शहरं
Join us  
Trending Stories
1
पडळकर-आव्हाड समर्थक राडा प्रकरणी अहवाल सादर; "'त्या' कार्यकर्त्यांना २ दिवस कारावास अन्..."
2
“श्रमलेल्या बापासाठी लेक...”; शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त सुप्रिया सुळेंची खास पोस्ट
3
रुपयाचा ऐतिहासिक नीचांक! डॉलरच्या तुलनेत दर ९०.५६ रुपये; घसरण्याची ३ मोठी कारणे समोर
4
एकाच रिचार्जमध्ये मिळणार वाय-फाय, फोन आणि डीटीएच, हा प्लान खूप खास
5
Video - "तुला लाज वाटली नाही?"; नवऱ्याने बायकोला बॉयफ्रेंडसोबत OYO मध्ये रंगेहाथ पकडलं अन्...
6
मुलानं आईला मारलं, मग स्वतःलाही संपवलं; ChatGPT कारणीभूत? OpenAI वर खटला!
7
Kankavli: हरवलेल्या मोबाईलमुळे ‘त्या’ प्रेमी युगुलानं संपवलं जीवन, तपासातून धक्कादायक माहिती समोर   
8
आश्चर्यकारक! Tata च्या नवीन Sierra ने दिले 30 kmpl चे मायलेज; 222 kmph चा टॉप स्पीडही गाठला
9
हिरा निघाला 'हा' शेअर; ९० टक्के फायद्यावर लिस्टिंग, IPO मध्ये लागलेली फक्त २ पट बोली
10
सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, सोनं 1.34 लाख पार तर चांदी 2 लाखांच्या उंबरठ्यावर; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
11
मॅक्सिको भारतावर नाही तर आपल्याच प्रगतीवर टाळं लावतोय, फेडावी लागेल मोठी किंमत
12
कोथरुडमध्ये मिळू लागले अवघ्या ८६ रुपयांना लीटर पेट्रोल; वाहनचालकांची उडाली झुंबड...
13
China Condom Tax: चीनमध्ये कंडोमवर भरपूर टॅक्स लादणार, जिनपिंग यांच्या धोरणाला विरोध का होतोय?
14
प. बंगालमध्ये आता बांधले जाणार राम मंदिर; भाजपा नेत्यांनी लावले पोस्टर, देणगी देण्याचे आवाहन
15
विनेश फोगाटचा यू-टर्न! पुन्हा कुस्तीच्या आखाड्यात परतणार, निवृत्तीचा निर्णय रद्द, कारण...
16
इंस्टाग्रामच्या कंटाळवाण्या रील्सला म्हणा 'बाय बाय'! फक्त एका सेटिंगने बदला फीडचा अल्गोरिदम
17
‘स्लीपर वंदे भारत’वर मोठी अपडेट! १ हजार किमी अंतर ८ तासात, १६० प्रति तास वेग; पहिली सेवा...
18
भारतात येत असताना...! विनफास्ट अमेरिकेत डीलरशीप बंद करू लागली; संख्या दोन डझनांखाली आली...
19
व्हेनेजुएला-अमेरिका वादात रशियाची उडी; मादुरोंच्या मदतीला पुतिन धावले, ट्रम्पना धक्का...
20
'जुम्मा गर्ल' किमी काटकर आठवतेय का? लेटेस्ट फोटो आला समोर, ओळखणं झालंय कठीण
Daily Top 2Weekly Top 5

पुणे जिल्ह्यात शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वाटप सुरू; पैसे घेण्यासाठी गर्दी करू नका

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2020 19:28 IST

लॉकडाऊनमध्ये शेतकऱ्यांची कोणतीही अडचण होऊ नये यासाठी जिल्हा बँकेने घेतला पुढाकार

ठळक मुद्देपुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या प्रशासनाचे आवाहन 

पुणे: सध्या राज्यासह संपूर्ण देशावर कोरोना विषाणूचे ढग गड्द होत असताना ग्रामीण भागात शेतक-यांची आगामी खरीप हंगामाची जोरदार पूर्व तयारी सुरू आहे. यासाठीच पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप सुरू केले आहे. पीक कर्जाचे वाटप सुरू झाले असले तरी नागरिकांना कर्जाचे पैसे घेण्यासाठी गर्दी करू नये असे आवाहन जिल्हा बँक प्रशासनाने केले आहे.कोरोना मुळे सध्या तब्बल 3 मे पर्यंत संपूर्ण देशात लॉकडाऊन आहे. यामुळे सर्व व्यवहार, उद्योग धंदे ठप्प आहेत. परंतु ग्रामीण भागात या सुट्टीचा फायदा घेत शेतकऱ्यांनी आगामी खरीप हंगामासाठी शेतीची मशागत करण्यामध्ये व्यस्त आहे. तसेच घरगुती बी-बीयाणे गोळा करण्याची कामे सुरू आहे. लॉकडाऊनमध्ये शेतकऱ्यांची कोणतीही अडचण होऊ नये यासाठी जिल्हा बँकेने पुढाकार घेतला असून, शेतकरी वर्गाला पीक कर्जाचे वाटप सुरू केले आहे. ज्या शेतकऱ्यांनी गतवषीर्चे कर्ज 31 मार्च पूर्वी परतफेड केले आहे, त्या शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यात कर्जाचे वाटप सुरू केले आहे.दरम्यान सध्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव देशभरात वाढत असताना नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नये, असे आवाहन प्रशासनाकडून केले जात आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी पीककर्जाची परतफेड केली आहे, असे शेतकरी पुन्हा खरिपात कर्ज घेण्यासाठी तयारी करतात. यंदा कोरोनाचे संकट लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी योग्य ती काळजी घेऊन संबंधित शाखांमध्ये पीक कर्जाची प्रक्रिया करून कर्ज घ्यावे.यंदा खरीप आणि रब्बी हंगामात पुणे जिल्ह्यातील बहुतांशी शेतकना पुणे जिल्हा सहकारी बँक तालुका व महत्त्वाच्या गावपातळीवर असलेल्या २६६ हून अधिक शाखांमार्फत गाव पातळीवरील सुमारे १२८२ विविध कार्यकारी सहकारी सोसायटीना कर्जपुरवठा करून तो कर्जरूपाने सभासदांना दिला. बँकेकडून तीन लाखांपर्यंत कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याज दराने पीक कजार्चे वाटप केले आहे. तर तीन लाखांहून अधिक पीककर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना अकरा टक्के दराने वाटप केले. गेल्या वर्षी खरिपात एक लाख ४८ हजार ३६६ शेतकऱ्यांना एक हजार १२८ कोटी ४२ लाख ४ हजार, तर रब्बीत ४३ हजार ३१७ शेतकऱ्यांना २४० कोटी ३३ लाख ६९ हजार रुपयांचे वाटप केले होते.

टॅग्स :PuneपुणेMONEYपैसाbankबँकFarmerशेतकरीCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस