शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदीजी घाबरलात का? तुम्हाला कसं माहिती अदानी-अंबानी टेम्पोतून पैसे देतात? राहुल गांधींची टीका
2
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
3
वादावर पडदा? सॅम पित्रोदांनी दिला IOC अध्यक्षपदाचा राजीनामा, पक्षानेही तात्काळ स्वीकारला
4
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
5
"विचित्र बडबड करणं सॅम पित्रोदांचा स्वभाव, त्यांनी भारताचा अपमान केलाय"; रामदास आठवलेंची शाब्दिक चपराक
6
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज
7
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
8
CM केजरीवालांना तुरुंगात ऑफिस सुरू करण्यासाठी याचिका; कोर्टाने ठोठावला 1 लाखाचा दंड
9
"कुमारस्वामी हे ब्लॅकमेलिंगचे बादशहा अन् रेवन्ना कहाणीचे दिग्दर्शक-निर्माते", डीके शिवकुमार यांचा आरोप
10
"ते स्वतःच माणसासारखे कमी अन् पक्ष्यासारखे जास्त दिसतात..."; सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर कंगना भडकली 
11
पवार कुटुंबीयांनी पुन्हा एकदा एकत्र यावं, अशी माझी इच्छा - छगन भुजबळ
12
लखनौला बसले धक्के; भुवीच्या चेंडूवर नितीश रेड्डी, सनवीर सिंग यांनी अविश्वसनीय झेल टिपले 
13
"...तर राम मंदिराला 'बाबरी' नावाचं कुलूप लावलं जाईल", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
14
"यातून गांधी परिवाराची मानसिकता..."; स्मृती इराणी यांनी सॅम पित्रोदांच्या वादग्रस्त विधानाचा घेतला समाचार
15
“उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मुंबईतील मराठी माणूस निर्वासित झाला”; देवेंद्र फडणवीसांची टीका
16
Amit Shah : "...तर तुरुंगातही जाल"; अमित शाह यांचं अखिलेश यादव आणि राहुल गांधींवर टीकास्त्र
17
६०० पैकी ५७२ गुण मिळाले! पण टॉपर न आल्याने १६ वर्षीय तरूणीचं टोकाच पाऊल
18
SRH vs LSG सामना पावसामुळे रद्द झाला तर काय होईल? मुंबई इंडियन्सला म्हणावं लागतंय, जारे जारे पावसा... 
19
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महाराष्ट्रात खातेही उघडता येणार नाही- शरद पवार गटाचा खोचक टोला
20
PM मोदींचे मुस्लिम समाजाला पहिल्यांदाच थेट आवाहन अन् खास मंत्र्याने घेतली भेट; चर्चेला उधाण...

लाटेवर जावू नका भरती येते तशी ओहोटी पण येते: अजित पवार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2018 5:13 PM

हल्लाबोल आंदोलनाच्या निमित्ताने भाजपच्या ओहोटीला सुरुवात झाली आहे. २०१९ साली राष्ट्रवादी कॉंग्रेसचेच सरकार आले पाहिजे अशा प्रकारचा निश्चय करून पक्षाला साथ द्या असे आवाहन माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

ठळक मुद्देदेशात पेट्रोल, डिझेल फक्त महाराष्ट्रात महागसरकार शाळा उद्योजकांच्या घशात घालण्याचा प्रयत्न करत आहे.

राजगुरुनगर : समुद्राला भरतीची लाट येते त्याप्रमाणे ओहोटी देखील येत असते. ही गोष्ट राजकारणातही तंतोतत लागू होते. २०१४ साली पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपची लाट आली होती. मात्र, त्यामुळे लाटेवर जावू नका, भरती येते तशी ओहोटी पण येते. हल्लाबोल आंदोलनाच्या निमित्ताने भाजपच्या ओहोटीला सुरुवात झाली आहे, अशी टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. तसेच २०१९ साली राष्ट्रवादी कॉंग्रेसचेच सरकार आले पाहिजे अशा प्रकारचा निश्चय करून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला साथ द्या असे आवाहनही त्यांनी कार्यकर्त्यांना केले.    राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने राजगुरुनगर येथे हल्लाबोल आंदोलन करण्यात आले. यावेळी झालेल्या कार्यक्रमात पवार बोलत होते. यावेळी माजी मंत्री जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील, शशिकांत शिंदे, खासदार सुप्रिया सुळे, माजी आमदार दिलीप मोहिते पाटील,जयदेव गायकवाड, राम कांडगे, जिल्हाध्यक्ष जालिंदर कामठे, महिला जिल्हाध्यक्षा वैशाली नागवडे, रोहित पवार, यांच्यासह जिल्ह्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते. उपस्थित समुदायाला मार्गदर्शन करताना पवार म्हणाले, स्पर्धेचे युग असल्याने तुमच्या विद्वत्तेला महत्व असताना सरकार शाळा उद्योजकांच्या घशात घालण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. कामगार विरोधी कायदे या सरकारने केले आहे. या सरकारमध्ये अनेक घोटाळे झाले आहे. देशात पेट्रोल, डिझेल फक्त महाराष्ट्रात महाग आहे. घरगुती गॅस ८०० रुपयांच्या पुढे गेला आहे. घर कसे चालवायचे हा प्रश्न सर्वसामान्य नागरिकाला सतावत आहे. या सरकारच्या काळात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. या सर्व परिस्थितीला भाजप सरकार जबाबदार आहे, म्हणून आम्ही हल्लाबोल आंदोलन करत आहोत. दिलीप मोहिते पाटील म्हणाले, मोदींच्या वादळात तालुक्यातील जनता भरकटली. याची मोठी किमत मोजावी लागली आहे. तालुक्यातील तीन धरणांचे मात्र, पाणी पुणे आणि पिंपरी चिंचवडला देण्याचा घाट घातला जात आहे. त्याला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात येत आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील थिगळे यांनी व आभार तालुकाध्यक्ष कैलास सांडभोर यांनी मानले. 

टॅग्स :PuneपुणेAjit Pawarअजित पवारNational Congress Partyनॅशनल काँग्रेस पार्टीBJPभाजपा