शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
2
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
3
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
4
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
5
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
6
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
7
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
8
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
9
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
10
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
11
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
12
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
13
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
14
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
15
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
16
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
17
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
18
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
19
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
20
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
Daily Top 2Weekly Top 5

डेपो बंद असतानाही हजार टन कचऱ्याची विल्हेवाट

By admin | Updated: January 6, 2015 00:07 IST

महापालिका प्रशासनाकडून कचरा वर्गीकरणासंदर्भात ठोस पावले उचलली जात असल्यामुळे ५0 टक्के कचऱ्याचे वर्गीकरण करण्यास पालिका प्रशासनाला यश आले आहे.

पुणे : उरुळी देवाची येथील कचरा डेपोविरोधात ग्रामस्थांचे आंदोलन सुरू असतानाही, महापालिका प्रशासनाकडून कचरा वर्गीकरणासंदर्भात ठोस पावले उचलली जात असल्यामुळे ५0 टक्के कचऱ्याचे वर्गीकरण करण्यास पालिका प्रशासनाला यश आले आहे. सोमवारी शहरामध्ये सुमारे १४९६ टन कचऱ्याची निर्मिती झाली. यापैकी सुमारे १ हजार टन कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात पालिका प्रशासनाला यश आले आहे. दरम्यान, आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी महापालिका आयुक्त कुणाल कुमार आणि घनकचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख सुरेश जगताप यांनी आज पुन्हा ग्रामस्थांची भेट घेतली; मात्र त्यावर काहीच तोडगा निघू शकला नाही. काल सुमारे ४00 टन ओला कचरा शेतामध्ये जिरवण्यात आला. पालिका प्रशासन शहरामध्येच कचरा जिरवण्याच्या दृष्टीने प्रयत्नशील आहे. एकूण निर्माण झालेल्या कचऱ्यापैकी ३८८ टन शेतामध्ये, ८५ टन बायोगॅस, ६४ टन दिशा प्रकल्प, २८ टन विविध भागात जिरवला, २४५ टन कचरा रोकेश प्रकल्पामध्ये जिरवण्यात आला.पुणे शहरातील कचरा प्रकल्पाला जिल्हयातील विविध ग्रामपंचायतींचा विरोध आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेनेसुद्धा मोशी येथील जागा देण्यास पालिकेला विरोध केला आहे. त्यामुळे अन्य कोणत्याही ठिकाणी कचरा डेपोसाठी जागा मिळणे अवघड असल्यामुळे शहरातच कचरा जिरवावा लागणार आहे. यादृष्टीने पालिका प्रशासनाने तयारी सुरु केली आहे. येत्या ८ जानेवारीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर बैठक आहे. त्यामुळे राज्यशासनाकडून कचरा डेपोच्या जागेसंदर्भात सकारात्मक निर्णय होणे तसेच ग्रामस्थांकडून महापालिकेस नवीन प्रकल्प उभारणीसाठी आणखी काही मुदत देण्याची शक्यता पालिका प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)४आंदोलनाबाबत तोडगा निघालेला नसल्यामुळे कचऱ्याच्या वर्गीकरणासंदर्भात ठोस निर्णय घेण्यात आले आहेत. शहरातील सुमारे आठशे कंटेनर काढण्यात आले आहेत. थेट नागरिकांकडून वर्गीकरण केलेला कचराच स्वीकारला जात आहे. ४महापालिका प्रशासनाकडून कचऱ्यासंदर्भात ठोस उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. पालिका प्रशासनाच्या ताब्यात असलेल्या अ‍ॅमिनिटी स्पेसच्या जागेमध्ये सुका कचरा जिरवण्यात येत आहे.