संभाजी भिडेंच्या सन्मानार्थ निघणाऱ्या माेर्चाला परवानगी देऊ नये : संभाजी ब्रिगेड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2018 17:52 IST2018-03-27T17:52:11+5:302018-03-27T17:52:11+5:30

संभाजी (मनाेहर) भिडे यांच्या सन्मानार्थ उद्या बुधवार दि. 28 मार्च राेजी शनिवारवाडा ते जिल्हाधिकारी कार्यालय असा माेर्चा काढण्यात येणार अाहे. या माेर्चाला पाेलीसांनी परवानगी देऊ नये अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने पाेलीस अायुक्त रश्मी शुक्ला यांना करण्यात अाली अाहे.

dont give permission to rally of shivpratishthan hindustan says sambhaji brigade | संभाजी भिडेंच्या सन्मानार्थ निघणाऱ्या माेर्चाला परवानगी देऊ नये : संभाजी ब्रिगेड

संभाजी भिडेंच्या सन्मानार्थ निघणाऱ्या माेर्चाला परवानगी देऊ नये : संभाजी ब्रिगेड

पुणे : संभाजी (मनाेहर) भिडे यांच्या सन्मानार्थ काढण्यात येणाऱ्या माेर्चाला परवानगी देऊ नये अशी मागणी करणारे निवेदन संभाजी ब्रिगेडतर्फे पुण्याच्या पाेलीस अायुक्त रश्मी शुक्ला यांना देण्यात अाले. मुख्यमंत्र्यांनी जरी संभाजी भिडेंबाबत काेणताही पुरावा नसल्याचे म्हंटले असले तरी संभाजी भिडे हेच काेरेगाव-भिमा दंगलीचे खरे सुत्रधार असून त्यांच्या कार्यकत्यांनी बैठका घेऊन सामाजिक तेढ निर्माण करणारी पत्रके वाटली असल्याचे संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष संताेष शिंदे यांनी लाेकमतशी बाेलताना स्पष्ट केले. 
    साेमवारी संभाजी भिडे यांना सरकारने अटक करावी यामागणीसाठी भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष डाॅ. प्रकाश अांबेडकर यांच्या नेतृत्वाखाली 200 संघटनांनी एकत्र येत मुंबईत एल्गार माेर्चाचे अायाेजन केले हाेते. या माेर्चानंतर मुख्यमंत्र्यांना अाठ दिवसात संभाजी भिंडे यांना अटक करण्याचा अल्टिमेटम प्रकाश अांबेडकर यांच्याकडून देण्यात अाला अाहे. दरम्यान संभाजी भिडे यांच्या सन्मानार्थ श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने  उद्या महामोर्चा काढण्यात येणार आहे. शनिवारवाडा येथून सकाळी साडेदहा वाजता हा मोर्चा सुरु होणार असून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात येणार आहे. जिल्हाधिका-यांना निवेदन दिल्यानंतर या मोर्चाची सांगता होणार आहे.या माेर्चाला पाेलीसांनी परवानगी देऊ नये अशी मागणी अाता संभाजी ब्रिगेडच्यावतीने पाेलीस अायुक्त रश्मी शुक्ला यांना करण्यात अाली अाहे. 
    याविषयी बाेलताना संताेष शिंदे म्हणाले,  मुख्यमंत्र्यांनी म्हंटले की भिडेंबाबत पुरावे नाहीत, परंतु भीमा-काेरेगाव दंगलीचे खरे मास्टरमाईंड हे संभाजी भिडे हेच अाहेत. त्यांच्या कार्यकत्यांनी घटनेच्या सहा-सात महिने अाधी बैठका घेऊन पत्रके वाटली हाेती. तिथल्या लाेकांमध्ये जातीय तेढ निर्माण करण्याचे काम त्यांच्या कार्यकत्यांनी केले हाेते. त्याचे पुरावे पाेलसींकडे सुद्धा अाहेत, फक्त संभाजी भिडे अाणि पंतप्रधानांचे संबंध असल्यामुळे जाणीवपूर्वक मुख्यमंत्री भिडेंना पाठीशी घालत अाहेत.  त्यांना अटक ही झालीच पाहिजे. तसेच पाेलीसांनी या माेर्चाला परवानगी देऊ नये. एका अाराेपीच्या सन्मानार्थ माेर्चे निघतात अाणि या माेर्चांना सरकार परवानगी देत असेल तर सरकारच सामाजिक वातावरण गढूळ करण्यासाठी हे सगळं घडवून अाणतय का असा संशय निर्माण हाेईल. उद्याच्या माेर्चाला पाेलीसांनी परवानगी देऊ नये अशी अामची मागणी अाहे.

Web Title: dont give permission to rally of shivpratishthan hindustan says sambhaji brigade