शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपचा मोठा निर्णय; नितीन नबीन यांची राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती, जेपी नड्डांची जागा घेणार
2
Sydney Shooting: समोर मृत्यू नाचत होता, पण तो घाबरला नाही; गोळीबार करणाऱ्याला पकडले अन्...
3
Pune Crime: "अमोलला सोड, माहेरी जा; नाही गेली तर तुला..."; विवाहितेला पतीच्या गर्लफ्रेंडकडून धमकी, प्रकरण काय?
4
औसा-वानवडा रस्त्यावर जळीतकांड; कारसह तरुणाचा झाला कोळसा, घातपाताची शक्यता
5
लियोनेल मेस्सीला भेटून खूश झाली करीना कपूरची दोन्ही मुलंं, फुटबॉलपटूसोबत फोटो व्हायरल
6
IND vs SA T20: स्टेडियममध्ये दिसलेल्या 'मिस्ट्री गर्ल'ची रंगली चर्चा, जाणून घ्या 'ती' कोण?
7
बंगालमध्ये बिहारपेक्षाही अधिक मतांना कात्री, आकडा ५८ लाखांवर; टॉप-5 मध्ये ममतांचाही मतदारसंघ! TMC चं टेन्शन वाढणार?
8
गोव्यावरून कोल्हापुरात आली आणि रंकाळा तलावात...; गर्भवती नेहा पवार यांच्यासोबत काय घडलं?
9
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
10
Grand Vitara-Hyryder चे वर्चस्व धोक्यात; 28.65 Kmpl मायलेज देणारी Hybrid SUV ठरली गेमचेंजर
11
IND vs SA Live Streaming 3rd T20I : सूर्या-गिलवर असतील नजरा! कुठं पाहता येईल तिसरा टी-२० सामना?
12
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
13
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
Daily Top 2Weekly Top 5

अबब.... ऐन दिवाळीत म्हाडाची 4253 घरांची सोडत

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2021 19:36 IST

कोरोनामुळे सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक परिस्थिती खूपच बिघडली आहे. अशा स्थितीत गरीब व आर्थिक दुर्बल घटकातील लोकांचे घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पुणे म्हाडाने पुढाकार घेतला आहे

ठळक मुद्देऐन दिवाळीच्या मुहूर्तावर तब्बल 4 हजार 253 घरांची सोडतइतिहासात प्रथमच गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर पुणे, पिंपरी-चिंचवडसह विभागातील सांगली, सोलापूर, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यात तब्बल अडीच हजार घरांची सोडत

पुणे : गरीब व सर्वसामान्य नागरिकांचे घराचे स्वप्न साकारण्यासाठी पुणेम्हाडाने पुढाकार घेत ऐन दिवाळीच्या मुहूर्तावर तब्बल 4 हजार 253 घरांची सोडत जाहीर केली आहे. याशिवाय तब्बल 935 लोकांना आपली दिवळी नवीन व हक्काच्या घरामध्ये करता यावी यासाठी येत्या शुक्रवारी नवीन घरांची सोडत व चावी वाटपाचा कार्यक्रम उपमुख्यमंत्री तथा पालक मंत्री अजित पवार यांच्या हस्ते पिंपरी वाघिरे म्हाडा काॅलनी येथे होणार असल्याची माहिती पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन माने-पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी म्हाडाचे इस्टेट मॅनेजर विजय ठाकूर उपस्थित होते.

कोरोनामुळे सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक परिस्थिती खूपच बिघडली आहे. अशा स्थितीत गरीब व आर्थिक दुर्बल घटकातील लोकांचे घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पुणे म्हाडाने पुढाकार घेतला आहे. ऐन कोरोना काळात जानेवारी 2020 मध्ये म्हाडाच्या वतीने इतिहासातील सर्वात मोठी म्हणजे तब्बल 5 हजार 657 घरांची सोडत काढून मोठा दिलासा दिला होता. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते काढण्यात आलेल्या लाॅटरीला प्रचंड चांगला प्रतिसाद मिळाला. त्यानंतर म्हाडाच्या इतिहासात प्रथमच गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर पुणे, पिंपरी-चिंचवडसह विभागातील सांगली, सोलापूर, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यात तब्बल अडीच हजार घरांची सोडत म्हाडाने काढली होती. त्यानंतर आता दिवाळीचा मुहूर्त साधत पुणे म्हाडा तब्बल 4 हजार 253 घरांची सोडत काढत नवा इतिहास निर्माण केला आहे. यामध्ये  तब्बल 2 हजार 945 सदनिका शहरातील खाजगी आणि नामांकित बिल्डरांच्या मोठ्या प्रोजेक्टमध्ये आहेत. 

अशी असेल घरांची सोडत म्हाडा गृहनिर्माण योजना : 59 सदनिका खाजगी बिल्डर 20 टक्क्यांतील घरे : 2945म्हाडा प्रथम येणाऱ्यास प्राधान्य  : 2886 

सोडतीचे वेळापत्रक ऑनलाईन अर्ज दाखल करणे : 29 ऑक्टोबर ऑनलाईन अर्ज दाखल करणे अंतिम तारीख  : 29 नोव्हेंबर ऑनलाईन पेमेंट स्वीकृती  : 1 डिसेंबर ऑनलाईन लाॅटरी : 16 डिसेंबर 

जास्तीत जास्त लोकांनी अर्ज करून लाभ घ्यावा शासनाने केलेल्या कायद्याची कडक अंमलबजावणी करत सर्व मोठ्या बिल्डरांकडून 20 टक्क्यांतील घरे सर्वसामान्य नागरिकांना परवडणा-या दरामध्ये उपलब्ध करून देणे हाच म्हाडाचा मुख्य उद्देश आहे. आता म्हाडाने साडेचार हजार घरांची सोडत काढली असून,  जास्तीत जास्त लोकांनी अर्ज करून योजनेचा लाभ घ्यावा.-  नितीन माने-पाटील, मुख्य अधिकारी, पुणे विभाग म्हाडा

टॅग्स :mhadaम्हाडाPuneपुणेHadapsarहडपसरsatara-acसाताराSolapurसोलापूर