राजगुरूनगर: महात्मा गांधी विद्यालयात नववीत शिकणाऱ्या मुलीचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याची घटना दि १८ रोजी घडली आहे. स्नेहा एकनाथ होले ( वय १५ होलेवाडी ता, खेड ) असे असे मृत्यू झालेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे.
स्नेहा होले ही राजगुरुनगर येथील महात्मा गांधी विद्यालय इयत्ता नववीत शिकत होती. सकाळी ती प्रमाणे शाळेत आली होती. शाळेत स्नेहसंमेलनानिमित्त आयोजित केलेल्या व्याख्यान कार्यक्रमास बसली होती. सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास तिला अस्वस्थ वाटून चक्कर आली. शिक्षकांनी तात्काळ तिला खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. उपचारापूर्वीच हृदयविकाराने स्नेहाचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. स्नेहाच्या पाठीमागे एक भाऊ, आई वडील असा परिवार आहे. या घटनेने होलेवाडीत व परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.