शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
2
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
3
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
4
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
5
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
6
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
7
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
8
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
9
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
10
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
11
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
12
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
13
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
14
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
15
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
16
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
17
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
18
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
19
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
20
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
Daily Top 2Weekly Top 5

विचारांमधील अंतराने फूट, पण चिंता नको, सत्ता पुन्हा येईल! शरद पवारांचा समर्थकांना विश्वास

By राजू इनामदार | Updated: June 10, 2025 16:16 IST

राज्याची, देशाची स्थिती चिंताजनक असून अशा वेळी सर्वांना बरोबर घेत काम करण्याची आपली जबाबदारी आहे

पुणे: मूलभूत विचारांमध्ये अंतर पडले म्हणून फूट पडली आहे, पण चिंता करू नका, विचारांबरोबर राहा, जनतेशी बांधिलकी ठेवा, सत्ता आपोआप येईल, अशा शब्दांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाच्या वर्धापन दिनी जमलेल्या समर्थकांना विश्वास दिला. पक्षातून बाहेर गेलेल्या नेत्यांपैकी कोणाचेही थेट नाव घेणे त्यांनी टाळले.

बालगंधर्व रंगमंदिरात मंगळवारी (दि.१०) झालेल्या या कार्यक्रमाला पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे तसेच पक्षाचे सर्व खासदार, आमदार, माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी मंत्री विजयसिंह मोहिते पाटील, अनिल देशमुख, जितेंद्र आव्हाड, हर्षवर्धन पाटील व्यासपीठावर उपस्थित होते. पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी सर्वांचे स्वागत केले. स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या हस्ते पवार यांच्यासह सर्वांचा सत्कार करण्यात आला.अर्ध्या तासाच्या भाषणात पवार यांनी पक्षातून बाहेर पडलेल्यांपैकी एकाचेही नाव घेतले नाही. ते म्हणाले, पक्षस्थापनेला २६ वर्षे झाली. जनतेने काम करण्याची संधी दिली. सर्वसामान्यांमधूनही राज्यकर्ते तयार करता येतात, हे पक्षाने दाखवून दिले. इतकेच नाही तर आर. आर. आबा व अन्य अनेकांनी राज्याच्या सामाजिक, शैक्षणिक तसेच आर्थिक जीवनावर परिणाम करतील, असे अनेक चांगले निर्णय घेतले. यातून पक्षाला प्रतिष्ठा मिळाली, पक्ष पुढे गेला.

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रास्तविक केले. त्यांच्या हस्ते राष्ट्रवादी या अंकाचे प्रकाशन झाले. पवार यांना आर. के. लक्ष्मण यांच्या कॉमन मॅन बरोबर असलेले त्यांचे तैलचित्र भेट दिले.

फुट पडली मात्र मी चिंता करत नाही,आपण एकसंध राहिलो, जनतेच्या कामाशी बांधिलकी ठेवली तर सत्ता आपोआप येईल. राज्याची, देशाची स्थिती चिंताजनक आहे. अशा वेळी सर्वांना बरोबर घेत काम करण्याची आपली जबाबदारी आहे. त्यासाठी कर्तृत्ववान चेहऱ्यांना संधी देऊ. यातून नव्या नेतृत्वाची फळी उभी राहील आणि पुन्हा सत्ता मिळेल. -शरद पवार

टॅग्स :PuneपुणेSharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसMaharashtraमहाराष्ट्रPoliticsराजकारणMahavikas Aghadiमहाविकास आघाडी