शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajit Pawar Naresh Arora: नरेश अरोरा यांच्या कार्यालयात क्राइम ब्रँचचे अधिकारी; अजित पवार म्हणाले, "तथ्यांच्या आधारेच..."
2
भाजपा मुख्यालयात BJP नेते आणि चीनच्या CPC शिष्टमंडळाची बैठक; काँग्रेसचा खळबळजनक दावा
3
ZP Election in Maharashtra 2026: ९ लाख ते ६ लाख, झेडपी निवडणुकीत कोणत्या उमेदवाराला किती खर्च करता येणार?
4
कतारमधील अमेरिकन हवाई तळावर हालचाली वाढल्या! डोनाल्ड ट्रम्प इराणविरुद्ध कारवाई करण्याच्या तयारीत?
5
इराणमध्ये अराजकता! २००० हून अधिक लोकांचा मृत्यू, सरकारने पहिल्यांदाच सत्य केले मान्य
6
थंडीची लाट! हृदय आणि फुफ्फुसांवर परिणाम, एम्सच्या डॉक्टरांनी दिला सतर्कतेचा इशारा
7
अजित पवारांच्या राजकीय सल्लागारावर पोलीस कारवाई; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी पुण्यात मोठी घडामोड
8
Maharashtra ZP Election 2026 Date: मोठी बातमी! राज्यातील १२ जिल्हा परिषदा, १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकीची घोषणा, ५ फेब्रुवारीला मतदान
9
पुन्हा निवडणूक! महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यातील किती पंचायत समित्यांसाठी रंगणार 'रणसंग्राम'?
10
महापालिका निवडणुकीत नेत्यांची प्रतिष्ठा लागणार पणाला! भाजप विरुद्ध काँग्रेस, शिंदेसेना, उद्धवसेना, एमआयएम
11
'निवडणूक आयोग BJP च्या AI टूल्सचा वापर करतोय', SIR वर ममता बॅनर्जींचा संताप
12
Viral Video: लेकीच्या मॉइश्चरायझरची किंमत ऐकून वडिलांची उडाली झोप, व्हिडीओ शेवटपर्यंत पाहा!
13
अबब! फक्त ४ जणांच्या टीमला Open AI नं ९०० कोटींना खरेदी केले; आता ChatGPT देणार हेल्थ रिपोर्ट
14
राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचं एकत्रिकरण होणार का? प्रचार संपत असताना अजित पवारांचं मोठं विधान
15
चांदीपासून सावधान...! येणार मोठी घसरण...? रॉबर्ट कियोसाकी यांचा मोठा इशारा
16
केरळ राज्याचे नाव बदलले जाणार? राजीव चंद्रशेखर यांचे पीएम मोदी व सीएम पिनराई विजयन यांना पत्र
17
अबू सालेम मोठा गुन्हेगार, फक्त २ दिवसांचा पॅरोल शक्य; राज्य सरकारची कोर्टात स्पष्ट भूमिका
18
‘...ती एक मनपा वगळता २९ पैकी २८ महानगरपालिका महायुती जिंकणार’, चंद्रकांत पाटील यांचा मोठा दावा 
19
सामान्यांचे घराचे स्वप्न स्वस्त होणार? अर्थसंकल्पात रिअल इस्टेट क्षेत्राचे सरकारकडे साकडे!
20
'हिरव्या पतंगाचा मांजा भगवा तर धनुष्याचा बाण हिरवा, भाजपा, शिंदेसेना आणि MIM एकच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

'खिशात नाही आणा आणि बाजीराव म्हणा', मुख्यमंत्री फडणवीसांचा अजित पवारांवर शेवटचा 'वार'

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2026 17:56 IST

महापालिकांच्या निवडणुकीचा प्रचार थांबण्यापूर्वी झालेल्या अखेरच्या सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर शेवटचा वार केला. अजित पवारांनी दिलेल्या आश्वासनांची खिल्ली उडवत फडणवीसांनी टीका केली. 

पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातच सामना रंगलेला आहे. अजित पवारांकडून पहिला वार करण्यात आल्यानंतर शेवटचा बाण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी डागला. अजित पवारांनी महापालिका निवडणुकीत अनेक आश्वासने दिली आहेत, त्यावरून 'खिशात नाही आणा आणि बाजीराव म्हणा', असे म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांनी अजित पवारांना डिवचले. 

प्रचार संपण्यापूर्वी पुण्यात झालेल्या सभेत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, "मला कुणावर टीका करायची नाहीये, पण काही जणांना आश्वासन देताना आपण कुठून ते पूर्ण करणार, हे माहिती नाही. 'खिशात नाही आणा आणि बाजीराव म्हणा', अशी म्हण पुण्यात आहे", अशा शब्दात फडणवीसांनी अजित पवारांवर  हल्ला चढवला. 

दादा तयार करण्याची निवडणूक नाही -फडणवीस 

"पुण्यात आधुनिकता यावी. पुण्याचे दळणवळण चांगले व्हावे, झोपडपट्टीत राहणारे नागरिक आणि आर्थिक दुर्बलांना जास्तीत जास्त सोयी मिळाव्यात यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. काही लोकांना वाटते की, महापालिकेची निवडणूक म्हणजे गल्लीबोळात दादा तयार करण्याची निवडणूक आहे. ही गल्लीबोळात दादा तयार करण्याची नव्हे, तर या शहराचे भावी नेतृत्व तयार करण्याची निवडणूक आहे", असे टीकास्त्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डागले. 

"तुम्ही निवडून देणारे नगरसेवक आणि आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या पाठीमागे या राज्याचा मुख्यमंत्री म्हणून मी खंबीरपणे उभा आहे. जितका निधी लागेल, तितका निधी मी मुख्यमंत्री म्हणून तुम्हाला देईल. पुण्यातील ३२ रस्त्यांवर वाहतूक सुरळीत करणार आहोत", असेही फडणवीस म्हणाले.

English
हिंदी सारांश
Web Title : Fadnavis taunts Pawar: 'No money, just talk,' in election rally.

Web Summary : Chief Minister Fadnavis criticized Ajit Pawar's election promises in Pune, saying they lack substance. He emphasized developing Pune with better infrastructure, not creating local strongmen, and pledged support for city improvements and traffic solutions.
टॅग्स :Municipal Electionमहानगरपालिका निवडणूक २०२६PMC Electionsपुणे महापालिका निवडणूक २०२६Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAjit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपा