संभाजी भिडे गुरुजींना 8 दिवसांत अटक करा, अन्यथा...- प्रकाश आंबेडकर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2018 04:40 PM2018-03-26T16:40:23+5:302018-03-26T16:40:23+5:30

संभाजी भिडे गुरुजींना आठ दिवसांत अटक करा, अन्यथा सरकारनं याचे गंभीर परिणाम भोगायला तयार राहावे, असा इशारा आज भारिप बहुजन महासंघाच्या प्रकाश आंबेडकरांनी दिला आहे.

Please arrest Sambhaji Bhide Guruji in 8 days, otherwise ... - Prakash Ambedkar | संभाजी भिडे गुरुजींना 8 दिवसांत अटक करा, अन्यथा...- प्रकाश आंबेडकर

संभाजी भिडे गुरुजींना 8 दिवसांत अटक करा, अन्यथा...- प्रकाश आंबेडकर

googlenewsNext

मुंबई- संभाजी भिडे गुरुजींना आठ दिवसांत अटक करा, अन्यथा सरकारनं याचे गंभीर परिणाम भोगायला तयार राहावे, असा इशारा आज भारिप बहुजन महासंघाच्या प्रकाश आंबेडकरांनी दिला आहे. एल्गार रॅलीच्या समारोपाप्रसंगी ते बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी संभाजी भिडे गुरुजींना पाठीशी घालत आहेत. सरकारनं कोर्टाचं काम करू नये, असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत.

कोरेगाव-भीमा हिंसाचारप्रकरणी संभाजी भिडे यांच्या अटकेच्या मागणीसाठी भारिप बहुजन महासंघानं एल्गार मोर्चा काढला होता. त्या एल्गार मोर्चाला आंबेडकरी जनतेनं चांगला प्रतिसाद दिला. जिजामाता उद्यान ते विधान भवनदरम्यान काढण्यात आला असून, भारिप बहुजन महासंघाच्या एल्गार मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली होती. तर दुसरीकडे आझाद मैदानावरील आंदोलनास पोलिसांकडून मंजुरी देण्यात आली होती. प्रकाश आंबेडकरांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांना अल्टिमेटमही दिला आहे. 

भिडेंची पंतप्रधान नरेंद्र मोदींना फूस आहे की भिडे मोदींना फूस लावतायत हे पाहावं लागेल. संभाजी भिडे आरोपी नंबर एक आहेत एकबोटे आरोपी नंबर दोन आहेत. आरोपी 2 वर कारवाई होते तर आरोपी एकवर का नाही ?, असा प्रश्नही आंबेडकरांनी उपस्थित केला आहे. भिडे यांना अटक करायची असेल तर रावसाहेब पाटील यांची पोस्ट आहेच. त्यावर मुख्यमंत्र्यांना मारून टाका असं लिहिलं होतं. त्यावर संभाजी भिडेंचा फोटो होता. रावसाहेब पाटील यांना अटक करा त्यांच्यापासून भिडेंपर्यंत पोहोचता येईल, असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत. 

Web Title: Please arrest Sambhaji Bhide Guruji in 8 days, otherwise ... - Prakash Ambedkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.