शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
3
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
4
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
5
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
6
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
7
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
8
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
9
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
10
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
11
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
12
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
13
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
14
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
15
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
16
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
17
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
18
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
19
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
20
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य

कुत्र्यांची पिल्ले व ढेकणांनी त्रस्त झालेली पत्नी नांदण्यासाठी पुन्हा सासरी 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2018 11:26 AM

कुत्र्यांच्या पिल्लांमुळे घरात होणारी घाण, रुममध्ये ढेकणांचा उच्छाद, वडील व चुलत्यांना अपशब्द वापरल्याने प्रतिउत्तर दिले म्हणून पतीने केलेली मारहाण अशा त्रासाला कंटाळून तिने न्यायालयात पोटगी अर्ज केला होता

ठळक मुद्देपोटगीसाठी केला होता अर्ज, पतीने केला होता फ्लॅट व बुलेटसाठी शारीरिक छळ आॅक्टोंबर २०१७ मध्ये केलेला पोटगी मिळण्याचा आणि कौटुंबिक हिंसाचाराचा दावा अखेर समुपदेशन करण्यात आल्यानंतर तब्बल तीन वर्ष स्वतंत्र राहिलेले हे जोडपे आता पुन्हा एकत्र

पुणे : पतीला कुत्र्यांची अतिआवड. त्यामुळे कुत्र्यांची पिल्ले रात्रंदिवस घरातच असायची. मात्र त्यांचे केस जेवणात व पाण्यात जात. तसेच त्यांनी घरात केलेली  घाण काढवी लागत. त्यात घरात ढेकणांचा सुळसुळाट. वरून सासरच्या व्यक्तींनी प्रशस्त फ्लॅट घेवून द्यावा, फिरायला बुलेट द्यावी, अशी मागणी करीत संशय घेवून छळ झालेली पत्नी तडजोडी अंती अखेर पुन्हा नांदायला जाण्यास तयार झाली आहे.    कुत्र्यांच्या पिल्लांमुळे घरात होणारी घाण, रुममध्ये ढेकणांचा उच्छाद, वडील व चुलत्यांना अपशब्द वापरल्याने प्रतिउत्तर दिले म्हणून पतीने केलेली मारहाण. पत्नीवर सतत विवाहबाह्य संबंध असल्याचा संशय घेणे. खर्चायला पैस न देणे. रात्री उरलेले अन्न खायला देणे, अशा त्रासाला कंटाळून पत्नीने आॅक्टोंबर २०१७ मध्ये केलेला पोटगी मिळण्याचा आणि कौटुंबिक हिंसाचाराचा दावा अखेर तिने मागे घेतला आहे. शनिवारी झालेल्या लोकन्यायालयात दोघांचे समुपदेशन करण्यात आल्यानंतर तब्बल तीन वर्ष स्वतंत्र राहिलेले हे जोडपे आता पुन्हा नांदायला लागले आहे.    सोनू व पुनम असे या पती-पत्नीचे नाव. १५ मे २०१५ साली मोठ्या धुमधडाक्यात त्यांचे लग्न झाले. तिच्या वडिलांनी लग्नासाठी तब्बल १५ लाख रुपये खर्च केला होता. पुनम ही घरीच असायची तर सोनू हा तळेगाव येथे एका कॉलेजमध्ये चांगल्या पगाराच्या नोकरीवर होता. लग्नानंतर काही महिन्यांत सासरच्या व्यक्तींनी पुनमाला त्रास देण्यास सुरुवात केली. सोनू याने घरात कुत्र्यांची पिल्ले पाळली होती. रात्रंदिवस ती घरातच असायची. त्यामुळे घरात नेहमी अस्वच्छता व आजारपण असे. कुत्र्यांचे केस पाण्यात व जेवण्यात जात. तसेच त्यांनी घरात केलेली घाण पुनम यांना काढवी लागत. या सर्व बाबी पुनम यांनी अजिबात आवडायच्या नाहीत. ..............................शारीरिक व मानसिक छळही झाला घरात असलेल्या ढेकणांनी देखील त्या त्रस्त झाल्या होत्या. तु काळी आहेस, असे हिणवत तुझे विवाहबाह्य संबंध आहेत, असा संशय घेत सोनू पुनमचा मोबाइल तपासत असत. आपल्याला तुझ्या वडिलांनी ९०० चौरस फुटाचा फ्लॅट घेवून द्यावा आणि फिरायला बुलेट द्यावी, अशी मागणी पत्नीकडे तो करत असे. त्या व्यतिरिक्त विविध कारणांवरून तिचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात येत होता. त्यामुळे पुनम यांनी अ‍ॅड. संतोष काशिद यांच्या मार्फेत खडकी न्यायालयात आॅक्टोंबर २०१७ मध्ये पोटगीचा दावा दाखल केला होता. दरमहा २५ हजार रुपये पोटगी आणि अर्जाचा खर्च व त्रासापोटी १५ लाख रुपये मिळावे, अशी मागणी त्यांनी केली होती. ......................तिला सुखात नांदविण्याचे वचन तब्बल तीन वर्ष स्वतंत्र राहिल्यानंतर शनिवारी (८ डिसेंबर) झालेल्या लोकअदालतीमध्ये हा दावा ठेवण्यात आला होता. त्यावेळी दोघांचे समुपदेशन करण्यात आले. सोनू याला आयुष्याचे महत्त्व पटवून देत दोघांनी सुखाने नांदवे असे सांगण्यात आले. तज्ज्ञांनी केलेले मार्गदर्शन त्याला पटले व कुत्र्यांना यापुढे घराच्या बाहेर ठेवून पुनमला चांगल्या प्रकारे वागविण्याचे त्याने वचन दिले, अशी माहिती अ‍ॅड, काशीद यांनी दिली. सोनू यांच्यावतीने अ‍ॅड. सोमीनाथ सोनवणे आणि अ‍ॅड. सुनिल क्षीरसागर यांनी कामकाज पाहिले. 

टॅग्स :PuneपुणेCourtन्यायालयrelationshipरिलेशनशिपWomenमहिलाmarriageलग्न