शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

Indian Railway| प्लॅटफॉर्म तिकीट नसेल, तर वीसपट दंड भरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2022 12:58 IST

जो दंड भरत नाही त्याला रेल्वे न्यायालयात हजर करून न्यायालय शिक्षा सुनावते...

पुणे: नातलगांना सोडण्यासाठी अथवा घेण्यासाठी स्थानकांवर जात असाल तर प्लॅटफॉर्म तिकीट काढूनच जा. कारण विना प्लॅटफॉर्म तिकीट सापडाल, तर तुमच्याकडून वीसपटीहून अधिक रकमेचा दंड वसूल केला जाईल. पुणे स्थानकावर जर कोणी विना प्लॅटफॉर्म तिकीट आढळले, तर त्यावेळी शेवटच्या चेकिंग स्टेशनपासूनच्या तिकिटाची रक्कम व अडीचशे रुपयाचा दंड वसूल केला जातो. महिन्याभरात विना तिकीट प्रवास करणाऱ्या व प्लॅटफॉर्म तिकीट नसलेल्या जवळपास २५ हजार प्रवाशाकडून दीड कोटीचा दंड वसूल करण्यात आला आहे.

प्लॅटफॉर्म तिकीट नसलेला व्यक्ती आढळल्यास रेल्वे प्रशासन त्याच्यावर दंडात्मक कारवाई करते, जो दंड भरत नाही त्याला रेल्वे न्यायालयात हजर करून न्यायालय शिक्षा सुनावते. रेल्वे प्रशासन दंडात्मक कारवाई करताना त्यावेळी कोणती रेल्वे आली आहे अथवा कारवाईच्या आधी कोणती रेल्वे आली होती. ती कोणत्या शहरावरून आली आहे. त्याचे ते पुण्याचे तिकीट दर विचारात घेते. शिवाय २५० रुपयांचा दंड आकारते. त्यामुळे दंडाची रक्कम खूप मोठी होते. यासाठी रेल्वे प्रशासन चेकिंग स्टेशनचा आधार घेते.

हे आहेत चेकिंग स्टेशन

पुण्यात थांबणाऱ्या रेल्वेसाठी पुणे रेल्वे प्रशासनाने मुंबई, दौंड, मनमाड व कल्याण हे चेकिंग स्टेशन ठरविले आहे. जर पुणे स्टेशनवर विना प्लॅटफॉर्म तिकीट आढळला. तर कारवाईवेळी जी गाडी फलाटावर आली अथवा आधीची पहिली गाडी लक्षात घेऊन त्याच्या चेकिंग स्टेशनचा आधार घेत कारवाई केली जाते.

महिन्यात २५ हजार प्रवासी

पुणे जानेवारी महिन्यात पुणे रेल्वे स्थानकावर विना तिकीट प्रवास करणारे व विना प्लॅटफॉर्म तिकीट जवळपास २५ हजार प्रवासी आढळून आले. य दंडात्मक कारवाई करून १ कोटी ४२ लाख ५९ हजार २२२ रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

रोज एक हजार प्लॅटफॉर्म तिकिटांची विक्री

पुणे रेल्वेस्थानकावर रोज सरासरी २२२ प्रवासी गाड्यांची ये-जा आहे. यातून एक लाखाहून अधिक प्रवाशांची वाहतूक होत. मात्र त्या तुलनेत प्लॅटफॉर्म तिकिटाला खूप कमी प्रतिसाद लाभतो. आता प्लॅटफॉर्म तिकिटाचे दर १० रुपये आहे, तर दररोज जवळपास एक हजार टफॉर्म तिकिटाची विक्री होत आहे.

विनातिकीट प्रवास करणाऱ्या वा विनाप्लॅटफॉर्म तिकीट काढून स्थानकावर वावरणाऱ्या व्यक्तीच्या विरोधात आम्ही सातत्याने कारवाई करीत असतो. जानेवारी महिन्यात या अंतर्गत कारवाई करण्यात आली असून, यातून जवळपास दीड कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

- मनोज झंवर, जनसंपर्क अधिकारी, रेल्वे विभाग, 

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडrailwayरेल्वेIndian Railwayभारतीय रेल्वेMaharashtraमहाराष्ट्र