शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोगमध्ये धक्कादायक निकाल, सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव
2
Top Marathi News LIVE Updates: उत्तर प्रदेशात अग्नितांडव! ८ फ्लॅट्स जळून खाक; आग विझवण्याचे प्रयत्न सुरू
3
वादग्रस्त 'VSR'च्या विमानातून पार्थ पवारांचा प्रवास; वाद वाढताच म्हणाले, "अशी चूक पुन्हा होणार नाही"
4
Suvendu Adhikari : "TMC कडून बोगस मतदानासाठी ७५० खोट्या बोटांची खरेदी"; सुवेंदु अधिकारींचा गंभीर आरोप
5
VIDEO: बापरे... प्रियांश आर्याचा षटकार थेट चाहत्याच्या तोंडावर आदळला, वाहू लागली रक्ताची धार
6
अधिक मास २०२६: मे मध्ये सुरू होणार अधिक मास तथा धोंड्याचा महिना; खगोलशास्त्राच्या नजरेतून पाहा 
7
Summer Vacation 2026: ट्रॅव्हलिंगदरम्यान दिसायचंय स्टायलिश आणि राहायचंय कम्फर्टेबल? पॅकिंग करताना 'या' ५ मस्ट हॅव अॅक्सेसरिज विसरू नका
8
जखमी पतीला रुग्णालयात नेण्यासाठी मागितले पैसे, नंतर पत्नीकडून रुग्णवाहिकाही स्वच्छ करून घेतली
9
Mira Road Stabbing Case: घरातल्यांनी हाकललं, बायकोनंही सोडलं; आरोपी Zaib Zuber याच्या आयुष्यात याआधी काय घडलं?
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर वाढले; लग्नसराईच्या काळात आज चांदी ११०० रुपयांनी महागली, सोन्याचे नवे दर काय?
11
एक गोळीबार अन् उडाली ‘व्हाइट हाउस’ची झोप; सत्तारचनेत 'डेझिग्नेटेड सर्व्हायव्हर' म्हणजे काय?
12
Video - EVM मध्ये बिघाड झाल्याने मतदार संतापले; भाजपा नेत्यावर हल्ला, केला लाठीचार्ज
13
पंजाबविरुद्धच्या लढतीदरम्यान ड्रेसिंग रूमध्येच केलं स्मोकिंग, रियान पराग अडचणीत, व्हिडीओ व्हायरल
14
अनिल अंबानींच्या ३०३४ कोटींच्या संपत्तीवर टाच; फ्लॅटपासून ते फार्महाऊस पर्यंत काय काय जप्त?
15
महिलांना तालावर नाचायला लावणाऱ्या औषधाबाबत गूढ; भोंदू खरात नेमकं काय प्यायला द्यायचा?
16
शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, सेन्सेक्स ३५० अंकांनी, तर निफ्टी १०० अंकांनी वधारला, 'या' शेअर्सवर आज नजर
17
ओपेक'मध्ये फूट! सौदीशी पंगा आणि इराणचा धोका; संयुक्त अरब अमिरातीने का सोडली जगाची 'तेल संघटना'?
18
PSL 2026: बाबर आझमचे वादळी शतक! तब्बल ७ वर्षांनी केला पुन्हा 'तो' पराक्रम; संघही फायनलमध्ये
19
India Heatwave Alert: उष्णतेचा दुहेरी तडाखा! दिवस आणि रात्रीही लाहीलाही; हवामान विभागाने दिला मोठा इशारा
20
डिजिटल पेमेंट, ट्रान्झॅक्शन, म्युच्युअल फंड.., १ मे पासून काय काय बदलणार? तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

डाळभात दिल्याच्या वादातून दुहेरी हत्याकांड, आरोपीस पुण्यातून अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2020 05:16 IST

आरोपीस पुण्यातून अटक । व्यवस्थापक बाहेरून मागवायचा चांगले जेवण

मीरा रोड : मीरा रोडमध्ये एका बारमधील दोघा कर्मचाऱ्यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी आरोपीला पुण्यातून अटक केली. बारचा व्यवस्थापक चांगले जेवण मागवून खात असे व आरोपीस मात्र डाळभात द्यायचा. यावरून भांडण होऊन मारहाण केल्याच्या रागातून त्याने दोघांची झोपतच हत्या केल्याचे धक्कादायक कारण पुढे आले आहे .

मीरा रोडच्या शीतलनगरमध्ये एमटीएनएल मार्गावर असलेल्या शबरी बारमध्ये राहणारा बारचा व्यवस्थापक हरेश शेट्टी (४८) व सफाईकामगार नरेश पंडित (५२) यांची हत्या करून त्यांचे मृतदेह बारच्या पाण्याच्या टाकीत टाकले. गुरुवारी बारमालक गंगाधर पय्याडे यांनी पोलिसांना माहिती दिल्यावर हत्याकांड उघड झाले. बार लॉकडाऊन काळात बंद असल्याने शेट्टी, पंडित सह कल्लू राजू यादव (३५) असे तिघेच बारमध्ये रहात होते. यादव हा बारमध्ये नसल्याने पोलिसांना त्याच्यावर संशय बळावला. ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. शिवाजी राठोड, अपर पोलीस अधीक्षक संजय पाटील, उपअधीक्षक शांताराम वळवी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप कदम यांनी तपास सुरु केला. मीरा रोड पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेने मिळून शोधमोहीम हाती घेतली व त्यासाठी काही पथके तयार केली.तांत्रिक विश्लेषणच्या आधारे पोलीस पथकाने कल्लू याला शुक्र वारी रात्री पुण्याच्या पर्वती पायथ्याजवळील साजन बारमधून ताब्यात घेतले. पोलिसांच्या चौकशीत कल्लू याने ही माहिती दिली. लॉकडाऊनच्या काळात सर्व बंद असताना व्यवस्थापक शेट्टी हा अन्य हॉटेलमधून चांगले जेवण मागवून खात असे. परंतु कल्लूला डाळभातच देत असे. या भांडणातूनच शेट्टी व पंडितने कल्लूला मारहाण केली होती.यापूर्वीही गुन्हे दाखलभांडणाचा राग आल्याने सूड घेण्यासाठी कल्लूने १ जून रोजी रात्री शेट्टी व पंडित झोपलेले असताना फावड्याने वार करून हत्या केली . त्यांचे मृतदेह पाण्याच्या टाकीत फेकून दिले व तो पसार झाला. दोघांचे मोबाइल कल्लूने जाताना सोबत नेले होते. कल्लूवर कोलकत्ता येथे खुनाचा गुन्हा दाखल असून पुण्याच्या स्वारगेट पोलीस ठाण्यातही मारामारीचा गुन्हा दाखल आहे असे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, कल्लू याने शेट्टीच्या मोबाइलवरुन दोघांची हत्या केल्याची माहिती नालासोपारा आणि पनवेल येथील नातोवाईकांना दिली. कोलकत्ता येथे त्याच्यावर दोन सुरक्षारक्षकांच्या हत्येचा गुन्हाही दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMurderखून