शहरं
Join us  
Trending Stories
1
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शारीरीक संबंध बनवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
2
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
3
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
4
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
5
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
6
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
7
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
8
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
9
एअर इंडियाला २२,००० कोटींचा ऐतिहासिक तोटा; टाटा समूह आणि सिंगापूर एअरलाईन्सकडे आपत्कालीन निधीची मागणी
10
Travel : नकाशावर छोट्या थेंबासारखा दिसतो 'हा' देश, पण आत दडलंय अथांग सौंदर्य! रामायणाशी आहे कनेक्शन
11
IPL 2026 : निक्कीचा 'निकम्मा' शो! LSG च्या २१ कोटींच्या फलंदाजाच्या खात्यात फक्त ४१ धावा
12
रोज खेळायची, मोबाईल पाहायची... १०वीच्या टॉपरने सांगितले कसे मिळाले ५०० पैकी ४९९ गुण?
13
चीनचा टँकर होर्मुझमधून बाहेर पडण्यासाठी निघाला, अमेरिकेच्या युद्धनौका पाहताच माघारी फिरला...
14
Ashok Mittal: राघव चड्डांना हटवून ज्यांना बनवले राज्यसभा उपनेता, त्याच नेत्याच्या मालमत्तांवर ईडीच्या धाडी
15
Mental Health: तुला OCD आहे का?' – असं कोणालाही गमतीने म्हणण्यापूर्वी हा लेख नक्की वाचा!
16
Share Market Update: ₹९ लाख कोटींची लॉटरी! ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर शेअर बाजारात तेजी; Sensex १२६४ अंकांनी वधारला
17
कोण आहे 'ही' महिला पत्रकार जिला खुद्द अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॉल केला? म्हणाले.. 
18
आभासी दुनियेतील गर्लफ्रेंडनं दिला धोका; AI च्या प्रेमात युवकानं उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?
19
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
20
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना लशींमध्ये रंगणार ‘देशी-विदेशी वॉर’?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2020 04:11 IST

पुणे : भारतात आपत्कालीन स्थितीत लसीकरणासाठी फायझर कंपनीने सरकारकडे मागील आठवड्यातच परवानगी मागितली आहे. त्यापाठोपाठ सिरम इन्स्टिट्युटनेही हीच परवानगी ...

पुणे : भारतात आपत्कालीन स्थितीत लसीकरणासाठी फायझर कंपनीने सरकारकडे मागील आठवड्यातच परवानगी मागितली आहे. त्यापाठोपाठ सिरम इन्स्टिट्युटनेही हीच परवानगी सोमवारी (दि. ७) मागितली. यातल्या कोणत्या कंपनीच्या लसीला पहिल्यांदा परवानगी मिळणार, याची उत्सुकता आहे.

फायझर लसीची परीणामकारकता ९५ टक्के तर सिरमच्या लसीची परिणामकारकता ९० टक्के असल्याचे सांगितले जात आहे. फायझर ही अमेरिकी कंपनी आहे. ‘सिरम’ पुण्यातील असली तरी येथे तयार होणाऱ्या लशीचे संशोधन ब्रिटनमध्ये झाले आहे. त्यामुळे एका अर्थाने ‘मेड इन इंडिया’ विरुद्ध ‘मेड इन युएस’ अशी व्यावसायिक स्पर्धा होण्याची शक्यता आहे.

फायझर लसीला ब्रिटन, बहारीनमध्ये आपत्कालीन परवानगी मिळाली आहे. त्यानंतर फायझरने अमेरिकेसह भारतात लसीकरणासाठी परवानगी मागितली आहे. भारतात परवानगी मागणी फायझर ही पहिली कंपनी ठरली आहे. त्यापाठोपाठ सिरमनेही औधष महानियंत्रकांकडे अर्ज केला आहे. त्यामुळे सध्या दोन्ही लसींमध्ये एकप्रकारची स्पर्धा सुरू झाली आहे. पण फायझरसाठी भारतातील लसीकरण आव्हानात्मक ठरणार आहे.

‘सिरम’मध्ये तयार होणारी कोविशिल्ड लस २ ते ८ अंश सेल्सिअस तापमानात साठविता येते. फायझर लसीला उणे ७० अंश सेल्सिअस तापमान लागते. त्यामुळे फायझर लसीसाठी आवश्यक साठवणुक यंत्रणा उभी करणे भारतासाठी सध्यातरी आव्हानात्मक आहे. त्यामुळे ‘कोविशिल्ड’ या लसीलाच केंद्र सरकारकडून अधिक पसंती मिळण्याची शक्यता आहे. तापमानाच्या मुद्यावर भारतातील लसीची साठवणुक व वितरण यात फायझरला मर्यादा येऊ शकते. तुलनेने कोविशिल्ड लसीची साठवणुक व वितरण भारतासाठी कठीण नाही.

भारतात लहान मुलांच्या लसीकरणाचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर राबविला जातो. त्यासाठीची पुरेशी सज्जता आहे. पण फायझर लसीसाठी स्वतंत्र यंत्रणा उभारावी लागेल. महानगरांच्या ठिकाणीच काही प्रमाणात ही व्यवस्था होऊ शकते. त्यामुळे केंद्र सरकारकडूनही सिरमच्या लसीलाच अधिक प्राधान्य दिले जाऊ शकते.

----------

चौकट

अन्य लसींनाही मिळू शकते परवानगी

आपल्याकडे लस साठवणुक, शीतकरणाच्या सुविधा आहेत. फायझर, मॉडर्नासह अन्य काही लशींना वेगळी साठवणुक लागत असेल तर ते आपल्यासाठी आव्हानात्मक असेल. त्यामुळे आपल्या देशात विकसित असलेल्या लशींचा पहिल्यांदा वापर करावा, असे सरकारने ठरविले आहे. याचा अर्थ असा नाही की अन्य लसींना परवानगी मिळणार नाही.

- डॉ. रमण गंगाखेडकर, माजी प्रमुख, साथरोग व संसर्गजन्य आजार विभाग, आयसीएमआर

-----------