शहरं
Join us  
Trending Stories
1
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
2
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
3
RBI च्या मोठ्या झटक्यानंतर Paytm च्या शेअरचं काय होणार? ब्रोकरेनं दिलं अवाक् करणारं टार्गेट
4
पंजाब, दिल्ली ते गुजरात; आम आदमी पक्ष फुटल्याने भाजपाचा दुहेरी फायदा, कशी बदलली समीकरणे?
5
दागिन्यांसाठी सुनेचा फिल्मी ड्रामा; स्वत:च्या घरात रचला दरोड्याचा बनाव, पण ४ तासांत पर्दाफाश
6
सहकुटुंब सहपरिवार अनुभवता येणार छत्रपती शिवरायांचा पराक्रम; रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाला U/A प्रमाणपत्र
7
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
8
अष्टपैलू क्रिकेटपटूवर दोन वर्षांची बंदी; कोकेन सेवन केल्याचे ड्रग्ज टेस्टमध्ये झाले निष्पन्न
9
ऑस्ट्रेलियाचा सुपरफास्ट गोलंदाज मिचेल स्टार्कची IPL 2026मध्ये 'एन्ट्री'; 'या' संघाची ताकद वाढली!
10
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
11
जागतिक अस्थिरतेचा Gold-Silver च्या दरांवर परिणाम; इराण-अमेरिका तणावामुळे गुंतवणूकदार सतर्क, पाहा नवे दर
12
"तो अध्याय संपला...", गायक राहुल देशपांडेची घटस्फोटावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया; पुढे म्हणाला...
13
‘सात खासदारांना अपात्र ठरवा; पक्षांतरविरोधी कायदा लावा’
14
Ashok Kharat : "माझ्या अंगात दैवी शक्तीचा चमत्कार"; पीडितेच्या परिस्थितीचा अशोक खरातने घेतला फायदा
15
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
16
Mumbai: देशातील सर्वात श्रीमंत पालिकेची नाट्यगृहे इतरांच्या तुलनेत महागडी 
17
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
18
झारखंडमधील बँकेवर मोठा दरोडा; १० मिनिटांत ७ कोटींचं सोनं आणि ५ लाख लंपास
19
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
20
रेल्वेमधून उतरल्यावर स्थानकामध्येच प्रवाशांना करता येणार किराणा खरेदी
Daily Top 2Weekly Top 5

महापुरुषांना जातीमध्ये बांधू नका : धनंजय मुंडे

By admin | Updated: August 9, 2015 03:48 IST

गेल्या काही वर्षांत महापुरुषांच्या जयंती आणि पुण्यतिथीच्या कार्यक्रमात अनेक बदल झाले आहेत. विशिष्ट समाजाचे लोकच त्यांचे कार्यक्रम साजरे करीत आहेत. महापुरुषांचे कार्य हे देशाला

पुणे : गेल्या काही वर्षांत महापुरुषांच्या जयंती आणि पुण्यतिथीच्या कार्यक्रमात अनेक बदल झाले आहेत. विशिष्ट समाजाचे लोकच त्यांचे कार्यक्रम साजरे करीत आहेत. महापुरुषांचे कार्य हे देशाला प्रेरणा देणारे होते. त्यामुळे त्यांना जातीत बांधू नका, असे परखड मत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी शनिवारी व्यक्त केले. लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त पुणे महानगर पालिकेच्या वतीने आयोजिलेल्या अण्णा भाऊ साठे सांस्कृतिक महोत्सवाचे मुंडे यांच्या हस्ते उद्घाटन झाले. त्या वेळी ते बोलत होते. उपमहापौर आबा बागुल, स्थायी समिती अध्यक्षा अश्विनी कदम, सभागृहनेते बंडू केमसे, माजी सभागृहनेते सुभाष जगताप, नगरसेवक बाबूराव चांदेरे, सचिन भगत, महेंद्र पठारे, अभिनेते प्रशांत दामले, अभिनेत्री तेजश्री प्रधान आदी या वेळी उपस्थित होते. विविध क्षेत्रात उत्तुंग कामगिरी करणाऱ्यांचा या वेळी मुंडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. मुंडे म्हणाले, की छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केवळ मराठा समाजासाठी केली नव्हती, घटनेचा फायदा केवळ दलित समाजाला झाला नाही. तसेच साठे यांचे साहित्य हे फक्त मातंगांसाठी नव्हते, महात्मा फुले यांनी सुरू केलेली शिक्षणाची चळवळ सर्वव्यापी होती. त्यामुळे या महापुरुषांची जयंती-पुण्यतिथी कोणत्याही जातीसाठी मर्यादित ठेवू नका. महोत्सवाच्या उद्घाटनानंतर नाटकाचे आयोजन करण्यात आले होते. महापालिकेच्या वतीने आयोजित साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे सांस्कृतिक महोत्सवात अण्णा भाऊ साठे यांच्या कार्यावर आधारित एकही कार्यक्रम नसल्यामुळे हा महोत्सव रद्द करण्याची मागणी करीत मागासवर्गीय परिवर्तन संघाने ‘बालगंधर्व’च्या बाहेर जोरदार निदर्शने केली. ‘पुढील वर्षी असे कार्यक्रम घेतले जाणार नाहीत, कार्यक्रमात बदल केले जातील, असे आश्वासन मुंडे यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना दिले.