पॉर्नस्टार होण्याचे स्वप्न दाखवत मित्रानेच केला मैत्रिणीचा अश्लील व्हिडिओ पॉर्न वेबसाईटवर व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2022 19:45 IST2022-10-31T19:45:43+5:302022-10-31T19:45:54+5:30
प्रकरणात ते दोघे ही जण अल्पवयीन असल्याचे तपासातून समोर आले

पॉर्नस्टार होण्याचे स्वप्न दाखवत मित्रानेच केला मैत्रिणीचा अश्लील व्हिडिओ पॉर्न वेबसाईटवर व्हायरल
पुणे: पॉर्नस्टार होण्याचे स्वप्न दाखवत मित्रानेच केला मैत्रिणीचा अश्लील व्हिडिओ पॉर्न वेबसाईटवर व्हायरल केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात घडला आहे. या प्रकरणात ते दोघे ही जण अल्पवयीन असल्याचे तपासातून समोर आले आहे. वारजे पोलिस ठाण्यात याप्रकरणी पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या दोघांची सोशल मीडियावरुन ओळख झाली. दोघे ही एकमेकांना भेटले देखील होते आणि त्यानंतर त्यांची मैत्री वाढत गेली. त्यानंतर मित्राने तिला आंतरराष्ट्रीय पोर्नस्टार बनवतो असे आमिष दाखवत तिला अश्लील व्हिडिओ तयार करण्यास भाग पाडलं. मित्राने सांगितलेल्या गोष्टीवर विश्वास ठेऊन तिने काही व्हिडिओ त्याला पाठवले. हेच व्हिडिओ तिच्या मित्राने एका पॉर्न वेबसाईटवर अपलोड केले. त्या मुलीला तिच्या मैत्रिणीने तिचे व्हिडिओ अशा वेबसाईट वर अपलोड झाल्याचे सांगितल्या नंतर तिने हा सगळा प्रकार घरच्यांना सांगितला. मात्र भीतीपोटी त्यांनी तक्रार देण्यास नकार दिला पण पोलिसांना शेवटी पुढाकार घेतला आणि स्वतः या प्रकरणात तक्रार दिली. वारजे पोलिस पुढील तपास करत आहेत.