पुणे : ठराविक बांधकाम व्यवसायिकांना डोळ्यासमोर ठेवून पालिकेच्या हद्दीतील ३२३ रस्ते सहा मीटर ऐवजी ९ मीटर करण्याचा निर्णय घेऊ नका. शहराच्या विकासाच्यादृष्टीने सर्व पक्षांना विश्वासात घेऊन पुणेकरांच्या हिताचे निर्णय घेण्याचे आदेश उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पालिका आयुक्तांना दिले.बहुमताच्या जोरावर निर्णय लादले तर शासनाला आपल्या अधिकारांचा वापर करावा लागेल अशी तंबीही पवार यांनी यावेळी दिली.शहरातील ३२३ रस्त्यांच्या ९ मीटर रुंदीकरणाचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर ठेवण्यात आला आहे. या निर्णयामुळे टीडीआर वापरता येणार आऊन यातून पालिकेचे उत्पन्न वाढेल असा अंदाज आहे. या प्रस्तावाला राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना आणि मनसे या पक्षांनी विरोध केला असून हा याबाबत पत्रकार परिषद घेऊन प्रमुख तीनही पक्षांनी हा प्रकार काही ठराविक बिल्डरांच्या हितासाठी घेतला जात असल्याचा आरोप केला होता.
बहुमताच्या जोरावर निर्णय लादू नका; सर्वांना विश्वासात घेऊन पुणेकरांच्या हिताचे निर्णय घ्या: अजित पवार
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2020 16:44 IST
बहुमताच्या जोरावर निर्णय लादले तर शासनाला आपल्या अधिकारांचा वापर करावा लागेल अशा कडक शब्दात पालकमंत्र्यांनी दिली महापालिका आयुक्तांना तंबी..
बहुमताच्या जोरावर निर्णय लादू नका; सर्वांना विश्वासात घेऊन पुणेकरांच्या हिताचे निर्णय घ्या: अजित पवार
ठळक मुद्देशहरातील ३२३ रस्त्यांच्या ९ मीटर रुंदीकरणाचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर या प्रस्तावाला राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना आणि मनसे या पक्षांनी केला विरोध