मानसिक आजारी तरुणीवर डॉक्टराचा हॉस्पिटलमध्ये अत्याचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2019 14:38 IST2019-11-25T14:36:25+5:302019-11-25T14:38:09+5:30

मानसिक स्थिती बरी नसल्याने उपचार घेत असतानाच तरुणीवर डॉक्टराकडून हॉस्पिटलमध्येच अत्याचार

Doctor raped on mental illness patient at hospital | मानसिक आजारी तरुणीवर डॉक्टराचा हॉस्पिटलमध्ये अत्याचार

मानसिक आजारी तरुणीवर डॉक्टराचा हॉस्पिटलमध्ये अत्याचार

ठळक मुद्देराजगुरुनगर येथील एका २८ वर्षाच्या तरुणीने शिवाजीनगर पोलिसांकडे दिली फिर्यादडॉक्टरावर बलात्काराचा गुन्हा दाखल

पुणे : मानसिक स्थिती बरी नसल्याने उपचार घेत असतानाच तरुणीवर डॉक्टराकडूनहॉस्पिटलमध्येच अत्याचार करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे़. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी एम जे एम हॉस्पिटलमधीलडॉक्टरावरबलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे़. 
याबाबत राजगुरुनगर येथील एका २८ वर्षाच्या तरुणीने शिवाजीनगर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे़. हा प्रकार ऑक्टोबर २०१७ ते जुलै २०१९ दरम्यान घडला आहे़. 
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही तरुणी मानसिक आजारी असल्याने ती घोले रोडवरील एम जे एम हॉस्पिटलमधील डॉक्टराकडे उपचार घेत होती़. या उपचारादरम्यान या डॉ़.रोहन जहागिरदार याने तिच्या संमतीशिवाय वेळोवेळी अश्लिल चाळे करीत असे़. दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये न्यायचे आहे असे सांगून या तरुणीला दुसऱ्या एका हॉस्पिटलच्या संचालकाच्या घरी घेऊन गेला़. तेथेही तिच्यावर वेळोवेळी बलात्कार केला़. तसेच कोणाला काही सांगू नकोस़ माझे मोठे अधिकारी, राजकारणी ओळखीचे आहेत, अशी धमकी दिली़. 
याबाबत शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळासाहेब कोपनर यांनी सांगितले की, या तरुणीच्या फिर्यादीनुसार फिर्याद दाखल करुन संबंधित डॉक्टरावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे़. त्याचा तपास केल्यानंतरच अधिक माहिती पुढे येऊ शकेल़. 

Web Title: Doctor raped on mental illness patient at hospital