शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
4
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
5
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
6
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
7
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
8
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
9
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
10
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
11
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
12
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
13
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
14
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
15
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
16
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
17
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
18
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
19
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
20
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?

डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येला 5 वर्ष पूर्ण, खऱ्या सूत्रधारांपर्यंत कधी पोहोचणार- अंनिसचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2018 8:19 AM

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला 5 वर्ष पूर्ण झाली आहेत. मात्र त्यांच्या हत्येमागील सूत्रधार अद्याप मोकाटच आहेत. याचा निषेध नोंदवण्यासाठी पुण्यात अंनिसच्या जवाब दो रॅली काढण्यात आली आहे.

पुणे - महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला आज 5 वर्ष पूर्ण झाली आहेत. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची 20 ऑगस्ट 2013 रोजी पुण्यातील ओकांरेश्वर मंदिराजवळील महर्षी शिंदे पुलावर गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी डॉ. दाभोलकर यांच्यावर गोळ्या झाडणाऱ्यांमध्ये समावेश असलेल्या सचिन अंदुरेला अटक करण्यात आली आहे.  मात्र अद्यापपर्यंत या हत्येमागील सूत्रधाराचा शोध लागलेला नाही. या घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी ज्या ठिकाणी त्यांची हत्या करण्यात आली,  त्याच महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलापासून आज सकाळी रॅली काढण्यात आली. या रॅलीत डॉ. हमीद दाभोलकर, डॉ. शैला दाभोलकर, मुक्ता दाभोलकर, समाजवादी नेते डॉ. बाबा आढाव, अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, नाट्यदिग्दर्शक अतुल पेठे आदी सहभागी झाले होते. त्याचबरोबर तरुणांचा सहभागही मोठ्या प्रमाणावर होता. 

'जवाब दो, जवाब दो, मोदी सरकार जवाब दो', 'विवेकाचा आवाज बुलंद करूया', 'फुले, शाहू, आंबेडकर, आम्ही सारे दाभोलकर', अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. डॉ. दाभोलकरांचे छायाचित्र तसेच घोषणांचे फलक यावेळी हातात धरण्यात आले होते. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलापासून रॅली लक्ष्मी रस्ता, अलका चौक, शास्त्री रस्त्याने रॅली सिंहगड रोडवरील साने गुरुजी स्मारक येथे आली.  

सकाळी शिंदे पुलावर जोशपूर्ण गीतांमधून दाभोलकरांना अभिवादन करण्यात आले. आज दिवसभर साने गुरुजी स्मारक येथे विवेकवादी विचारांचा जागर करण्यात येणार आहे. यानंतर सकाळी 11 वाजता ‘व्यर्थ न हो बलिदान’ हे चर्चासत्र होणार असून त्यात मेघा पानसरे, कविता लंकेश, श्रीविजय कलबुर्गी, मुक्ता दाभोलकर आणि तुषार गांधी सहभागी होणार आहेत. अभिनेते प्रकाश राज,जेष्ठ दिग्दर्शक अमोल पालेकर हेही चर्चा सत्रांमध्ये सहभागी होणार आहेत.

 (अंदुरे-तावडेने रचला कट; सीबीआयचा कोर्टात दावा)

दरम्यान, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यावर गोळ्या झाडणाऱ्यांमध्ये सचिन अंदुरे याचा समावेश असून त्याने महाराष्ट्र आणि कर्नाटकात पिस्तुल चालविण्याचे प्रशिक्षण घेतले होते, असे तपासात पुढे आले आहे. डॉ. वीरेंद्रसिंह तावडे याच्याबरोबर अंदुरेने हत्येचा कट रचला होता, असा दावा सीबीआयने जिल्हा सत्र न्यायालयात रविवारी केला. हत्येचा सखोल तपास करून सूत्रधारापर्यंत पोहोचण्यासाठी अंदुरेला कोठडी देण्याची मागणी करण्यात आली. त्यानुसार प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ए. एस. मुजुमदार यांनी त्याला 26 आॅगस्टपर्यंत सीबीआय कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.नालासोपारा येथे स्फोटके जप्त केल्यानंतर वैभव राऊत, शरद कळसकर आणि सुधन्वा गोंधळेकर यांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे सीबीआयच्या पथकाने डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणातील संशयित हल्लेखोर अंदुरेला शनिवारी अटक केली होती. सीबीआयचे विशेष सरकारी वकील अ‍ॅड. विजयकुमार ढाकणे युक्तीवादात म्हणाले, दाभोलकर हत्या प्रकरणात अटक केलेल्या अंदुरेला पिस्तुल चालविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. प्रशिक्षण कोणी दिले? हत्येसाठी आवश्यक बाबी त्याला कोणी पुरविल्या? हत्येसाठी वापरलेले वाहन व शस्त्र जप्त करण्यासाठी व सखोल तपासासाठी त्याला चौदा दिवसांची कोठडी देण्यात यावी.

अंदुरेने झाडली तिसरी गोळी?अंदुरे मोटारसायकल चालवित होता, त्याचा साथीदार पाठीमागे बसला होता. साथीदाराने डॉ. दाभोलकरांवर दोन गोळ्या झाडल्या तर तिसरी गोळी अंदुरेने झाडल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे दोन्ही आरोपींकडे पिस्तुल होते का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

टॅग्स :Narendra Dabholkarनरेंद्र दाभोलकरPuneपुणेGovind Pansareगोविंद पानसरे