शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
2
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
3
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
4
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
5
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
6
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
7
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
8
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
9
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
10
भारत-न्यूझीलंडदरम्यान ऐतिहासिक ट्रेड डीलवर शिक्कामोर्तब! ७०% भारतीय सामानांवर ड्युटी नाही, जाणून घ्या
11
टॅक्स बचतीसाठी पत्नीच्या नावे मालमत्ता खरेदी फायद्याची? 'ही' एक गोष्ट तुमच्यासाठी ठरू शकते डोकेदुखी
12
Jara Hatke: शहाळ्याची मलई की गोड पाणी? तुमची निवड कधीच चुकणार नाही; जाणून घ्या सिक्रेट!
13
IPL 2026: अंगक्रिश रघुवंशीने रागाच्या भरात ओलांडली सीमा, BCCIने दिला कठोर कारवाईचा दणका
14
पुढील ५ दिवस देशभरात पावसाचे सावट; ७२ तास तीव्र वादळी वारे वाहणार, हवामान विभागाचा अलर्ट
15
मुंबईत 'त्या' हॉटेलमध्ये भरायचा ‘व्हीआयपी’ दरबार; मनोहरमामाच्या भक्तांची यादी पोलिसांच्या रडारवर
16
'काकी आय लव्ह यू', म्हणणं टवाळखोरांना पडलं महागात, तरुणीने भररस्त्यात शिकवला धडा
17
तेहरानमध्ये भीषण संकट! इंधन टाक्यांच्या स्फोटात ८ कोटी लीटर तेल वाया; राज्यपालांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन
18
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
19
किंडरगार्टनमध्ये घुसत असलेल्या सापाशी भिडला 'काली', प्राण देऊन वाचवला ३० मुलांचा जीव
20
प्रेमासाठी काय पण! फिलिपिन्सच्या तरुणीचा बिहारच्या मुलावर जडला जीव; सातासमुद्रापार आली अन्...
Daily Top 2Weekly Top 5

चुका करणाऱ्या अधिकाऱ्यांना पाठीशी घालू नका

By admin | Updated: April 16, 2017 03:56 IST

जिल्ह्यातील खरीप हंगामाच्या तयारीसाठी तालुक्यात आढावा बैठका न घेताच जिल्हा स्तरावरील बैठक घेण्यात आली. याप्रकरणी जिल्हा परिषदेच्या कृषी विकास अधिकाऱ्यावर

पुणे : जिल्ह्यातील खरीप हंगामाच्या तयारीसाठी तालुक्यात आढावा बैठका न घेताच जिल्हा स्तरावरील बैठक घेण्यात आली. याप्रकरणी जिल्हा परिषदेच्या कृषी विकास अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत करण्यात आली. यावर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वास देवकाते यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी दौलत देसाई यांना चुका करणाऱ्या अधिकाऱ्यांना पाठीशी न घालण्याची सूचना या वेळी केली.राज्यात खरीप हंगाम बैठकांना विशेष महत्त्व आहे. जिल्हा परिषद आणि कृषी अधीक्षक यांच्यामार्फत कृषी निविष्ठा, खते बी-बियाण्यांचा पुरवठा, पीककर्ज आणि वीजपंप जोडणी यांचा आराखडा तयार करण्यासाठी शेतकऱ्यांची मागणी आणि आढावा यांसाठी तालुका स्तरावर आढावा बैठका पंचायत समितीत घेतल्या जातात. त्यानंतर जिल्हा परिषद स्तरावर आढावा घेऊन पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एकत्रित बैठक घेऊन तो शासनाला सादर करण्यात येतो. या वेळी मात्र तालुका स्तरावरील खरिपाच्या बैठकाच घेतल्या गेल्या नाहीत. थेट पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी खरीप बैठकांबद्दल पालकमंत्री गिरीश बापट यांनाच अंधारात ठेवले. तालुका आढावा, शेतकऱ्यांची मागणी आणि मागील वेळी आलेल्या अडचणी तसेच पंचायत समिती सदस्य, सरपंच, जिल्हा परिषद सदस्य यांची बैठक न घेता थेट जिल्ह्याची बैठक घेतली. प्रशासकीय अधिकाऱ्यांनी स्वत:च केलेले नियोजन बैठकीत मांडले. प्रत्यक्षात गाव किंवा तालुका पातळीवरील अडचणींचा विचार या वेळी केला नाही. शनिवारी झालेल्या जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत शिवसेनेच्या गटनेत्या आशा बुचके यांनी प्रश्न उपस्थित करून कृषी विभागाचे कृषी विकास अधिकारी सुनील खैरनार यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली. तसेच त्याबाबत खुलासा करण्याची मागणी केली. (प्रतिनिधी)- कृषी अधिकारी सर्वसाधारण सभेत उपस्थित नसल्याने त्यांच्या वतीने अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यशवंत शितोळे यांनी खुलासा केला.