जाणीवपूर्वक कुत्र्याला मोकळे सोडले; ९ वर्षाच्या मुलीवर सोसायटीत हल्ला; मालकाविरुद्ध गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2025 12:34 IST2025-06-05T12:34:23+5:302025-06-05T12:34:33+5:30

कुत्र्याने चावा घेतल्याने ती जखमी झाली असून बाणेरच्या रुग्णालयात घेऊन गेल्यानंतर ८ इंजेक्शन्स देण्यात आली.

Dog deliberately released; 9-year-old girl attacked in society; Case registered against owner | जाणीवपूर्वक कुत्र्याला मोकळे सोडले; ९ वर्षाच्या मुलीवर सोसायटीत हल्ला; मालकाविरुद्ध गुन्हा दाखल

जाणीवपूर्वक कुत्र्याला मोकळे सोडले; ९ वर्षाच्या मुलीवर सोसायटीत हल्ला; मालकाविरुद्ध गुन्हा दाखल

पुणे : बाणेर येथील रोहन लेहर टू सोसायटीमध्ये एका ९ वर्षांच्या मुलीवर सोसायटीमधील रहिवाशाच्या पाळीव कुत्र्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली. सोसायटीमध्ये जखमी मुलगी तिच्या मैत्रिणींसोबत खेळत असताना मंगळवारी ( दि. ३) संध्याकाळी पाच ते सव्वा पाचच्या दरम्यान हा प्रकार घडला, याप्रकरणी कुत्र्याच्या मालकाविरुद्ध बावधन पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रोहन सिंग असे गुन्हा दाखल झालेल्या मालकाचे नाव आहे. याप्रकरणी मुलीचे वडील तुषार गजानन अंधारे यांनी फिर्याद दिली आहे. रोहन सिंग यांनी रियो नावाचा कुत्रा पाळलेला आहे. ३ जूनला फिर्यादी कामानिमित्त घरी होते. मुलगी तिच्या मित्राबरोबर सोसायटीच्या पोडियनमध्ये खेळायला गेली होती. ती ५ वाजून १० मिनिटांनी रडत रडत घरी आली. त्यावेळी रोहन सिंग यांची १३ वर्षांची मुलगी रियोला फिरायला खाली घेऊन आली होती. तिने कुत्र्याला मोकळे सोडले होते. फिर्यादीची मुलगी कुत्र्याजवळ गेली असता अचानक कुत्र्याने मुलीवर हल्ला केला. तिच्या कमरेच्या डाव्या बाजूला आणि कमरेच्या खाली कुत्र्याने चावा घेतल्याने ती जखमी झाली. तिला बाणेरच्या रुग्णालयात घेऊन गेल्यानंतर ८ इंजेक्शन्स देण्यात आली. रोहन सिंग याने त्याचे पाळीव कुत्रे पुरेसा बंदोबस्त नसताना जाणीवपूर्वक मोकळे सोडल्याने कुत्र्याने मुलीवर हल्ला केला असे फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले आहे. फिर्यादीने दिलेल्या तक्रारीवरून मालकाविरुद्ध बावधन पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती बावधन पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल विभुते यांनी सांगितले.

 

Web Title: Dog deliberately released; 9-year-old girl attacked in society; Case registered against owner