शहरं
Join us  
Trending Stories
1
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
4
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
5
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
6
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
7
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
8
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
9
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
10
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
11
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
12
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
13
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
14
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
15
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
16
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
17
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
18
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
19
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

चुकीच्या पद्धतीने ‘एचसीएमटीआर’ रेटू नका  : शिवसेना, राष्ट्रवादी, कॉँग्रेसची भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2019 12:02 PM

‘एचसीएमटीआर’ प्रकल्पावर सध्या पालिका वर्तुळात मोठी चर्चा

ठळक मुद्देनियोजनशून्य अंमलबजावणीच्या विरोधात रोष..  प्रकल्पाची पुनर्रचना करावी, अशी मागणी ‘एचसीएमटीआर’ प्रकल्प वाहतुकीच्या दृष्टीने आवश्यक : महापौर 

पुणे : पुणे महापालिका प्रशासनाने कशाचाही अभ्यास न करता नियोजनशून्यरीतीने ‘एचसीएमटीआर’ प्रकल्प पुणेकरांच्या माथी मारण्याचा प्रयत्न करू नये, अशी भूमिका पालिकेतील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसकाँग्रेस पक्षाने घेतली आहे़. तसेच प्रकल्पाची पुनर्रचना करावी, अशी मागणी होत आहे. ‘एचसीएमटीआर’ प्रकल्पावर सध्या पालिका वर्तुळात मोठी चर्चा आहे़. नागरिक कृती समितीने यास विरोध करून पालिका प्रशासनाच्या नियोजनशून्य अंमलबजावणीविरोधात आवाज उठविला आहे़. या पार्श्वभूमीवर पालिकेतील सत्ताधारी पक्षासह इतर पक्षांची मते जाणून घेतली असता, सद्य:स्थितीला नियोजित केलेल्या ‘एचसीएमटीआर’ प्रकल्पावर सर्वांनीच पुनर्रचनेची अपेक्षा व्यक्त केली आहे़. शिवसेना गटनेते पृथ्वीराज सुतार यांनी, हा प्रकल्प चुकीच्या पद्धतीने अंमलबजावणीसाठी आणला गेला असल्याचे सांगितले़. १९८७ साली आलेला हा प्रकल्प पुढील चार-पाच वर्षांत अमलात आला असता तर तो आहे. योग्य होता; पण आजची परिस्थिती वेगळी आहे़. आमचा या प्रकल्पाला विरोध नाही, परंतु तो चुकीच्या पद्धतीने पुणेकरांवर लादणेही योग्य नाही़. प्रशासनाच्या या भूमिकेविरोधात आम्ही मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली असून, या प्रकल्पासाठी नियुक्त केलेल्या सल्लागार कंपनीवर कडक कारवाई करावी, अशीही आमची मागणी असल्याचे ते म्हणाले़. विरोधी पक्षनेते दिलीप बराटे यांनी, या प्रकल्पाची पुनर्रचना करून तो सर्वसंमतीने अमलात यावा, असे मत व्यक्त केले़. ४० वर्षांपूर्वी केलेला प्रकल्पाची आज शहराच्या दृष्टीने उपयुक्ततता तपासली गेली पाहिजे़. या प्रकल्पाची रचना, आलेल्या वाढीव दराच्या निविदा हे सर्वच संशयास्पद असल्याचेही ते म्हणाले़. ...... 

* टेंडर प्रक्रियेतून पैसे काढण्यासाठीच ‘एचसीएमटीआर’ची घाई : अरविंद शिंदे ‘एचसीएमटीआर’ प्रकल्पाच्या निविदा प्रक्रिया राबविण्यासाठी केलेली घाई, हे पूर्वनियोजित होते़. कोण निविदा भरणार हेही अगोदरच ठरले होते़. अदानी ग्रुपला हे काम मिळावे व त्यांचे बँकेतील हजारो कोटींचे कर्ज मंजूर होऊन त्यातून पैसे कमविणे, हाच यातील मुख्य हेतू होता़, असा थेट आरोप काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे यांनी केला़. या प्रकल्पाच्या निविदा प्रक्रियेची चौकशी लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत करावी, अशी मागणी आम्ही लेखी निवेदनाद्वारे केल्याने याच्या फेरनिविदा काढण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे़. पुणे महापालिकेच्या करदात्याचा पैसा अशा कुठल्याही वायफळ प्रकल्पाच्या मार्गाने वाया जाणार याची काँग्रेस पक्ष दक्षता घेत असल्याचेही ते म्हणाले़. .................

प्रकल्प वाहतुकीच्या दृष्टीने आवश्यक : महापौर महापौर मुरलीधर मोहोळ यांनी, ‘एचसीएमटीआर’ प्रकल्प वाहतुकीच्या दृष्टीने आवश्यक आहे. सर्व सामाजिक संस्था व नागरिकांना विश्वासात घेऊनच तो प्रत्यक्षात आणला जाईल व त्यानुसार प्रशासनाशी चर्चा करून त्याची आखणी करण्याचे काम सुरू असल्याचेही ते म्हणाले़. 

टॅग्स :PuneपुणेBJPभाजपाPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेस