शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

Positive Story: "भिऊ नकोस ताई आम्ही आहोत", अंध मुलीच्या मदतीला धावल्या वानवडीतल्या मुली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2022 14:49 IST

अडचणीच्या वेळी केलेल्या मदतीचे समाजातून कौतुक होत आहे.

वानवडी : बँकिंग परीक्षेसाठी कोल्हापूरहुन पुण्यात आलेल्या अंध मुलीला लेखनिकाने अडचण निर्माण झाल्याचे सांगून असमर्थता दर्शवली त्यामुळे द्विधा मनस्थितीत आलेल्या अंध मुलीच्या मदतीला लेखनिक म्हणून वानवडीतील मुलींनी मदत केली. अडचणीच्या वेळी केलेल्या मदतीचे समाजातून कौतुक होत आहे.

पुण्यातील रामटेकडी इंडस्ट्रीयल इस्टेट येथील टीसीएस आय आँन डिजीटल झोन, सहयोग डिजीटल हब या परिक्षा केंद्रावर  कोल्हापूर मधील अंध मुलीची परीक्षा होती. परिक्षेसाठी लेखनिकाची अगोदर व्यवस्था केल्याने अंध मुलगी परिक्षेसाठी येण्यास निघाली. प्रवासात असताना लेखनिकास संपर्क केला असता लेखनिकाला अडचण निर्माण झाल्यामुळे येऊ शकत नसल्याचे समजले.

अंध मुलीची परीक्षा देण्याची इच्छा पुर्ण

हतबल झालेल्या अंध मुलीला काहीच सुचत नव्हते. अशा वेळी दोन वर्षापूर्वी अशाच एका अंध मुलीला मदत केलेल्या वानवडीतील सुकन्या वाळुंज हिला फोन करत लेखनिक मिळवून देण्याचे सांगितले. यावेळी लेखनिकास पात्र असणाऱ्या घराशेजारील मानसी बनकर हिस लेखनिक म्हणून मदत करण्यास विचारणा केली. बनकर हिने होकार दिल्यानंतर दोघींनी त्वरीत परिक्षा केंद्र गाठले व अंध मुलीची परीक्षा देण्याची इच्छा पुर्ण झाली.  

दिव्यांगाना मदत करणाऱ्यांची कमतरता...

अंध, दिव्यांग परिक्षार्थींना उत्तरपत्रिका सोडवण्यासाठी लिखान करणाऱ्या किंवा संगणकीय ज्ञान असणाऱ्या व्यक्तींची मदत लागत असते. सोशल मिडिया वरील फेसबुक, वाट्सअप च्या मदतीने अशी मदत मिळणे काही प्रमाणात सोपे झाले असले तरी आजही काही दिव्यांग परिक्षार्थींना उत्तरपत्रिका सोडवण्यासाठी लेखनिक किंवा संगणकाचे ज्ञान असणाऱ्या व्यक्तींची कमतरता भासत आहे. मदत करण्यासाठी तयार झालेल्या व्यक्ती परिक्षा केंद्रावर येईपर्यंत हे दिव्यांग परिक्षार्थी सतत त्यांच्या संपर्कात रहात असतात. परंतु परीक्षेपूर्वी मदत करणाऱ्या व्यक्तींना अडचण निर्माण झाल्यास दिव्यांग परीक्षार्थींना ऐनवेळी लेखनिक न मिळाल्यास परीक्षेला मुकावे लागते.

तर परीक्षेला मुकावे लागते  ''एका दिव्यांग मुलीच्या स्वप्नपूर्तीचा प्रवास वानवडीतील सुकन्या वाळुंज व मानसी बनकर या दोन मुलींमुळे सुकर झाला. दिव्यांग तसेच अंधांसाठी लेखनिक मिळणे हे कठीण काम असते, त्यात अचानक आलेल्या अडचणीमुळे लेखनिक येऊ शकले नाहीत तर संभाव्य नोकरीला मुकावे लागत असल्याचे आशा कांबळी या कोल्हापूरच्या अंध परिक्षार्थीने सांगितले.''  

टॅग्स :PuneपुणेWanvadiवानवडीEducationशिक्षणexamपरीक्षाStudentविद्यार्थी