नारोळीत तुकाईदेवी परिवर्तन पॅनलचे वर्चस्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:12 IST2021-01-19T04:12:12+5:302021-01-19T04:12:12+5:30

येथील ६ जागांसाठी १२ उमेदवारांमध्ये सरळ लढत होऊन विजयी झालेले उमेदवार पुढील प्रमाणे - प्रभाग - १ मधून दत्तात्रय ...

Dominance of Tukaidevi Parivartan Panel in Naroli | नारोळीत तुकाईदेवी परिवर्तन पॅनलचे वर्चस्व

नारोळीत तुकाईदेवी परिवर्तन पॅनलचे वर्चस्व

येथील ६ जागांसाठी १२ उमेदवारांमध्ये सरळ लढत होऊन विजयी झालेले उमेदवार पुढील प्रमाणे - प्रभाग - १ मधून दत्तात्रय मारुती ढमे, भारती संभाजी ढमे, मोनाली संदीप भंडलकर (बिनविरोध), प्रभाग २ - मधून प्रदीप राजेंद्र गिरीगोसावी, मीना बाळू ढमे, प्रभाग - ३ मधून अक्षय संभाजी कोंडे, कोमल ज्ञानदेव सोनवणे.

येथील तुकाईदेवी परिवर्तन पॅनलचे प्रमुख व माजी सरपंच दशरथ ढमे, तुळशीराम पानसरे, नारोळी सोसायटीचे अध्यक्ष रामभाऊ वाबळे, तुकाराम भंडलकर, प्रभाकर सुर्वे, सतीश ढमे, समीर शेख, माजी उपसरपंच प्रल्हाद ढमे आणि जगदंबा प्रगती पॅनलचे प्रमुख व मार्केट कमिटीचे माजी सभापती संजय पोमण यांनी निवडणुक प्रतिष्ठेची केली होती. मात्र, पोमण यांना एकही उमेदवार निवडून आणण्यात यश आले नाही. यामध्ये माजी सदस्याच्या पत्नीला पराभव स्वीकारावा लागला, तर माजी सदस्य असलेले अंकुश सोनवणे यांच्या सूनबाई कोमल या विजयी झाल्या.

Web Title: Dominance of Tukaidevi Parivartan Panel in Naroli