शहरं
Join us  
Trending Stories
1
Tamil Nadu Explosion: तामिळनाडूतील फटाका कारखान्यात भीषण स्फोट; २३ जण ठार, अनेक गंभीर जखमी
2
Heatwave: तिकडे अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’, इकडे सांगलीमध्ये गारांसह वादळी पाऊस!
3
Middle East War: करार करा अन्यथा तुमचा विनाश अटळ; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा
4
Drugs Racket: टिटवाळ्याच्या आलिशान घरातून ‘ती’ मुंबईत चालवत होती ड्रग्ज रॅकेट!
5
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
6
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
7
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
8
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
9
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
10
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
11
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
12
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
13
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
14
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
15
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
16
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
17
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
18
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
19
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
20
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
Daily Top 2Weekly Top 5

अनाथ आरक्षणासाठी आधी द्यावी लागणार कागदपत्रे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:03 IST

पुणे : अनाथ आरक्षणाचा लाभ घ्यायचा असेल तर अर्ज करण्यापूर्वीच आता उमेदवारांना कागदपत्रे सादर करावी लागणार आहेत. विभागीय उपायुक्त, ...

पुणे : अनाथ आरक्षणाचा लाभ घ्यायचा असेल तर अर्ज करण्यापूर्वीच आता उमेदवारांना कागदपत्रे सादर करावी लागणार आहेत. विभागीय उपायुक्त, महिला व बाल विकास यांच्याकडून प्राप्त अनाथ प्रमाणपत्राची स्कॅन प्रत पुरावा म्हणून सादर करावी लागणार आहे. २०२०मद्ये जाहिर झालेल्या परीक्षांसाठी कागदपत्रे सादर करणे आवश्यक असणार आहे, अशी घोषणा बुधवारी (दि. २७) अधिकृत संकेतस्थळावरून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) केली.

अनाथ प्रमाणपत्र सादर करण्यासाठी राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२० साठी-१३ जानेवारी, महाराष्ट्र दुय्यम सेवा राजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा-२०२० साठी-१९ मार्च, महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा २०२० साठी- ७ एप्रिल अंतिम दिनांक असणार आहे. अर्ज स्वीकारण्याच्या अंतिम दिनांकपूर्वी वैध अनाथ प्रमाणापत्राची स्कॅन प्रत pre-examination@mpsc.gov.in या मेल आयडीवर २२ फेब्रुवारी या अंतीम दिनांकापूर्वी अनाथ आरक्षण प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे.

आरक्षणाबाबत शासनाकडून जाहीर केलेल्या मार्गदर्शन सूचनांनुसार अनाथ आरक्षणाचा दावा करण्याऱ्या उमेदवारांनी, अर्ज करण्यापूर्वी विभागीय उपायुक्त, महिला व बाल विकास यांच्याकडून प्राप्त स्कॅन प्रत सादर करावी. वैध अनाथ प्रमाणपत्राचा दिनांक संबंधित जाहिरातीस अनुसरून अर्ज स्वीकारण्याच्या अंतिम दिनांकापूर्वी असणे अनिवार्य आहे. प्रमाणपत्र अंतिम दिनांकापूर्वीचे नसल्यास संबंधीत उमेदवाराचा अनाथ आरक्षणाचा दावा रद्द करण्यात येईल व रद्द केलेला दावा नंतरच्या कोणत्याही टप्प्यावर विचारात घेतला जाणार नाही. वैध अनाथ प्रमाणपत्र प्रत आयोगास पाठविताना त्यावर उमेदवाराने स्वतःचे नाव, परीक्षेचे नाव, अर्ज नोंदणी क्रमांक नमूद करून प्रथम स्वसाक्षांकित करावे व त्यानंतर प्रमाणपत्र स्कॅन करणे आवश्यक आहे. अनाथ आरक्षणासाठी वैध पुरावा सादर न केल्यास अथवा कोणत्याही प्रकारची खोटी कागदपत्रे, प्रमाणपत्रे नंतर कोणत्याही टप्प्यावर कोणत्याही कारणास्तव खोटी, शासननियमानुसार सादर केली नसल्यास एमपीएससीची फसवून फसवणूक समजण्यात येईल. तसेच त्यानंतर प्राप्त विनंतीचा विचार करण्यात येणार नाही, असे एमपीएससीने स्पष्ट केले आहे.