नगर रस्त्यावरील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2026 11:27 IST

या अपघातात १४ विद्यार्थी तर ४ शिक्षक जखमी झाले असून सुदैवाने मोठी जीवितहानी टळली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे

ओतूर : कल्याण - नगर रोडवर गुरुवार दि. १२ फेब्रुवारी रोजी पहाटेच्या सुमारास भीषण अपघात घडला. पिंपरी शाहाली ता. नेवासा जि. अहिल्यानगर येथून सहलीसाठी निघालेली जिल्हा परिषद शाळेची मुलांनी भरलेली एसटी बस डुंबरवाडी हद्दीत टोल नाक्यापासून आळेफाटा दिशेला सुमारे २०० मीटर अंतरावर असलेल्या छोट्या पुलाच्या कठड्याला जोरदार धडक देऊन पलटी झाली. या अपघातात १४ विद्यार्थी तर ४ शिक्षक जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली असून सुदैवाने मोठी जीवितहानी टळली आहे.

 मिळालेल्या माहितीनुसार, एसटी बस नेवासा येथील शाळेतील तब्बल ५३ विद्यार्थ्यांना घेऊन सहलीसाठी ओझर लेण्याद्री च्या दिशेने निघाली होती. बसमध्ये विद्यार्थी, शिक्षक व इतर कर्मचारी असा एकूण मोठा ताफा होता. नगर–कल्याण महामार्गावरून प्रवास सुरू असताना डुंबरवाडी परिसरात चालकाचा अचानक वाहनावरील ताबा सुटल्याचे सांगितले जात आहे. बस वेगात असल्याने ती रस्त्याच्या कडेला असलेल्या छोट्या पुलाच्या भिंतीवर जाऊन आदळली. धडक इतकी जोरदार होती की बसचा पुढील टायर फुटला आणि काही क्षणांतच वाहन पलटी झाले.

 अपघाताची तीव्रता इतकी होती की परिसरात मोठा आवाज झाला. बस पलटी झाल्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये एकच गोंधळ उडाला. श्रावणी नवथर, कृष्णा नवथर, सिद्धांत मुसळे, सार्थक कोकाटे,जिया शेख, ईश्वरी लहारे,सागर फावले,अनुराज काळे,रितेश मोरे,स्नेहल खंडागळे,शुभम गोंडुळे,पायल कचरे, काव्या गोसावी, आयर्न नवथर, विद्यार्थी जखमी झाले त्यात त्यांना हात-पायाला मार लागला. अपघात होताच स्थानिक नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. बसच्यामधून विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यात आले. ग्रामस्थ, शिक्षक व प्रवाशांच्या मदतीने जखमी विद्यार्थ्यांना तातडीने आळेफाटा येथील खासगी रुग्णालयात हलवण्यात आले.     रुग्णालयात सर्व जखमी विद्यार्थ्यांवर प्राथमिक उपचार करण्यात आले असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. घटनेची माहिती मिळताच ओतूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक लहू थाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पंचनामा करण्यात आला असून अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी तपास सुरू आहे. या अपघातामुळे कल्याण नगर रोडवरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. 

English
हिंदी सारांश
Web Title : Bus accident injures 14 students, 4 teachers near Kalyan-Nagar road.

Web Summary : A school bus carrying 53 students for a trip overturned near Kalyan-Nagar highway after the driver lost control. Fourteen students and four teachers were injured. All are stable and receiving treatment.
टॅग्स :Puneपुणेhighwayमहामार्गkalyanकल्याणAhilyanagarअहिल्यानगरAccidentअपघातStudentविद्यार्थीSchoolशाळा